Thursday, December 24, 2020

 

कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील

दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- कर्नांटक राज्यातील 5 हजार 762 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यासंदर्भात कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात औराद तालुक्याच्या सीमावर्ती भागाच्या 5 किमी अंतरावरील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हाणेगाव, मानूर, बिजलवाडी व मुखेड तालुक्यातील हळणी या भागातील दारु दुकाने 25 ते 27 डिसेंबर 2020 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.   

या निवडणुकीसंदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये नांदेडचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कर्नाटक राज्याच्या 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागाच्या परिसरातील सर्व सीएल-3, एफएल-3, एफएल / बीआर-2 आदी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...