Thursday, December 24, 2020

 

नांदेड जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

नांदेड (जिमाका) दि. 24 :-  शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सन 2021 या वर्षाकरीता नांदेड जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यात सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा पालखी सोहळा मि. मार्गशिर्ष कृ. 13 निमित्त, सोमवार 1 मार्च 2021 रोजी हाजी सय्याह सरवरे मगदुम (रहे) कंधार ऊर्स आणि सोमवार 13 सप्टेंबर 2021 रोजी जेष्ठा गौरी पुजन निमित्त या तीन स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे. 

या स्थानिक सुट्ट्या नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदअंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील. तसेच हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू राहणार नाही, असेही या अधिसुचनेत म्हटले आहे.

00000

 

29 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू  

37 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 24 :-  गुरुवार 24 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 29 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 18 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 11 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 37 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 917 अहवालापैकी 877 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 211 एवढी झाली असून यातील 20 हजार 148 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 298 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 13 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. बुधवार 23 डिसेंबर रोजी शिवाजी चौक सिडको येथील 81 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर मगनपुरा नांदेड येथील 63 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 568 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, खाजगी रुग्णालय 7, बिलोली तालुक्यांतर्गत 2, मुखेड कोविड रुग्णालय 5 असे एकूण 37 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 12, मुखेड तालुक्यात 4, अर्धापूर 1, नायगाव 1 असे एकुण 18 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, कंधार 2, देगलूर 1, माहूर 2, हदगाव 1 असे एकुण 11 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 298 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 21, मुखेड कोविड रुग्णालय 13, देगलूर कोविड रुग्णालय 16, हदगाव कोविड रुग्णालय 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 142, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 38, औरंगाबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 18 आहेत.   

गुरुवार 24 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 167, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 68 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 74 हजार 422

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 49 हजार 121

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 211

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 148

एकुण मृत्यू संख्या-568

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-470

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-298

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-13.           

000000

 

नाताळ सणाच्या गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- दरवर्षी ख्रिश्चन बांधव नाताळचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. परंतू कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी सर्व धर्मीय सण / उत्सव हे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने ख्रिश्चन बांधवांनी नाताळचा सण साजरा करणे अपेक्षित असल्याने त्यादृष्टिने राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या  आहेत, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे. 

या मार्गदर्शक सूचनांमध्ये ख्रिश्चन बांधवांनी यावर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये जास्तीतजास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल याची काळजी घेण्यात  यावी. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येशुंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वसतू ठेवल्या जातात. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने / स्टॉल लावण्यात येऊ नयेत. साठ वर्षावरील नागरिकांनी तसेच 10 वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे व सण घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षति होणार नाही अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्यांची अतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटकोर पालन करण्यात यावे.  31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना ही मध्यरात्री आयोजित  न करता संध्याकाळी 7 वाजता किंवा त्यापूर्वी घेण्याचे नियोजन करण्यात यावे. 

कोविड-19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच गृह विभागाच्या या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष नाताळ उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे लागेल, असे परिपत्रक राज्य शासनाच्या गृह विभागाचे उप सचिव संजय खेडेकर यांनी निर्गमीत केले आहे.

0000

 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात 1 हजार 13 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. या निवडणुकीसाठी 23 ते 30 डिसेंबर 2020 (25,26 व 27 डिसेंबरची सार्वजनिक सुट्टी वगळून) या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार आहेत. हे नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर http:://panchayatelection.mah.gov.in या संकेतस्थळावर भरुन नामनिर्देशनपत्राची प्रिंट काढल्यानंतर आवश्यक त्याठिकाणी स्वाक्षरी करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. 

या नामनिर्देशनपत्रासोबत आवश्यक कागदपत्रासह http:://panchayatelection.mah.gov.in या संकेतस्थळावर भरलेले गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबतचे घोषणापत्र आणि मत्ता व दायित्वबाबतचे घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. या नामनिर्देशनपत्रासोबत पोलीस विभागाच्या चारित्र्य पडताळणी अहवालाची आवश्यक राहणार नाही, असे उपजिल्हाधिकारी सामान्य शरद मंडलिक यांनी कळविले आहे.

00000

 

मोटार वाहन निरीक्षक यांचा

तालुका शिबीर कार्यालयाचा दौरा   

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील 9 तालुक्याच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक यांचे जानेवारी 2021 ते जून 2021 या कालावधीतील तालुका शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे. 

तालुका शिबिर कार्यालयाचा दौरा पुढील प्रमाणे राहील. कंधार- 5 जानेवारी, 5 फेब्रुवारी, 5 मार्च, 5 एप्रिल, 5 मे व 4 जून. मुखेड-  7 जानेवारी, 8 फेब्रुवारी, 8 मार्च, 7 एप्रिल, 7 मे व 7 जून. देगलूर- 12 जानेवारी, 10 फेब्रुवारी, 12 मार्च, 9 एप्रिल, 10 मे, 9 जून. हिमायतनगर - 14 जानेवारी, 12 फेब्रुवारी, 15 मार्च, 12 एप्रिल, 12 मे व 11 जून. मुदखेड- 18 जानेवारी, 15 फेब्रुवारी, 17 मार्च, 15 एप्रिल, 17 मे, 17 जून. हदगाव- 20 जानेवारी, 17 फेब्रुवारी, 19 मार्च, 19 एप्रिल, 19 मे, 21 जून.  धर्माबाद- 22 जानेवारी, 22 फेब्रुवारी, 22 मार्च, 22 एप्रिल, 24 मे, 24 जून. किनवट- 28 जानेवारी, 25 फेब्रुवारी, 30 मार्च, 26 एप्रिल, 27 मे, 28 जून 2021. माहूर-29 जानेवारी, 26 फेब्रुवारी, 31 मार्च, 27 एप्रिल, 28 मे, 29 जून 2021 या प्रमाणे मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक हे शिबिर कार्यालयाचे आयोजन करुन जनतेची कामे पार पाडणार आहेत.

00000

 

 

कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील

दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- कर्नांटक राज्यातील 5 हजार 762 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यासंदर्भात कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात औराद तालुक्याच्या सीमावर्ती भागाच्या 5 किमी अंतरावरील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हाणेगाव, मानूर, बिजलवाडी व मुखेड तालुक्यातील हळणी या भागातील दारु दुकाने 25 ते 27 डिसेंबर 2020 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.   

या निवडणुकीसंदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये नांदेडचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कर्नाटक राज्याच्या 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागाच्या परिसरातील सर्व सीएल-3, एफएल-3, एफएल / बीआर-2 आदी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...