पिकाच्या नुकसानीचा अहवाल आल्यानंतर
केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना मदत
– केंद्रीय
राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे
नांदेड
दि. 16 :- संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाची अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या
शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
बसला आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचा अहवाल राज्य प्रशासनाकडून केंद्र
शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदत
मिळवून देण्यासाठी मी स्वतः आग्रह धरून शेतकऱ्यांना अर्थिक मदत देणार, असे प्रतिपादन
केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व
सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले.
खैरगाव येथील
आनंद कल्याणकर या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या
कुंटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दि. 16 नोव्हेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री
रावसाहेब पाटील दानवे खैरगाव येथे आले होते. यावेळी शेतातील पिकांची पाहणी करतांना
ते शेतकऱ्यांशी बोलत होते.
केंद्रीय
राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे पुढे म्हणाले, यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे.
त्यामुळे राज्याचा अहवाल केंद्राकडे सादर केल्यानंतर केंद्र सरकारच्यावतीनेही
जास्तीतजास्त मदत मिळवून देण्यासाठी आग्रह धरणार आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूसासह खरीप पिकांचे मोठे नुकसान
झाले. जिल्ह्यात सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून नुकसान भरपाईच्या मागणीचा
प्रस्तावही त्यांनी वरीष्ठ पातळीवर पाठविला आहे. त्यावरून लवकरच शेतकऱ्यांना मदत
देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अनेक
शेतकऱ्यांनी राज्यमंत्री पाटील दानवे यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेती, पडलेला बाजार भाव या समस्या मांडून शासनाने सरसकट कर्जमाफी
द्यावी, अशी आग्रही मागणी केली.
यावेळी खासदार
प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर,
आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, तहसिलदार सुजित नरहरे,
डॉ अजित गोपछडे, अॅड. किशोर देशमुख, सुधाकर पाटील कदम, उपसभापती डॉ. लक्ष्मण इंगोले,
माजी जि. प. सदस्य रामराव भालेराव, विराज
देशमुख, चेअरमन अवधुतराव पाटील कदम, नागोराव
भांगे पाटील, संतोष मुंगल, माजी सरपंच
आनंदराव सोळंके, संजय सोळंके, सचिन
कल्याणकर, अमोल कपाटे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी आदींची उपस्थिती होती.
00000
No comments:
Post a Comment