Saturday, January 20, 2018

टोकीयो (जपान) ऑलंम्पीकमध्ये भाग घेण्याची संधी ;  
खेळाडुंसाठी गेल इंडियन स्पिड स्टार चाचणीचे आयोजन    
नांदेड दि. 20 :- सन 2020 टोकीयो (जपान) ऑलंम्पीकमध्ये भाग घेण्याकरीता खेळाडुंसाठी गेल इंडियन स्पिड स्टार चाचणीचे आयोजन बुधवार 24 जानेवारी 2018 रोजी यशवंत महाविद्यालय मैदान नांदेड येथे सकाळी 7.30 वा. करण्यात आले आहे. या चाचणी विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या खेळाडूंचे राज्यस्तरीय शिबीर निवड चाचणीसाठी निवड केली जाईल. राज्यस्तर चाचणी विशेष नैपण्य दाखविणाऱ्या खेळाडूंचे राष्ट्रीय स्तरावरील शिबिरासाठी निवड करण्यात येईल. या खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सो. लि. या संस्थेने गेल इंडिया या भारत सरकारच्या कंपनीच्या सहकार्याने भारतातील वेगवान धावकांची निवड करुन या धावकांना सन 2020 च्या टोकीयो (जपान) ऑलंम्पीकमध्ये सहभागी होण्याकरीता अद्यावत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.  
निवड चाचणी जिल्हयातील सर्व खेळाडूंची होईल. चाचणीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या (कमीत-कमी 25 मुले- 25 मुली जास्तीतजास्त कितीही) खेळाडू मुले-मुली यांना क्रीडा शिक्षकासह चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी पाठविणे आवश्यक आहे. सहभागी खेळाडू मुले-मुली शिक्षकांना प्रमाणपत्र दिले जाईल. चाचणी  धावणे प्रकार- 100 मी., 200 मी. 400 मी.धावणे, वयोमर्यादा गट (मुले / मुली) - 11 ते 14 वर्षे- जन्मतारीख 1 जानेवारी 2004 ते 31 डिसेंबर 2006 15 ते 17 वर्षे - जन्मतारीख 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2003 अशी राहील. ऑनलाईन नोंदणी  www.nycsindia.com, bhaskrdoibale@gmail.com या ई-मेल आयडीवर नोंदणी करावी.
निवड चाचणीकरीता तांत्रीक प्रमुख प्रलोभ कुलकर्णी- 8625021219 हे राहणार आहेत. यासाठी अधिक माहिती करीता- अनिरुध्द शिरसाठ (जिल्हा समन्वयक, एन.वाय.सी.ए.)- 9764022299, विक्रांत खेडकर-  8379063999, भास्कर भा.डोईबळे- 9975209438 यांचेकडे संपर्क करावा. सबंधीत शाळेच्या मुख्याध्यापक यांनी आपल्यास्तरावरुन मुले-मुली खेळाडूंस उपस्थित ठेवण्याकरीता आदेशीत करावे शाळा बाह्य मुले-मुली खेळाडूंनी पालकाचे संतीपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
शारीरिकदृष्टया सक्षम खेळाडू मुले-मुली यांना देखील या चाचणीसाठी पाठवावे. खेळाडू सोबत पाणी बॉटल, जेवणाचा डब्बा, आवश्यक क्रीडा साहित्य असणे आवश्यक आहे.  खेळाडूचे आधार कार्ड, मुख्याध्यापक, पालकाचे संतीपत्र, शाळेतील सहभागी खेळाडू यादी सोबत आणावी. प्रवास खर्च स्वत: करावा लागेल.
            निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली  क्रीडा अधिकारी सय्यद साजीद, मारोती सोनकांबळे, प्रवीण कोंडेकर, क्रीडा मार्गदर्शक अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, संजय चव्हाण अनिरुध्द शिरसाठ (जिल्हा समन्वयक, एन.वाय.सी.ए.) हे तांत्रीक समिती सदस्य संयोजन करीत आहेत, असे प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

00000
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन      
नांदेड दि. 20 :-  राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी इयत्ता दहावीत 75 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन इयत्ता 11 वी व 12 वी प्रवेश घेणाऱ्या अनु. जाती, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांची ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी संबंधीत प्राचार्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांचेकडून अर्जाचा नमुना प्राप्त करुन बुधवार 31 जानेवारी 2018 पर्यंत अर्ज सादर करावीत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बी. एन. वीर यांनी केले आहे.
सन 2012-13 ते 2016-17 पर्यंत ही योजना ऑनलाईन राबविण्यात येत होती. त्यानंतर महाडीबीटी पोर्टल प्रणालीद्वारे सन 2017-18 मध्ये राबविण्याचे निश्चित केले. या पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता आली नाहीत, त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज भरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचा आधार नंबर बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

00000
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांचा दौरा
नांदेड दि. 20 :- केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार, 21 जानेवारी 2018 रोजी मुंबई येथुन विमानाने दुपारी 2.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन आणि आष्टी ता. हदगावकडे प्रयाण करतील. दुपारी 3.20 वा. वाहनाने आष्टी येथे आगमन व भिमा कोरेगाव घटनेसंदर्भातील मयत व्यक्तीच्या कुटुंबियांची भेट. दुपारी 3.30 वा. आष्टी येथुन नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4.30 वा. मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा समाज कल्याण विभागाचे अधिकारी यांचे समवेत बैठकीस उपस्थिती. सायं. 5 वा. मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. सायं 6 वा. नांदेड येथुन रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000
सायबर जाणीवजागृती
कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद
नांदेड दि. 20 :- जिल्हा पोलीस दलाच्यावतीने ट्रान्सफॉर्मिग महाराष्ट्र अंतर्गत सायबर सुरक्षेविषयी कार्यशाळा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांचे मार्गदशनाखाली शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नांदेड येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद मिळाला. आयसीआयसीआय बँकेचे सायबर तज्ज्ञ सुमित महाबळेश्वरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. महाबळेश्वरकर यांनी इंटरनेटच्या माध्यमातून बँकीग व ऑनलाईन व्यवहार, फेसबुक, टिव्टर, व्हॉटस्ॲप या समाज माध्यमावर आपली वैयक्तिक माहिती शेअर करताना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच समाज माध्यमातील चुकीच्या प्रवृत्तीला तसेच अमिषाला बळी पडून आपले नुकसान करुन घेऊ नका. ऑनलाईन बँकींग व्यवहार करतांना आपली वैयक्तीक माहिती, ई-मेल, खाते क्रमांक, क्रेडीट-डेबीट कार्ड, पासवर्ड, पीन आदी माहिती गोपनीय ठेवा कुणालाही शेअर करु नका. क्रेडिट व डेबीट कार्ड स्वत: स्वाईप करा कुणाकडेही देवू नका. सायबर गुन्हेगार या माहितीच्या आधारे फसवणूक करुन आपल्या खात्यातील रक्कम काढू शकतात. मोबाईल किंवा संगणकावरुन सुरक्षित https आणि पॅडलॉक असलेल्या संकेतस्थळाचाच वापर करा. ऑनलाईन शॉपींग करताना सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करावा आदी माहिती दिली.

कार्यशाळेस शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य पी. डी. पोपळे, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक एस. ए. शिरसेवाड, पी. एम. राठोड ,महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरीक, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

000000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...