राजर्षी
शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
ऑफलाईन
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 20 :- राजर्षी
शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी इयत्ता दहावीत 75 टक्के पेक्षा जास्त गुण
घेऊन इयत्ता 11 वी व 12 वी प्रवेश घेणाऱ्या अनु. जाती, विजाभज व विमाप्र
प्रवर्गातील विद्यार्थ्यांची ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी संबंधीत प्राचार्यांनी
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांचेकडून अर्जाचा नमुना प्राप्त करुन बुधवार
31 जानेवारी 2018 पर्यंत अर्ज सादर करावीत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त
बी. एन. वीर यांनी केले आहे.
सन 2012-13 ते 2016-17
पर्यंत ही योजना ऑनलाईन राबविण्यात येत होती. त्यानंतर महाडीबीटी पोर्टल
प्रणालीद्वारे सन 2017-18 मध्ये राबविण्याचे निश्चित केले. या पोर्टलवरील तांत्रिक
अडचणीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता आली नाहीत, त्यामुळे पात्र
विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज भरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यासाठी
विद्यार्थ्यांचा आधार नंबर बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे, असेही प्रसिद्धी
पत्रकात नमुद केले आहे.
00000
No comments:
Post a Comment