Tuesday, May 5, 2020


कोटा येथून आलेल्या विद्यार्थ्यांसह  
1 हजार 238 जणांचा अहवाल निगेटिव्ह
तर 57 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित
नांदेड, (जिमाका) दि. 5 :- कोरोना विषाणु संदर्भात घेण्यात आलेल्या व्यक्तींचे स्वँब 1 हजार 354  यापैकी 1 हजार 238 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह असून 57 स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. एकुण 5 स्वँब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. यापैकी 34 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आहे तर औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे तीन रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
राज्यस्थान कोटा येथून नांदेड येथे आलेले 24 विद्यार्थ्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला असता त्या सर्व 24 विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथून 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत जे की, अशा व्यक्तींच्या संपर्कात आले होते ज्याचा अहवाल हा पंजाब राज्यात पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
नांदेड रहेमतनगर येथील मृत्यू महिलेच्या संपर्कात आलेल्या खाजगी रुग्णालयातील 40 कर्मचाऱ्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून प्राप्त अहवालानुसार 19 जणांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला असून उर्वरीत अहवाल प्रलंबित आहेत.
बाधित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड आणि पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत माहिती
तपासणीसाठी आज 25 जणांचे नमुने घेतले
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाबाबत मंगळवार 5 मे 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतची माहिती पुढील प्रमाणे आहे. आत्तापर्यंत एकूण संशयित 1 हजार 530,  क्वारंटाईन व्यक्तींची 1 हजार 402 संख्या असून क्वारंटाईन कालावधी पूर्ण 403, अजून निरीक्षणाखाली असलेले 125 पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 182, घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 1 हजार 220 तर आज तपासणीसाठी नमुने घेतले 25, एकुण नमुने तपासणी 1 हजार 354, एकुण पॉझिटीव्ह रुग्ण 34 पैकी निगेटीव्ह 1 हजार 238 आहेत. नमुने तपासणी अहवाल बाकी 57, नाकारण्यात आलेले नमुने  5, अनिर्णित अहवाल 19, कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 3 असून नांदेड जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी  89 हजार 901 व्यक्तींना घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
000000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...