Monday, December 3, 2018


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
शिबीराचे बुधवारी आयोजन  
नांदेड दि. 3 :- उज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे  आयोजन बुधवार 5 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबिराचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे डिवायएसपी श्विनी शेंडगे उपस्थित राहणार आहेत.
संतोष ट्टमवार हे युपीएससी, एमपीएससी 2019 (CSAT) संयुक्त पुर्व परीक्षा गणित या विषयावर तर बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके हे डिसेंबरमध्ये होणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी या परीक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांचीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
0000


तेलंगणा राज्यातील सिमावर्ती
भागात दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड दि. 3 :- तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राज्यस्थान, मिझोरम या राज्यात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासंदर्भात शुक्रवार 7 डिसेंबर रोजी मतदान व मंगळवार 11 डिसेंबर 2018 रोजी मतमोजणी होत आहे.
या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनूचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी नांदेड यांनी तेलंगणा राज्यातील 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात मतदान होत असलेल्या ठिकाणची सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल/बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिला आहे.
तेलंगणा राज्यातील 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात (मतदान होत असलेली गावे) मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर 5 डिसेंबर रोजी वरीलप्रमाणे ते मतदानाचा दिवस 7 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस. मतमोजणीचा दिवस 11 डिसेंबर 2018 रोजी मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे, या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000


लोहा नगरपरिषद निवडणुकीच्या
अनुषंगाने दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड दि. 3 :- लोहा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी सोमवार 10 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने लोहा नगरपरिषद मतदान व मतमोजणी हद्दीत दारु विक्री बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना काढला आहे.
लोहा नगरपरिषदेच्या मतदान हद्दीत मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर शुक्रवार 7 डिसेंबर रोजी सायं. 6 वाजेपासून ते मतदानाचा दिवस 9 डिसेंबर 2018 रोजी संपूर्ण दिवस. मतमोजणी होत असलेल्या लोहा नगरपरिषद हद्दीत मतमोजणीचा दिवस सोमवार 10 डिसेंबर 2018 रोजी मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
लोहा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनूचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील लोहा नगरपरिषद हद्दीत मतदान होत असलेल्या ठिकाणची सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल/बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000


बालगृहातील मुलांसाठी
बाल महोत्सवाचे आयोजन
नांदेड, दि. 3 :- जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शासकीय, स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, निराश्रित, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरु बालमहोत्सवाचे आयोजन 5, 6 व 7 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
हा बालमहोत्सव जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपळकुंठा संचलित लहुजी साळवे निराधार निराश्रित बालकाश्रम, वसंत हायस्कुल जवळ, पोतदार कॉलेज समोर, धनगरवाडी रोड, साईबाबानगर वाडीपाटी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या बाल महोत्सवादरम्यान मुलांच्या मैदानी क्रिडा स्पर्धाचे तसेच सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नांदेडचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल शाहू यांनी दिली आहे.
00000


अनुसूचित जातीच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना
90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टरची योजना
नांदेड दि. 3 :-राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित असून लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या योजनेसाठी अटीं शर्तीची तसेच शासन निर्णयातील तरतुदींची पूर्तता करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी परिपूर्ण अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह या कार्यालयास  सोमवार 10 डिसेंबर 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड  येथे अर्ज सादर करावेत. यापूर्वी निवड न झालेल्या बचतगटानी सुद्धा नव्याने अर्ज करणे आवशक आहे. यापूर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
 या योजना अंतर्गत पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. बचत गटांतील सर्व सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. एकूण सदस्यांपैकी 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जातीचे असावेत. तसेच अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. सक्षम अधिकाऱ्यानी दिलेले सर्व सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र व रहिवाशी प्रमाणपत्र असावेत. बचत गटाची नोंदणी सक्षम अधिकाऱ्याकडून केली असावी. बचत गटाचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत असावे व त्या गटातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड हे त्या खात्यास सलग्न केलेले असावेत. सर्व सदस्यांची बँकेने प्रमाणित केलेली यादी असावी.
या योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटांची निवड झाल्यानंतर बचत गटाने Ministry of Agriculture and Farmers  Welfare Deparment of Agriculture, Co- operation and Farmers Welfare यांनी निर्धारित केल्यानुसार मिनी ट्रॅक्टर व  त्याची उपसाधने ही फार्म मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टिंग इंस्टीटयूट यांनी टेस्ट करुन जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावीत. तसेच निवड झालेल्या लाभार्थी बचत गटाने परिमाणानुसार मान्यता प्राप्त उत्पादकाकडून मिनी ट्रॅक्टर / ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीपर्यंत खरेदी करणे आवशक आहे. मीनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा  3 लाख 50 हजार  इतकी राहील. स्वयंसाह्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनाच्या किमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतींच्या 90 टक्के (कमाल 3 लाख 15 हजार ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
एकूण किमतीच्या  10 टक्के स्वहिस्सा भरण्याचे हमीपत्र व गटातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नाही असे हमीपत्र अर्जासोबत जोडावे. आरटीओ कार्यालयातील नोंदणी बचत गटाने स्वतः करुन घेण्याचे हमीपत्र शंभर रुपये बॉडवर असावे. इतर अटीं व शर्ती तसेच विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयाच्या सूचव ना फलकावर डकविण्यात आलेला आहे. बचत गटाने परिपूर्ण अर्ज सादर करावे, त्रुटीयुक्त अर्ज सादर करु नयेत. त्रुटी पूर्ततेसाठी कोणत्याही प्रकारची संधी दिली जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000



मानवी हक्क दिनानिमित्त सोमवारी
विविध उपक्रमांच्या आयोजनाचे निर्देश
नांदेड दि. 3 :- जिल्ह्यात सोमवार 10 डिसेंबर 2018 रोजी मानवी हक्क दिन साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण, कारागृह, निरीक्षकगृह आदी विभागांनी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करावी असे राज्य मानवी हक्क आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे सूचित केले आहे. या कायदाअंतर्गत समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान व्हावे त्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार न्यायालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभाग, पंचायत, ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, महसूल विभागाची सर्व कार्यालये, शिक्षणाधिकारी, कारागृह अधीक्षक, बालगृह मुलांचे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती करावी याविषयी पत्राद्वारे निर्देशीत केले आहे.
00000


राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष
हाजी अरफात शेख यांचा दौरा
नांदेड, दि. 3 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) हाजी अरफात शेख हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 8.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. सकाळी 10 वा. जैन समाजाच्या प्रतिनिधींची भेट. सकाळी 10.30 वा. बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींची भेट. सकाळी 11 वा. शीख समाजाच्या प्रतिनिधींची भेट. सकाळी 11.30 वा. ख्रिश्चन समाजाच्या प्रतिनिधींची भेट. दुपारी 12 वा. मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींची भेट. दुपारी 2.30 वा. पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावाबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व निरंतर), सेवायोजन अधिकारी व इतर सर्व संबंधीत अधिकारी यांचे सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. सायं. 4 वा. पत्रकार परिषद. रात्री 7.30 वा. नांदेड येथून वाशीमकडे प्रयाण करतील.  
00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...