Monday, December 14, 2020

 ग्रामपंचायत निवडणूक

जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या

अर्जाची पोचपावती आवश्यक

 

          मुंबईदि. 14 (रा.नि.आ.): राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा आहेअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

          श्री. मदान यांनी सांगितले कीराज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. विजयी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईलअसे या हमीपत्रात नमूद करावे लागेल.

०-०-०

 

15 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

36 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 14 :-  सोमवार 14 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 15 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 11 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 4 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 36 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 498 अहवालापैकी 415 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 860 एवढी झाली असून यातील 19 हजार 810 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 294 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. सोमवार 14 डिसेंबर रोजी अर्धापूर तालुक्यात दौर येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 561 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 22, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 10 असे एकूण 36 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.96 टक्के आहे. 

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 9, लोहा तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1 असे एकुण 11 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 2, यवतमाळ 1, मुदखेड तालुक्यात 1 असे एकुण 4 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 294 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 22, मुखेड कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 5, हदगाव कोविड रुग्णालय 6, किनवट कोविड रुग्णालय 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 148, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 29, हैदरबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 24 आहेत.  

सोमवार 14 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 166, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 69 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 64 हजार 174

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 39 हजार 310

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 860

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 810

एकुण मृत्यू संख्या-561

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.96 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-439

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-294

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.           

000000

 

वाहन चालक, मालकांना थकीत कराची

रक्कम भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुभा

नांदेड, (जिमाका) दि. 14 :- शासन परिपत्रक व राज्याचे परिवहन आयुक्त यांचे 3 डिसेंबरच्या पत्रानुसार जे वाहन मालक त्यांचा वाहनाचा 31 मार्च 2020 पर्यंत थकीत असलेला कर,  दंड व व्याजासहीत 31 डिसेंबर 2020 पर्यंत भरतील. त्यांना शासनाने कोविड-19 या विषाणुद्वारे उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे वार्षिक कर भरणाऱ्या परिवहन वाहनांना जाहीर करण्यात आलेल्या  सवलतीचा (Tax Exemption) लाभ घेता येईल. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांने 31 डिसेंबर 2020 पूर्वी कार्यालयात येऊन त्यांचे वाहनांचा 31 मार्च 2020 रोजी पर्यंत कर भरणा करावा लागेल, याची नांदेड जिल्हयातील सर्व वाहन चालक, मालकांनी सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेवूनच

अल्पसंख्यांक हक्क दिन 18 डिसेंबरला साजरा करावा

नांदेड, (जिमाका) दि. 14 :- कोव्हिड-19 विषाणुच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लोकसहभागाबाबत योग्य ती खबरदारी घेऊनच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाने शुक्रवार 18 डिसेंबर 2020 हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. 

कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येवू नयेत. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना व्याख्याने, चर्चासत्रे ऑनलाईन वेबिनार पध्दतीने प्रसिध्दी करावीत. जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याबाबत  असेही, जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...