अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव
31 डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 17 :- सहआयुक्त
तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती
प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद कार्यालयामार्फत या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अंतर्गत नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतील सन 2019-20 या शैक्षणिक
वर्षामध्ये 11 वी व 12 मध्ये शिक्षण
घेत असलेल्या व पुढील
वर्षांमध्ये व्यावसायिक
अभ्यास करण्याकरिता प्रवेश
घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे
जात पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन
आवश्यक कागदपत्रांसह संबंधित
शैक्षणिक संस्थेमार्फत मंगळवार 31 डिसेंबर
2019 पर्यंत या समिती कार्यालयास
सादर करावे.
विद्यार्थी व कनिष्ठ
महाविद्यालये यांनी विहित मुदतीत
प्रस्ताव सादर करावे, विहित मुदतीनंतरचे
प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत
याची दक्षता घेण्यात यावी, असे
आवाहन दिनकर पावरा सहआयुक्त, अनुसूचित
जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद
यांनी केले आहे.
00000