Friday, July 7, 2017

निवडणूक प्रक्रियेबाबत मतदाराने जागरुक व्‍हावे  
- उपविभागीय अधिकारी कुलकर्णी
नांदेड, दि. 7 :- भावी मतदाराने निवडणूक प्रक्रिये मतदान मतदान नोंदणीबाबत जागरुक व्‍हावे. नागरीक हा सुजाण मतदार झाला तर लोकशाही मजबुत होण्‍यास व सुशासन स्‍थापन होण्‍यात मदत होते, असे प्रतिपादन  मतदार नोंदणी अधिकारी तथा नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले.
भारत निवडणुक आयोगाच्‍या निर्देशानुसार जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍या मार्गदर्शनाखाली निवडणक विभाग तहसिल नांदेड यांनी INTERACTIVE SCHOOL ENGAGEMENT अंतर्गत केंद्रीय विद्यालय (रेल्‍वे) नांदेड येथे कार्यक्रम घेतला, त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी उपविभागिय अधिकारी श्री. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी  संवाद साधला. मतदार नोंदणी मतदान प्रक्रिया, निवडणुक प्रक्रियाबाबत माहिती दिली. मस्‍ती-दोस्‍ती-मतदान या लघुपटानंतर ईव्हीएमची सुरक्षितता व विश्‍वासाहर्ताबाबत क्‍लीप दाखवण्‍यात आली. तसेच गेट सेट वोट ही COMPUTER GAMES  स्‍पर्धाही घेण्‍यात आली.   
कार्यक्रमास त‍हसिलदार किरण अंबे‍कर, नायब तहसिलदार गजानन नांदगावकर यांचेसह निवडणुक विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास 152 विदयार्थ्‍यांनी सहभाग नोंदवून उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद दिला. प्रास्ताविक नायब तहसिलदार स्‍नेहलता स्‍वामी यांनी केले. केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एकांत पटेल यांनी आभार मानले.
0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1161   राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन नांदेड दि. 4 डिसेंबर:- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, ...