Tuesday, July 20, 2021

मतदान प्रक्रियेत मतदारांच्या अधिक सहभागासाठी 

स्वीप- 2021 मोहिम प्रभावीपणे राबवू

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे हे सक्षम नागरिकत्वाचे द्योतक असून प्रत्येकांनी आपला मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मतदानांविषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी या उद्देशाने स्वीप जनजागृती मोहिम हाती घेतली असून जिल्हा प्रशासनातर्फे ती प्रभावीपणे राबविली जाणार आहे. कोविड-19 च्या या काळात मतदानाची प्रक्रिया आरोग्याच्यादृष्टिने अधिक सुरक्षित कशी होऊ शकेल याची काळजी जिल्हा प्रशासन घेत आहे. यादृष्टिने स्वीप-2021 मोहिमेंतर्गत अधिकाधिक जनाजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीप-2021 कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत शेळके, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त  तेजस माळवदकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र आणि जनसंवाद विभागाचे संचालक डॉ. दिपक शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

या कार्यक्रमांतर्गत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, दिव्यांग, वंचित व्यक्तींसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था व सामाजिक माध्यमाद्वारे स्वीप जनजागृती कार्यक्रम राबविण्यात  येणार आहे. जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाविषयी अधिक जनजागृती होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करणे, मतदार साक्षरता क्लब निर्माण करणे, चुनावी पाठशाला या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विविध शैक्षणिक संस्थेत वाद-विवाद स्पर्धा, रंगीत तालिम, परिसंवाद, पथनाट्या आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. मतदानाचा हक्क बजावतांना दिव्यांग, तृतीयपंथी यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

*****

नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित, एकाचा मृत्यू तर 9 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 666 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 127 एवढी झाली असून यातील 87 हजार 404 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 64 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात 20 जुलै भावसार चौक नांदेड येथील 47 वर्षाच्या एका महिलेचा रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 659 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, धर्माबाद तालुक्यात 1 असे एकूण 3 बाधित आढळले.   

आज जिल्ह्यातील 9 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, हदगाव कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 6 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 64 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 12, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 41, खाजगी रुग्णालयात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 140 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 42 हजार 202

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 40 हजार 169

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 127

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 404

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 659

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.97 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-43

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-51

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-64

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

परीक्षेसाठी महाविद्यालय उघडण्यास परवानगी    

नांदेड (जिमाका) दि. 20 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी निर्धारीत केलेल्या विविध महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर 13 ते 14 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणाऱ्या परीक्षेसाठी महाविद्यालये उघडण्यास नियम व अटीस अधीन राहून जिल्हादंडाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे. 

या आदेशानुसार या परिक्षेसाठी परिक्षार्थीना देण्यात आलेले प्रवेशपत्र हे विद्यार्थी व पालकांच्या प्रवासासाठी पास म्हणून गृहीत धरण्यात येईल. परिक्षेच्या आयोजनासाठी संबंधित असलेले कर्मचारी, पर्यवेक्षक त्यांना दिलेले आदेश हे प्रवासासाठी पास म्हणून गृहीत धरण्यात यावेत. परीक्षेतील परिक्षार्थी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना या परीक्षेसंदर्भात असलेले आदेश, ओळखपत्र म्हणून रेल्वे, बस यातून प्रवास करण्यास पास म्हणून गृहीत धरण्यात यावा. परीक्षा सुरु होण्यापुर्वी या परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण करणे, सॅनिटायजरचा उपयोग करणे, मास्क लावणे, सामा‍जीक अंतराचे नियम पाळणे आदी बाबींचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहील. संबंधीत कर्मचारी, पर्यवेक्षक, समवेक्षक यांना आरटीपीसीआर, ॲटिजेनची चाचणी अनिर्वाय करण्यात यावी असे आदेशात स्पष्ट केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी डॉ. इटनकर यांनी हा आदेश 20 जुलै रोजी निर्गमीत केला आहे.

*****

जिल्ह्यातील 85 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 85 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. बुधवार 21 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, हैदरबाग, शिवाजीनगर, कौठा, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, सांगवी, विनायकनगर, तरोडा, खडकपुरा, करबला, अरबगल्ली या 18 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

तर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, सांगवी या 11 केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, कौठा, विनायकनगर, तरोडा, पोर्णिमानगर या 6 केंद्रावर प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, उमरी या 10 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, उमरी या 12 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय मुखेड, ग्रामीण रुग्णालय कंधार येथे कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. 

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 47 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर 6 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 19 जुलै पर्यंत एकुण 7 लाख 54 हजार 28 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 20 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 98 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 77 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

0000      

मागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कृषी संलग्न, लघुउद्योग, सेवा उद्योग इत्यादी नवीन व्यवसाय किंवा व्यवसाय वाढीसाठी वित्त पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. इ.मा.व. प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयाचा दूरध्वनी 02462-220865 या क्रमांकावर किंवा www.msobefdc.org या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेड यांनी केले आहे.

 बीज भांडवल कर्ज योजना

राष्ट्रीयकृत बँकेमार्फत बीज भांडवल कर्ज योजनातंर्गत कर्ज उपलब्ध करण्यात येईल. महामंडळाचा सहभाग 20 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के व बँकेचा सहभाग 75 टक्के राहील. महामंडळाच्या रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दर असून परतफेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. बँकेच्या रक्कमेवर बँक नियमानुसार व्याज दर आकारण्यात येईल.

थेट कर्ज योजना थेट कर्ज योजना

महामंडळाकडून व्यवसायानुसार महत्तम एक लक्ष रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते या योजनेत लाभार्थी सहभाग नाही. अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. नियमित 2 हजार 85 रुपये 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज द्यावे लागणार नाही परंतू थकीत झालेल्या हप्त्यांवर दसादशे 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

 वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना

गरजू व कुशल व्यक्तींना व्यवसायाकरिता बँकेमार्फत वैयक्तिक कर्ज देण्यात येते. व्यवसायानुसार कर्ज रक्कम 1 ते 10 लाख रुपयापर्यंत बँकेमार्फत कर्ज देण्यात येते. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम महत्तम 12 टक्क्यांच्या मर्यादित व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रामाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. लाभार्थीने ऑनलाईन वेबपोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावे.

 गट कर्ज व्याज परतावा योजना

महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या निकषांनुसार वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्था बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळकडून अदा करण्याची ही योजना आहे.

*****

दिव्यांग स्थानियस्तर समिती सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- नॅशनल ट्रस्ट कायदा 1999 अंतर्गत दिव्यांग (मतिमंद, स्वमग्न, मेंदुचा पक्षघात, मानसिक अपंगत्व, बहुविकलांग) यांना कायदेशीर पालकत्व देण्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली स्थानियस्तर समिती गठीत केली आहे. 

या समितीमध्ये नॅशनल ट्रस्ट मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्था (एक), दिव्यांग क्षेत्रातील अनुभवी दिव्यांग व्यक्ती (एक) याप्रमाणे सदस्य पदी नेमणुक करावयाची आहे. त्याकरीता पात्र संस्था व दिव्यांग व्यक्तींनी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे शनिवार 31 जुलै 2021 पर्यंत अर्ज सादर करावीत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

*****

अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा

26 जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल मुल्यमापन कार्यपध्दतीनुसार 16 जुलै रोजी जाहीर झाला आहे. इयत्ता 11 वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यात एक सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या इयत्ता 10 वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण, प्रविष्ठ झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in  या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची सुविधा 26 जुलैपर्यत उपलब्ध करुन दिली आहे. विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

या परीक्षेचे आयोजन शिक्षण मंडळामार्फत केले जाणार असून त्याअनुषंगाने सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन शनिवार 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत करण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2021-22 मधील इयत्ता 11 वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक स्वरुपाची आहे. ही परीक्षा ऑफलाईन स्वरुपाची असून ती राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची व ओएमआर आधारीत असेल. अर्ज भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी तपशीलवार सूचना शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असेही आवाहन शिक्षण मंडळाने प्रसिध्दपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 डाकघर अधिक्षक कार्यालयात विमा सल्लागार पदाच्या मुलाखती 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन (आरपीएल) योजनेंतर्गत विमा सल्लागारच्या (डायरेक्ट एजंट) भरतीसाठी मुलाखती घेण्यात येत असून अर्ज डाकघर अधिक्षक कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरुन शुक्रवार 30 जुलै 2021 पर्यत कार्यालयीन वेळेत अधिक्षक डाकघर नांदेड 431601 येथे मुलाखतीसाठी यावे. येतांना सोबत बायोडाटा, मुळ कागदपत्र, प्रमाणपत्र, अनुभव  प्रमाणपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड विभागाचे अधिक्षक डाकघर पी. स. माधवराव यांनी केले आहे. 

पीएलआय व आरपीएल योजनेच्या एजंट विमा सल्लागार या पदासाठी  पात्रता व मापदंड पुढीलप्रमाणे आहे.  उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 50 वर्षे दरम्यान असावे. शैक्षणिक पात्रतेत अर्जदार हा 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा. ज्यात केंद्रीय, राज्य मान्यता प्राप्त असावी. 

श्रेणी-बेरोजगार, स्वयं बेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्रामप्रधान, ग्राम पंचायत सदस्य इ. टपाल जीवन विमासाठी थेट असे अर्ज  करु शकतात. 

उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तीमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती आदी बाबी लक्षात घेतल्या जातील. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी / केव्हीपीच्या स्वरुपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा 3 वर्षेच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असेही अधिक्षक डाकघर नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

0000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 6.5 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात मंगळवार 20 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 134.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात मंगळवार 20 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 6.7 (168.9), बिलोली- 4.2 (292.0), मुखेड- 10.9 (230.8), कंधार- 5.5 (226.0), लोहा- 8.5 (252.4), हदगाव-10.9 (195.6), भोकर- 0.8 (115.8), देगलूर- 4.4 (211.0), किनवट- 10.3 (245.4), मुदखेड- 4.4 (293.7), हिमायतनगर-3.4 (160.6), माहूर- 8.2 (193.1), धर्माबाद- 9.2 (263.0), उमरी- 3.9 (303.2), अर्धापूर- 1.7 (291.4), नायगाव- 1.7 (244.2) मिलीमीटर आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...