Tuesday, August 23, 2016

शिष्यवृत्तीशी आधार क्रमांक जोडण्याचे  
समाज कल्याणचे आवाहन            

             नांदेड दि. 23 :- सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येते. ही शिष्यवृत्ती शैक्षणिक शूल्क प्रतिपुर्ती योजना सन 2010-11 पासून ऑनलाईन पध्दतीने कार्यान्वित आहे. या योजनेचा लाभ योग्य विद्यार्थ्यांपर्यत पोहचावा यासाठी विद्यार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक संकलीत करून तो योग्य असल्याची तपासून आधारकार्ड क्रमांक त्यांच्या शिष्यवृत्ती / शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती योजनेशी संलग्न करावयाचा आहे. कार्यवाही एक महिन्याचा कार्यक्रम आखून पूर्ण करण्यात यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड यांनी केले आहे.
-- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
महाराष्ट्र माझा संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा
Ø  निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन
Ø   पंधरादहा व पाच हजार रुपयांची पारितोषिके
Ø   एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे

मुंबईदि. 22: महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीनऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे दि. 1ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथमद्वितीयतृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 15 हजार रूपये10 हजार रूपये5 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ  बक्षीसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी छायाचित्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
            महाराष्ट्र माझा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीनऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवारसेवा हमी कायदा,  मेक इन महाराष्ट्रस्वच्छ महाराष्ट्र,स्मार्ट सिटीकुशल महाराष्ट्र्भाग्यश्री योजनापर्यटन महाराष्ट्रआपले सरकार आणि दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी  संबंधित जिल्हा माहिती कार्यालय आणि मुंबईतील छायाचित्रकारांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयमंत्रालय येथे हाय रिझॉल्युशन (एचडी) छायाचित्रेdgiprnews01@gmail.com या ई मेल पत्यावर  दिनांक 10 सप्टेंबर 2016 पर्यंत पाठवावीत.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी 5 तज्ज्ञांची समिती गठित केली असून समितीत ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे,ज्येष्ठ पत्रकार आशुतोष पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक वरिष्ठ  सहायक  संचालक  अजय  जाधव  (9702973946), (dloajayjadhav2012@gmail.com),  सहायक   संचालक  सागरकुमार कांबळे (8605312555), (ksagar1983@gmail.com) यांच्याशी संपर्क साधावा.
000
महा-अवयवदान अभियान यशस्वी करण्याचा निर्धार
जास्तीत जास्त समंतीपत्र नोंदणीसाठी नागरिकांना आवाहन
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत विविध उपक्रमांचे नियोजन

नांदेड, दि. 23 :- आरोग्य विभागाच्यावतीने 30 ऑगस्ट  ते 1 सप्टेंबर या कालावधीत आयोजित महा-अवयवदान अभियान यशस्वी करण्याचा निर्धार आज जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आला. अवयदानाविषयी जाणीव जागृती करण्यासाठी घरा-घरापर्यंत पोहचण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश समितीचे सहअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून दिले.
जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात झालेल्या या बैठकीस आमदार डी. पी. सावंत, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, समितीच्या समन्वयधिकारी तथा डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. कानन येळीकर, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. विजय कंदेवाड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. जी. एच. गुंटूरकर, पोलीस उपअधीक्षक विश्र्वनाथ नांदेडकर, इंडियन मेडीकल असोसिएशन-नांदेडचे अध्यक्ष डॅा. संजय कदम, रोटरी क्लबच्या डॅा. करूणा पाटील, लायन्स क्लबचे जयेश ठक्कर, डॅा. शाम तेलंग आदींसह विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था आदींचे प्रतिनीधींची उपस्थिती होती.
या तीन दिवसांच्या कालावधीत मानवी अवयवदान व प्रत्योरापण विषयाबाबत व्यापक अशी जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगे नांदेड जिल्ह्यात या मोहिमेला जोडूनच 18 ऑगस्ट 2016 पासून मानवी अवयवदान संमत्री पत्र नोंदणीस  सुरवात  करण्यात  आल्याची माहिती, डॅा. कंदेवाड यांनी दिली. या अभियानात आता ऑनलाईन पद्धतीनेही समंतीपत्र भरण्याचीही सुविधा उपलब्ध झाली, असल्याने विविध कार्यालये, मोठ्या आस्थापना आदींना एकत्रित पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याचे सांगण्यात आले
मंगळवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता भव्य जनजागरण फेरी काढण्यात येणार आहेत. फेरीत  सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, नर्सीग महाविद्यालय, वैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध संघटनाचे सदस्य, स्वयंसेवी संस्था आदींच्या सहभागाबाबत  तसेच त्यांच्यासाठीच्या अनुषांगीक सुविधांबाबत जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. बुधवार 31 ऑगस्ट रोजी विविध महाविद्यालयांच्या समन्वयातून निबंध, रांगोळी आणि वक्तृत्त्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांतील विजेत्यांना गुरुवार  1 सप्टेंबर रोजी या जनजागृती अभियानाच्या जिल्हास्तरीय समारोप समारंभात पारितोषिकांचे वितरण होणार आहे. यादिवशीही रक्तदान शिबीर, अवयदान नोंदणी शिबीर, तसेच जनजागृती मोहिमेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या घटकांना, संमती पत्र नोंदणीत सर्वाधिक नोंदणी गौरव असा कार्यक्रम होणार आहे.
अवयदानाबाबत कुटुंबा-कुटुंबात चर्चा व्हावी, तरच भविष्यात अवयवदानाचे प्रमाण वाढेल यासाठी रुग्ण कल्याण समित्यांमार्फत, तसेच ग्रामीण भागात पोहचून आणि कौटुंबिक सहभाग वाढावा यासाठी घरा-घरापर्यंत पोहचण्याचे नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले. वरीष्ठ महाविद्यालयांसह, वैद्यकीय तसेच अन्य महाविद्यालये, विद्यापीठ स्तरापर्यंत  पोहचून  युवकांचा सहभाग वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही करण्यात आली. या अभियानात विविध व्यावसायिकांच्या संघटना, संस्था यांचा सहभाग घेण्याची सूचना आमदार श्री. सावंत यांनी केली. महा-अवयवदान अभियानासाठी समंतीपत्र नोंदणीचे उद्दीष्टपुर्तीसाठी माहिती-तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील विविध घटकांचा सहभाग घेण्यात यावे , असे आयुक्त श्री. उन्हाळे यांनी सूचित केले. या तीन दिवसाच्या कालावधीत सहभागी होणाऱ्या विविध घटकांसाठी कार्यक्रमस्थळीही समंतीपत्र नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्याला समंतीपत्र नोंदणीसाठी दिलेल्या उद्दीष्टाहून अधिक नोंदणी करण्याचा निर्धार बैठकीत सर्वच घटकांनी व्यक्त केला. डॅा. कंदेवाड यांनी अभियानाबाबत  सादरीकरण  केले  व आभार मानले.
अवयवदानाचे समंती पत्र कुठे भरता येईल ?
नांदेड शहरात श्री गुरुगोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-विष्णुपूरी या तीन ठिकाणी शनिवार 27 ऑगस्ट 2016 पर्यंत.
तर आँनलाईन पद्धतीने – www.dmer.org  या संकेतस्थळावर, Organ Donation Campiagn 2016  या ठिकाणी क्लिक केल्यास, समंतीपत्राबाबतचे पृष्ठ उघडते. त्या ठिकाणी सुलभपणे समंतीपत्र भरता येते. याठिकाणी मराठी व इंग्रजीमधूनही समंतीपत्र भरता येते.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...