Friday, July 7, 2017

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आज आयोजन
तडजोडीसाठी 4 हजार 603 प्रकरणात प्रयत्न होणार  
            नांदेड दि. 7 :- जिल्हा न्यायालय नांदेड जिल्हयातील सर्व न्यायालयात शनिवार 8 जुलै 2017 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, भूसंपादन, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, कामगारांची प्रकरणे तसेच विविध बॅंकांचीविविध मोबाईल कंपन्यांची दाखल पूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार असून अद्यापपर्यंत 2 हजार 463 दाखल पुर्व प्रकरणे न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 2 हजार 140 प्रकरणे अशी एकूण 4 हजार 603 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत. या लोकन्यायालयात आपली प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.
            लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी एकूण 12 पॅनल तयार करण्यात आले असून त्यावर न्यायाधीश विधीज्ञ तडजोडीसाठी प्रयत्न करणार आहेत. शनिवार 8 जुलै 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे,  अभियोक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे,‍ जिल्हा सरकारी वकील अॅड. अमरिकसिंघ वासरीकर,   जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश,  विधिज्ञ संबंध पक्षकारांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून हा सोहळा संपताच प्रकरणे तडजोडीने मिटविण्यास सुरूवात होणार आहे.
सर्व विधीज्ञ, भू-संपादन अधिकारी, विमाकंपनी अधिकारी, विविध मोबाईल कंपन्यांचे अधिकारी, बँका फायनान्स कंपन्यांचे अधिकारी तसेच पक्षकार बांधव यांनी आपली प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत हे लोकन्यायालय यशस्वी करावे असेही आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डी. टी. वसावे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...