Saturday, June 3, 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
नांदेड विमानतळावर स्वागत
नांदेड, दि. 3 :- येथील गुरुगोबिंदसिंजी विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस आज परळी-बीड दौऱ्यावर आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे येथे विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासमवेत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचेही आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.
याप्रसंगी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, दक्षिण-मध्य रेल्वेचे वरीष्ठ व्यवस्थापक श्री. विक्रमादित्य, प्रभारी अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर भातलंवडे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतूक हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, शोभाताई वाघमारे, संजय कौडगे आदींची उपस्थिती होती.

0000000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...