Friday, July 7, 2017

निवडणूक प्रक्रियेबाबत मतदाराने जागरुक व्‍हावे  
- उपविभागीय अधिकारी कुलकर्णी
नांदेड, दि. 7 :- भावी मतदाराने निवडणूक प्रक्रिये मतदान मतदान नोंदणीबाबत जागरुक व्‍हावे. नागरीक हा सुजाण मतदार झाला तर लोकशाही मजबुत होण्‍यास व सुशासन स्‍थापन होण्‍यात मदत होते, असे प्रतिपादन  मतदार नोंदणी अधिकारी तथा नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले.
भारत निवडणुक आयोगाच्‍या निर्देशानुसार जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍या मार्गदर्शनाखाली निवडणक विभाग तहसिल नांदेड यांनी INTERACTIVE SCHOOL ENGAGEMENT अंतर्गत केंद्रीय विद्यालय (रेल्‍वे) नांदेड येथे कार्यक्रम घेतला, त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी उपविभागिय अधिकारी श्री. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी  संवाद साधला. मतदार नोंदणी मतदान प्रक्रिया, निवडणुक प्रक्रियाबाबत माहिती दिली. मस्‍ती-दोस्‍ती-मतदान या लघुपटानंतर ईव्हीएमची सुरक्षितता व विश्‍वासाहर्ताबाबत क्‍लीप दाखवण्‍यात आली. तसेच गेट सेट वोट ही COMPUTER GAMES  स्‍पर्धाही घेण्‍यात आली.   
कार्यक्रमास त‍हसिलदार किरण अंबे‍कर, नायब तहसिलदार गजानन नांदगावकर यांचेसह निवडणुक विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास 152 विदयार्थ्‍यांनी सहभाग नोंदवून उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद दिला. प्रास्ताविक नायब तहसिलदार स्‍नेहलता स्‍वामी यांनी केले. केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एकांत पटेल यांनी आभार मानले.
0000000


जिल्ह्याचा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा आराखडा मंजूर
विविध योजनेच्या लाभासाठी 31 जुलै पर्यंत अर्जाची मुदत
नांदेड, दि. 7 :-  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2017-18 साठी रु. 222.12 लाखाचा आराखडा नांदेड जिल्ह्यासाठी मंजुर झाला आहे. त्यामध्ये अनुसुचीत जातीसाठी रु. 58.70 लाख, अनुसुचीत जमातीसाठी रु. 33.37 लाख सर्वसाधारणसाठी - रु. 130.86 लाख अनुदान असा आर्थिक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत क्षेत्रविस्तार (आंबा घनलागवड, पेरु घनलागवड), पुष्पोत्पादन (सुटीफुले, कंदफुले, कटफुले), सामुहीक शेततळे, यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर 20 एच.पी. पर्यंत), हरीतगृह, हरीतगृहातील भाजीपाला लागवड, शेडनेट, शेडनेटमधील फुले लागवड, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रीया केंद्र, कांदाचाळ, रायपनींग चेंबर, कोल्ड स्टोरेज, मोबाईल प्रिकुलींग युनिट आदी बाबींचा समावेश आहे.
त्याचबरोबर राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण प्रकल्प राबविणेसाठी नांदेड जिल्ह्यासाठी रु.27.91 लाखाचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या प्रकल्पांतर्गत ट्रॅक्टर (20 अश्वशक्ती पर्यंत), पॉवर टिलर (8 अश्वशक्ती पेक्षा कमी), पॉवर टिलर (8 अश्वशक्ती पेक्षा जास्त), 20 एच.पी. पर्यंत ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलीत अवजारे (नांगर, डिस्क नांगर, कल्टीव्हेटर, लेव्हलर ब्लेड, रिजर, पेरणी यंत्र इ.) या बाबींचा समावेश आहे.
या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी वरील प्रत्येक बाबीकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण येत असेल तर आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन अर्ज भरुन घ्यावा. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा.
जिल्हा अभियान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत प्राप्त उद्दीष्टाच्या अधीन राहुन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. तरी योजनेचा लाभ घेणेसाठी लाभार्थ्यांनी सोमवार 31 जुलै 2017 पर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करुन स्कीम  फाईल करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

0000000
नव मतदारांची नोंदणी करण्‍यासाठी विशेष मोही
8 जुलै व 22 जुलै 2017 रोजी बीएलओ केंद्रावर हजर राहणार
            नांदेड, दि. 7 :- भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर विधानसभा मतदार यादयाच्‍या विशेष पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कालावधी हा दि. 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 असा आहे. याच कालावधीत दिनांक 8 जुलै व दिनांक 22 जुलै 2017 हया विशेष मोहिमेसाठी तारखा निश्‍चीत केलेल्‍या आहेत. या दिवशी जिल्‍हयातील सर्व केंद्रावर बीएलओ उपस्थित राहून अर्ज स्‍वीकारतील. याचा सर्व मतदारांनी लाभ घ्‍यावा तसेच दिनांक 1 जोनवारी 2017 रोजी ज्‍यांचे वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा सर्व मतदारांनी नाव नोंदणीसाठी अर्ज करावीत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
            विशेष मोहीमेच्‍या तारखा व्‍यतिरिक्‍त ही दि. 01 जुलै ते 31 जुलै 2017 या कालावधीत जिल्‍हयातील सर्व तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्र व संबंधीत BLO यांचेकडे अर्ज करता येतील.
            मतदारांनी अर्ज करतांना आवश्‍यक ते पुरावे तसेच विहित नमुन्‍यातील प्रतिज्ञापत्र जोडूनच अर्ज करावेत.  तसेच कुटूंबातील व्‍यक्‍तींनीच अर्ज जमा करावेत. त्रयस्‍त व्‍यक्‍तीं मार्फत गठ्ठयांनी अर्ज स्‍वीकरले जाणार नाहीत याची नोंद घ्‍यावी.
फोटो जमा करावेत
ज्‍या मतदारांचे यादीमध्‍ये फोटो नाहीत अशा मतदारांनी संबंधित बीएलओकडे फोटो जमा करावेत जेणे करुन त्‍यांना ओळखपत्र देण्‍यात येतील.
दुबार नावे वगळणे
मतदार यादीत एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नांव नोंदविणे बेकायदेशिर आहे. त्‍यामुळे ज्‍या मतदारांनी यापुर्वी एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नोंदविलेली असतील त्‍यांनी एका ठिकाणावरुन नांव वगळण्‍यासाठी नमुना 7 मध्‍ये र्ज सादर करावेत.
मयत / स्‍थलांतरत मतदाराची नावे वगळणे
मयत व्‍यक्‍तींची नावे मतदार यादीत असू नये या करीता मयत व्‍यक्‍तींच्‍या नातेवाईकांनी आवश्‍यक त्‍या पुराव्‍यासह मयतांची नावे मतदार यादीतून वगळण्‍याकरीता नमुना नं.7 भरून देणे बाबत, आवाहन केले आहे.
भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनाकांवर विधानसभा मतदारसंघाच्‍या मतदान यादयांच्‍या विशेष पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. मतदार यादीत नाव नोंदणी / नावात दुरुस्‍ती / आक्षेप नोंदविण्‍यासाठी दिनांक 1 जुलै ते 31 जुलै 2017 हा कालावधी आयोगाने निश्‍चीत केलेला आहे. जिल्‍हयात सध्‍या 23 लाख 74 हजार 303 इतकी मतदार संख्‍या असून त्‍यापैकी 12 लाख 41 हजार 470 पुरुष 11 लाख 32 हजार 780 स्‍त्री व 53 इतर मतदार आहेत, अशी माहितीही प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.  

00000
जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आज आयोजन
तडजोडीसाठी 4 हजार 603 प्रकरणात प्रयत्न होणार  
            नांदेड दि. 7 :- जिल्हा न्यायालय नांदेड जिल्हयातील सर्व न्यायालयात शनिवार 8 जुलै 2017 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, भूसंपादन, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, कामगारांची प्रकरणे तसेच विविध बॅंकांचीविविध मोबाईल कंपन्यांची दाखल पूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार असून अद्यापपर्यंत 2 हजार 463 दाखल पुर्व प्रकरणे न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 2 हजार 140 प्रकरणे अशी एकूण 4 हजार 603 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत. या लोकन्यायालयात आपली प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.
            लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी एकूण 12 पॅनल तयार करण्यात आले असून त्यावर न्यायाधीश विधीज्ञ तडजोडीसाठी प्रयत्न करणार आहेत. शनिवार 8 जुलै 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे,  अभियोक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे,‍ जिल्हा सरकारी वकील अॅड. अमरिकसिंघ वासरीकर,   जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश,  विधिज्ञ संबंध पक्षकारांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून हा सोहळा संपताच प्रकरणे तडजोडीने मिटविण्यास सुरूवात होणार आहे.
सर्व विधीज्ञ, भू-संपादन अधिकारी, विमाकंपनी अधिकारी, विविध मोबाईल कंपन्यांचे अधिकारी, बँका फायनान्स कंपन्यांचे अधिकारी तसेच पक्षकार बांधव यांनी आपली प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत हे लोकन्यायालय यशस्वी करावे असेही आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डी. टी. वसावे यांनी केले आहे.

0000000
सिल्क म्युझियम, माहितीगृहाचे रविवारी
वस्त्रोद्योग मंत्री देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड दि. 7 :- रेशीम संचालनालयाच्यावतीने आयोजित जिल्हा रेशीम कार्यालय पाचगणी रोड वाई जि. सातारा येथे सिल्क म्युझियम, माहितीगृहाचे उद्घाटन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते रविवार 9 जुलै 2017 रोजी सकाळी 10 वा. संपन्न होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणुन जलसंपदा, जलसंधारण, संसदीय कार्य राज्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती राहणार आहे. सर्वश्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, शंभुराजे देसाई, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे, असे रेशीम विकास अधिकारी श्रेणी -2 नांदेड यांनी कळविले आहे.

0000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...