Saturday, November 16, 2019


पिकाच्या नुकसानीचा अहवाल आल्यानंतर
केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना मदत
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे
नांदेड दि. 16 :- संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाची अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचा अहवाल राज्य प्रशासनाकडून केंद्र शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः आग्रह धरून शेतकऱ्यांना अर्थिक मदत देणार, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले. 
खैरगाव येथील आनंद कल्याणकर या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुंटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दि. 16 नोव्हेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे खैरगाव येथे आले होते. यावेळी शेतातील पिकांची पाहणी करतांना ते शेतकऱ्यांशी बोलत होते.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे पुढे म्हणाले, यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे राज्याचा अहवाल केंद्राकडे सादर केल्यानंतर केंद्र सरकारच्यावतीनेही जास्तीतजास्त मदत मिळवून देण्यासाठी आग्रह धरणार आहे. राज्यात  अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूसासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून नुकसान भरपाईच्या मागणीचा प्रस्तावही त्यांनी वरीष्ठ पातळीवर पाठविला आहे. त्यावरून लवकरच शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. 
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी राज्यमंत्री पाटील दानवे यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेती, पडलेला बाजार भाव या समस्या मांडून शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी केली.
यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, तहसिलदार सुजित नरहरे, डॉ अजित गोपछडे, अॅड. किशोर देशमुख, सुधाकर पाटील कदम, उपसभापती डॉ. लक्ष्मण इंगोले, माजी जि. प. सदस्य रामराव भालेराव, विराज देशमुख, चेअरमन अवधुतराव पाटील कदम, नागोराव भांगे पाटील, संतोष मुंगल, माजी सरपंच आनंदराव सोळंके, संजय सोळंके, सचिन कल्याणकर, अमोल कपाटे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी आदींची उपस्थिती होती.

00000



जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड मार्फत
राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त रॅली संपन्न
नांदेड दि. 16 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त नालसा. व मालसा. यांचेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना व दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सहाय्याबाबत माहिती देण्यासाठी आज जिल्हा न्यायालय परिसर ते आयटीआय कॉर्नर पर्यत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे उद्घाटन माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे, गुरुद्वारा लंगर साहिबजी संतबाबा बलविंदर सिंघजी, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, वकिल संघाचे अध्यक्ष मिलींद लाठकर, जिल्हा सरकारी वकिल आशिष गोधमगावकर यांचे हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवुन रॅली मार्गस्थ करण्यात आली.
यावेळी जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, वकिल संघाचे सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंडेकर, अप्पर पोलीस अधिक्षक राठोड, औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे एस. एस. परगने, प्राचार्य डब्लु. एम. फारुकी, गटनिदेशक श्रीमती. उषा सरोदे, स्वा.रा.ती.विद्यापीठाचे समाजशास्त्र विभाग, विधी स्वयंसेवक, न्यायालयीन कर्मचारी, नांदेड येथील जिल्हा परिषद व इतर शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या रॅलीचा समारोप औद्योगीक प्रशिक्षण संस्था नांदेडच्या प्रांगणात करण्यात आला. औद्योगीक प्रशिक्षण संस्थेने त्यांचे प्रांगण उपलब्ध करुन दिले. श्री गुरुद्वारा लंगर साहिबजीच्यावतीने रॅलीच्या समारोपप्रसंगी रॅलीमधील सर्व उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांना अल्पोपहाराची व्यवस्था केली. शहर पोलीस व शहर वाहतुक शाखेने या रॅलीची सुरक्षा व सुव्यवस्था पाहिली. ही रॅली यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व ज्यांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य लाभले त्यांचे सर्वांचे सहकार्याबद्दल जि.वि.से.प्रा.चे सचिव आर. एस. रोटे यांनी आभार मानले.  
00000


घरोघरी जाऊन विधी सेवा प्राधिकरणाच्या
विविध योजनांच्या माहितीचा कार्यक्रम
            नांदेड दि. 16 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये व प्रमुख जिल्हा न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दि. अ. धोळकिया यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड कार्यालयामार्फत कायदेविषयक सेवा दिनानिमित्त
नांदेड तालुक्यातील पुयनी  येथे विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ मुकूंद वाकोडकर, पॅनल विधीज्ञ श्री. पावडे,  पॅनल विधीज्ञ सुभाष बेंडे यांनी लहान मुलांचे संरक्षण आणि विधी सेवा योजना या विषयावर घरोघरी जाऊन विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सहाय्याबाबत व नुकसान भरपाई बाबत योजनांची माहिती 11 नोव्हेंबर रोजी दिली. या कार्यक्रमामध्ये त्या परिसरातील 400 ते 450 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. 
         नांदेड तालुक्यातील तरोडा (खु) व पासदगाव या भागात विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ श्री. जामकर, पॅनल विधीज्ञ श्रीमती. स्वाती कुलकर्णी तसेच श्रीमती अनुराधा मठपती, सामाजिक कार्यकत्र्या यांनी मानसिक रोगी व मानसिकरित्या असक्षम व्यक्तीसाठी विधी सेवा योजना या विषयावर घरोघरी जाऊन माहिती 12 नोव्हेंबर 2019 रोजी दिली. तसेच उपस्थितांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सहाय्याबाबत व नुकसान भरपाई बाबतच्या योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये त्या परिसरातील 100 ते 200 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. 
          नांदेड तालुक्यातील सांगवी (बु), तरोडा व कामठा या भागात विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ श्रीमती. फेरोजा हाश्मी, पॅनल विधीज्ञ श्रीमती. संध्या सावंत, पॅनल विधीज्ञ श्रीमती सुकेशिनी गेडाम, पॅनल विधीज्ञ श्रीमती फातेमातुल सना, पॅनल विधीज्ञ श्रीमती रतन चाहेल तसेच स्वयंसेविका प्रियंका पवार यांनी गरिबी निर्मलनासाठी प्रभावी अंमलबाजावणी योजना या विषयावर घरोघरी जाऊन 13 नोव्हेंबर 2019 रोजी माहिती दिली. उपस्थितांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सहाय्याबाबत व नुकसान भरपाई बाबतच्या योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये परिसरातील 800 ते 810 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. 
            या कार्यक्रमाअंतर्गत नांदेड तालुक्यातील इतर गावात व नांदेड शहरातील इतर भागात होणाऱ्या शिबीराचा जास्तीतजास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दि. अ. धोळकिया,  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी केले आहे. 
00000


मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुन:निरीक्षण कार्यक्रम जाहीर
नांदेड दि. 16 :-  नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण मतदारसंघातील मतदार यादीत मतदार यादी दुरुस्‍तीसाठी भारत निवडणूक आयोग यांनी पुढीलप्रमाणे कार्यक्रम 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर  आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त  पुन:निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
पुर्व पुन:निरिक्षण कार्यक्रम मतदार पडताळणी कार्यक्रम (EVP) कॅम्‍पेन मोडमध्‍ये स्‍वीपच्‍या मदतीने आणि मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण व प्रमाणीकरण सारख्‍या इतर पुर्व-पुनरिक्षण कार्यक्रम सोमवार 11 नोव्‍हेबर ते शुक्रवार 20 डिसेंबर 2019 कालावधीत. इंटिग्रेटेड प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्दी सोमवार 30 डिसेंबर 2019 रोजी. दावे व हरकती स्‍वीकारण्‍याचा कालावधी सोमवार 30 डिसेंबर 2019 ते गुरुवार 30 जानेवारी 2020. विशेष मोहिम शनिवार 4 जानेवारी 2020 आणि रविवार 5 जानेवारी 2020, शनिवार 11 जानेवारी  आणि रविवार 12 जानेवारी 2020. दावे व हरकती निकाली काढणे सोमवार 10 फेब्रूवारी 2020 पूर्वी. प्रारुप मतदार यादीच्‍या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्‍या अंतिम प्रसिध्‍दी करीता आयोगाची परवानगी घेणे गुरुवार 20 फेब्रूवारी 2020 पूर्वी. डाटाबेसचे अदयावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई बुधवार 28 फेब्रुवारी 2020 पूर्वी. मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी सोमवार 2 मार्च 2020 होणार आहे.
मतदारांना सूचना प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात येत असून महानगर पालिका क्षेत्रातील विविध प्रभागात याद्यांचे वाचन करून प्रसिद्धी देण्यात येणार आहे. या कालावधीत मतदारांनी फॉर्म नं. 6, 7, 8, 8अ तहसिल कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मनपा नोडल अधिकारी यांच्याकडे जमा करावेत किंवा मतदार नोंदणीसाठी www.nvsp.in या वेबसाईडवर/संकेतस्‍थळावर प्राधान्‍याने ऑनलाईन फॉर्म भरावे. मतदारांना यादीची पाहाणी करुन विहीत मुदतीत मतदार यादीतील दुरुस्‍ती बाबतची कार्यवाही करुन राष्ट्रीय मतदार यादी कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे.
000000


चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आज उद्घाटन
           नांदेड दि. 16 :-  महिला व बाल विकास विभागांतर्गत शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी रविवार 17 नोव्हेंबर 2019 रोजी जनकल्याण बहु. प्रति. संच लहुजी साळवे नि. नि. बालकाश्रम वाडीपाटी साईबाबा मंदिराच्या बाजुला वसंत हायस्कुल जवळ नांदेड येथे चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन सकाळी 10 वा. करण्यात आले आहे.
       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे राहणार असून उद्घाटन म्हणून पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची उपस्थित राहणार आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, औरंगाबाद महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त एम. के. सिरसाट, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष श्रीमती डॉ. निरंजन कौर सरदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
    हा कार्यक्रम तीन दिवसांचा राहणार असून यात बालकांच्या विविध खेळांच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम यांनी दिली आहे.
00000




निमंत्रण                                                                               ई मेल संदेश
दि. 16 नोव्हेंबर 2019

प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक, साप्ताहिक वृत्‍तपत्र / दूरचित्रवाणी / केबल टि.व्‍ही.
नांदेड जिल्‍हा

विषय - "राष्ट्रीय पत्रकार दिन" कार्यक्रमाचे निमंत्रण...
 महोदय ,  
नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रम आज शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे दुपारी 2 वा. साजरा करण्यात येणार आहे.
            तरी कृपया "राष्ट्रीय पत्रकार दिन" कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

                                                                                                                  आपली विश्वासू
                   स्वा/-
              (मीरा ढास)
      जिल्‍हा माहिती अधिकारी,
                 नांदेड

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...