Wednesday, December 10, 2025

 वाचनाने बुद्धीचा विकास होतो

– अ. वा. सूर्यवंशी


प्रशांती सार्वजनिक वाचनालय आयोजित बालवाचक सभासद सत्कार व फिरते वाचनालय (साखळी) योजना शुभारंभ


नांदेड दि.१० डिसेंबर : प्रशांती सार्वजनिक वाचनालय, आनंद नगर यांच्यावतीने, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित श्री सत्य साईबाबा प्राथमिक विद्यालय, आनंद नगर येथे बालवाचक सभासद सत्कार, फिरते वाचनालय (साखळी) योजना शुभारंभ व शाळा दत्तक योजना कार्यक्रम उत्साहात पार पडला.




कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “वाचनाने बुद्धीचा विकास होतो आणि स्मरणशक्ती तेज होते” असे मत व्यक्त करून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.


वाचनालयाचे अध्यक्ष रावसाहेब शेंदारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुस्तकांकडे ओढ निर्माण करण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अष्टेकर एस. एस., शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

०००००

 भटक्या श्वान नियंत्रणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुपालनासाठी बैठक संपन्न


नांदेड,दि. १० डिसेंबर:- आज 10 डिसेंबर 2025 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी, नकिरण अंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली, मा. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



या बैठकीत भटक्या श्वान नियंत्रण, निर्बीजिकरण, लसीकरण, निवारा व्यवस्था, संवेदनशील क्षेत्रांतील प्रतिबंधात्मक उपाय तसेच जनजागृती यांसंबंधी उपाययोजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठराविक मुदतीत कार्यवाही करून अनुपालन व पूर्ततेचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले.

०००००

 माळेगाव यात्रेत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करा

-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

श्री क्षेत्र माळेगाव यात्रा पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

यात्रेच्या सर्वांगीण सुविधेसाठी सर्व विभागाचे सुक्ष्म नियोजन व समन्वय आवश्यक
                                                                                                                                                                                                                                                                                                     
नांदेड, दि. 10 डिसेंबर : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्री खंडोबा देवस्थान, माळेगाव येथील यात्रा दिनांक 18 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रेत सर्व सुविधा उपलब्ध राहतील, यासाठी संबंधित सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करून समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.         


                                                                                                                                                                                                                                                                                                                                       
यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 डिसेंबर रोजी देवस्वारी व पालखी पूजन होईल व दुसऱ्या दिवशी पशुप्रदर्शन व दुग्धस्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात्रेच्या कालावधीत भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करण्यात येणार आहेत. यात्रेच्या सोयीसुविधांबाबत पशुसंवर्धन, कृषी, पोलीस प्रशासन, बीएसएनएल, महावितरण, परिवहन, आरोग्य विभाग आदींच्या कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे घेतला.

या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत , माळेगावचे सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती.       




                                                                                                                                                                                                                                              
यात्रेत विविध विभागाचे स्टॉल

यात्रेत भाविकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळावी म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, महाविस्तार ॲप, ॲग्रीस्टॅक, आयुष्यमान भारत, महिला व बाल विकास विभाग,पशुसंवर्धन विभाग यांचे स्टॉल उभारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.
तसेच भाविकांना इंटरनेट सेवा अखंडित मिळावी यासाठी बीएसएनएलने वायफाय व नेटवर्क व्यवस्थेचे विशेष नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

महत्त्वाच्या सुविधा व कामे
यात्रेच्या काळात पुढीलप्रमाणे सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली. यात सीसीटीव्ही, वॉशरूम, बॅरिकेट व्यवस्था, मंदिराकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याची दुरुस्ती, हेलिपॅड, स्वच्छतेसाठी मोबाईल व्हॅन, विविध स्पर्धा व पशुप्रदर्शनासाठी लागणारा निधी याबाबतची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध विभागांना यात्रेच्या अनुषंगाने करण्यात आलेले नियोजनाची माहिती यावेळी दिली.

यात्रा परिसरातील कला महोत्सव, मंदिर परिसर, कुस्ती मैदान, कृषी व पशुप्रदर्शन विभाग, बसस्टॅण्ड येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची व नियोजनाची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली.यात्रेच्या अनुषंगाने लागणाऱ्या सुविधा उपलब्ध होण्या बाबत माहिती माळेगावचे सरपंच श्री. धुळगुंडे यांनी यावेळी केली.
००००००

 बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

नांदेडदि. 10 डिसेंबर : वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्ससंशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सवाहन नोंदणीई-चालान यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे चलन बाकी आहेपरवाना सस्पेंड होणार आहे अशा धमकीपर संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन विभागाने याबाबत स्पष्ट सांगितले कीआरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभाग नागरिकांना कधीही व्हॉट्सअॅप वरून पेमेंट लिंक पाठवत नाही, याची सर्वानी नोंद घ्यावी.

तसेच RTO Services.apkmParivahan_Update.apkeChallan Pay.apk अशी अज्ञात एपीके फाईल्स डाऊनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपीबँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे.

नागरिकांनी #VAHAN (वाहन नोंदणी सेवा) https://vahan.parivahan.gov.in, #SARATHI (ड्रायव्हिंग लायसन्स सेवा) https://sarathi.parivahan.gov.inपरिवहन सेवा पोर्टल https://www.parivahan.gov.in तसेच #ई-चालान पोर्टल https://echallan.parivahan.gov.in या gov.in डोमेनच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे .com, .online, .site, .in किंवा इतर कोणत्याही डोमेन वरील वेबसाइटवर वाहनधारकांनी माहिती नोंदवू नये.

कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यानंतर तात्काळ नॅशनल #सायबरक्राईम पोर्टलचे https://www.cybercrime.gov.inसायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवावीअसे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे.

00000

 वाचनाने बुद्धीचा विकास होतो – अ. वा. सूर्यवंशी प्रशांती सार्वजनिक वाचनालय आयोजित बालवाचक सभासद सत्कार व फिरते वाचनालय (साखळी) योजना शुभारंभ...