परीक्षेसाठी महाविद्यालय उघडण्यास परवानगी
नांदेड (जिमाका) दि. 20 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी निर्धारीत केलेल्या विविध महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर 13 ते 14 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणाऱ्या परीक्षेसाठी महाविद्यालये उघडण्यास नियम व अटीस अधीन राहून जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे.
या
आदेशानुसार या परिक्षेसाठी परिक्षार्थीना देण्यात आलेले प्रवेशपत्र हे विद्यार्थी व
पालकांच्या प्रवासासाठी पास म्हणून गृहीत धरण्यात येईल. परिक्षेच्या आयोजनासाठी संबंधित
असलेले कर्मचारी,
पर्यवेक्षक त्यांना दिलेले आदेश हे प्रवासासाठी पास म्हणून गृहीत धरण्यात
यावेत. परीक्षेतील परिक्षार्थी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना या परीक्षेसंदर्भात
असलेले आदेश, ओळखपत्र म्हणून रेल्वे, बस यातून प्रवास करण्यास पास म्हणून गृहीत धरण्यात
यावा. परीक्षा सुरु होण्यापुर्वी या परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण करणे,
सॅनिटायजरचा उपयोग करणे, मास्क लावणे, सामाजीक
अंतराचे नियम पाळणे आदी बाबींचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहील. संबंधीत कर्मचारी,
पर्यवेक्षक, समवेक्षक यांना आरटीपीसीआर, ॲटिजेनची चाचणी अनिर्वाय करण्यात यावी असे
आदेशात स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी डॉ. इटनकर यांनी हा आदेश 20 जुलै रोजी निर्गमीत केला आहे.
*****
No comments:
Post a Comment