Friday, December 3, 2021

 अवसायकाचे पॅनलसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 व कलम 110 (अे) अन्वये जिल्ह्यातील अवसायनातील संस्थांच्या कामकाजासाठी अवसायकाची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आली आहेत. अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधकसहकारी संस्थालातूर विभाग लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, 2 मजलाशिवाजी चौक लातूर यांच्या कार्यालयात 10 डिसेंबर 2021 ते 14 जानेवारी 2022 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत 14 जानेवारी 2022 पर्यंत आहेअसे आवाहन नांदेड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.


अर्ज करण्यास पात्र व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी. प्रॅक्टीसिंग ॲडव्होकटस. चार्टर्ड अकौन्टटकॉस्ट अकौन्टटकंपनी सेक्रेटरी. राष्ट्रीयकृत बँकाग्रामीण बँकाभूविकास बँकाजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाव्यापारी बँकानागरी सहकारी बँकाराज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी. सहकार विभागातील सेवानिवृत्त वर्ग-1, वर्ग-दर्जाचे अधिकारी आणि सहकार अधिकारी प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी. महसूल विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी. कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती. सहकारी संस्थेचे लेखापरिक्षण केले असल्याचे 5 वर्षाचे अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक असावा.

 

अर्जदार व्यक्तीने पुढीलप्रमाणे अर्हता धारण केलेली असावी. अर्जदार व्यक्तीवर कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी असल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत असावी. शारीरिक व मानसिक आरोग्याच्यादृष्टीने सक्षम असावा. प्रॅक्टीसिंग ॲडव्होकेटस् व चार्टर्ड अकौन्टटकॉस्ट अकौन्टटकंपनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेचे कामकाजाचा वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे. कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा किंवा कलम 83 व कलम 88 च्या कार्यवाहीमध्ये जबाबदार धरलेला नसावा (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियमांतर्गत अपात्र नसावा). सदर व्यक्तीचा सहकार खात्याने काळ्या यादीमध्ये (Black List) समावेश केलेला नसावा. ही व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधकसहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नांदेड, लातूरउस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील रहिवासी असावा. सदर व्यक्ती एकावेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करु शकतील.

 

प्राप्त अर्जाची छाननी 31 जानेवारी 2022 रोजी पूर्ण करुन 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रारुप नामिका प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत हरकती मागविल्या जातील. त्यानंतर 14 मार्च 2022 रोजी हरकतीचा निर्णय घेण्यात येईल. हरकतीचा निर्णय करुन 21 मार्च 2022 रोजी अंतीम नामीका प्रसिद्ध करण्यात येईल.


याबाबतची जाहीर सूचना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. मुकेश बारहाते जिल्हा उपबिनंधक सहकारी संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

000000

 वृत्त

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

लातूर,दि.3 (विमाका):- बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम 2002 च्या कलम 84 (4) अन्वये 2022-2025 या कालावधी लवाद नामतालिका (Arbitrator Pane) तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन लातूर येथील सहकारी संस्थाच्या विभागीय सहनिबंधक सचिन रावल यांनी केले आहे. 

सर्व न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश आणि सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टीसिंग ॲडव्होकेटस, चार्टर्ड अकौंन्टंट, कॉस्ट अकौंन्टंट, राष्ट्रीय बँका, ग्रामीण बँका, भू विकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे). 

सहकार विभागातील उपनिबंधक दर्जा पेक्षा वरच्या दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे) तसेच अशा व्यक्तींची नियुक्ती करताना उक्त अधिनियमामध्ये नमूद नसले तरीही पुढीलप्रमाणे जादा अर्हता, पात्रता असाव्यात. त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय, बँक सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांची कोणत्याही प्रकारची खाते निहाय चैाकशी चालू नसावी आणि सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. अशी व्यक्ती कोणत्याही काळ्या यादीत (Black List) मध्ये समाविष्ट नसावी.  

या व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. (नांदेड, लातूर, उस्मानाबादबीड जिल्ह्यातील). व्यक्ती एकावेळी एकाच विभागातून अर्ज दाखल करु शकते. अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग लातूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, शिवाजी चौक लातूर ता.जि.लातूर या कार्यालयात दि. 31 डिसेंबर -2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत दिनांक 31 डिसेंबर-2021 राहील. प्राप्त अर्जाची छाननी पूर्ण करुन दि.14 फेब्रुवारी-2022 रोजी प्रारुप लवाद नामतालिका प्रसिध्द होईल. ही प्रारुप नामतालिका यादी संबंधित विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात लावण्यात येईल. प्रारुप नामतालिकावर हरकती असल्यास drcslaw@gmail.com या -मेलवर पुराव्यासह हरकती दि.21 फेब्रुवारी-2022 पर्यंत सादर करता येतील. हरकतीचा निर्णय करुन दि.18 मार्च-2022 रोजी अंतीम लवाद नामतालिका प्रसिध्द करण्यात येईल. याबाबतची जाहिर सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात 1 कोरोना बाधित 2 कोरोना बाधित झाले बरे

 नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 257 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 492 एवढी झाली असून यातील 87 हजार 817 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 21 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 654 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 1 असे एकूण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 21 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 15, खाजगी रुग्णालय 3 अशा एकूण 21 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 76 हजार 953

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 72 हजार 994

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 492

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 817

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-04

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

 मोटार सायकल प्रवर्ग नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे नविन मालिका  

नांदेड (जिमाका) दि. 3 :- नांदेड जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे मोटार सायकल करिता MH26-CA ही नवीन मालिका 8 डिसेंबर 2021 पासुन सुरू करण्यात येत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यायचा आहे त्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड मोबाईल नंबर व ई-मेलसह 6 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 पर्यंत अर्ज करायचा आहे. यानंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाही. 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होतील त्यांची यादी दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वा. प्रसिद्ध करण्यात येईल. यासंबंधी अर्जदारांना मोबाईलवर एसएमएस  करण्यात येईल. याची संबंधितांनी सर्वानी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने केले आहे.

00000

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 3 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. सोमवार दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 ते 3 यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. 

या दिवशी महसूल, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 


·         4 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधी अर्ज करावेत 

नांदेड (जिमाका) दि.3 :- नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेतर्गंत दुधाळ गाई-म्हशींचे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 100 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25अधिक 3 तलंगा गट वाटप या योजनासाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रीया सन 2021-22 या वर्षात राबविली जाणार आहे. 

इच्छुक पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करावयाचा आहेत.  त्यांनी आपले अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर करावेत. तसेच ॲड्रॉईड मोबाईलवर ॲप्लिकेशनचे नाव AH-MAHABMS (गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध) आहे. ऑनलाईन अर्ज 4 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल. जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती व महिलांनी या योजनाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत केले आहे. 

जिल्हास्तरीय विविध योजनासाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नयेत. यासाठी पुढील 5 वर्षापर्यत तयार केलेली प्रतिक्षा यादी लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामूळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्याना प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामूळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींसाठी नियोजन करता येणे शक्य होणार आहे. 

योजनाची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा पूर्ण तपशिल संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे  अत्यंत सुलभ करण्यात आले आहे. अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीसाठी पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामूळे पशुपालकांनी अर्ज भरण्यासाठी स्वत:चे मोबाईलचा वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थीतीत अर्जदाराने योजनेतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.

0000

 

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...