Thursday, September 12, 2019


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 24.01 मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात गुरुवार 12 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 24.01 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 384.21 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 648.04 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 67.82 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 12 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 42.88 (662.41), मुदखेड- 35.33 (852.33), अर्धापूर- 25.33 (607.31), भोकर- 47.00 (617.95), उमरी- 26.67 (606.11), कंधार- 25.50 (654.32), लोहा- 29.50 (630.56), किनवट- 20.00 (739.68), माहूर- 56.00 (752.84), हदगाव- 7.00 (523.69), हिमायतनगर- 5.33 (611.03), देगलूर- 6.00 (518.17), बिलोली- 8.20 (686.60), धर्माबाद- 13.67 (649.99), नायगाव- 15.80 (658.20), मुखेड- 20.00 (597.41). आज अखेर पावसाची सरासरी 648.04 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 10368.60) मिलीमीटर आहे.
00000
वृत्त क्र. 651
महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 12 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 16 सप्टेंबर 2019 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 16 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
0000
वृत्त क्र. 652
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत
पात्र विद्यार्थ्यांना नुतनीकरणाचे आवाहन
           नांदेड दि. 12 :- अनुसूचित जाती नवबौध्द घटकांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनशैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये जे पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात लाभ घेण्यासाठी सोमवार 30 सप्टेंबर 2019 र्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  संबंधितांनी कार्यालयीन वेळेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे पुढील कागदपत्रासह संपर्क साधावा.
       नुतनिकरणासाठी लागणारी कागदपत्रे  पुढील प्रमाणे आहेत. सन 2019-20 मध्ये महाविद्यालय, कॉलेजमध्ये प्रवेशित असल्याचे बोनाफाईड (ओरिजनल) बोनाफाईडवर खाडाखोड असल्यास ग्राहय धरले जाणार नाही. सन 2018-19 या मागील वर्षाची गुणपत्रिका (सत्यप्रत), जातीचे प्रमाणपत्र (सत्यप्रत), चालु वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (सत्यप्रत),     भाडेकरार नामा भाडेपावती 100 रुपये बॉन्ड पेपर वर (खाजगी कॉलेजच्या वसतिगृहात राहत असल्यास वसतिगृहाचा पुरावा).    बॅक पासबुक अद्यावत आएफएससी कोडसह (सत्यप्रत) आवश्यक राहतील.
         सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये स्वाधार योजनेसाठी अर्ज करुन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी वरील सुचनप्रमाणे कार्यालयास संपर्क करावा. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याने किमान 50 टक्के गुण मिळविलेले असावेत. गुण 3.          50 टक्के पेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही. जे विद्यार्थी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाकोणत्याही कोर्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते   जसे बी.ए/बी.एस.सी/बी.कॉम/पॉली तृतीय वर्ष, एम.ए/एम.एस.सी/एम.कॉम द्वितीय वर्ष, इंजिनिअंरिग/ मेडिकल/लॉ शेवटचे वर्ष इयत्ता 12 वी. अशा विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधु नये. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करुन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनीच वर सुचना गृहित धराव्यात. सोमवार 30 सप्टेंबर 2019 तारखेपर्यंत संपर्क झाल्यास विद्यार्थ्यांचा लाभ देण्यासाठी विचार केला जाणार नाही याची नों घ्यावी. हे आवाहन नव अर्जासाठी नसुन केवळ नुतनिकरण (रिनिवल) विद्यार्थ्यांसाठी असुन नव अर्ज स्विकारले जाणार नाही, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 653
धार्मिक अल्पसंख्यांक खाजगी शाळा,
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजनेतील
 प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 12 :-  धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना आणि डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजनेंतर्गत संबंधीत शाळा आणि मदरसा यांनी निर्देशीत केलेल्या त्रुटींची पूर्तता जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शनिवार 21 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव उच्चस्तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे.
सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी नांदेड जिल्हृयातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना आणि डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना या दोन योजनेंतर्गत अनुक्रमे अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळा व मदरशांकडून विहित मुदतीत अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्याबाबत राज्य अल्पसंख्यांक विकास विभागाच्या परिपत्रकानुसार नांदेड जिल्ह्यातील सात शाळा व तेवीस मदरसांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत.
या प्रस्तावाची शासन निर्णयातील निकषांनुसार तपासणी केली असता परिपूर्ण प्रस्ताव आढळून आले नाही. अनुदान मागणीसाठी शासनास सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावात आवश्यक असणऱ्या दस्ताऐजांबाबत काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत. याविषयी संबंधित शाळा व मदरसांना निर्देशीत त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शनिवार 21 सप्टेंबर 2019 पर्यंत निश्चित कालावधी देण्यात आला आहे. जेणेकरुन त्रुटींची पूर्तता करुन शासनास प्रस्ताव उच्चस्तरीय निवड समितीच्या शिफारसीने सादर करता येतील.
संबंधीत शाळा आणि मदरसा यांनी निर्देशीत केलेल्या त्रुटींची पूर्तता जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या कार्यालयात शनिवार 21 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत. या योजनेंतर्गत विहित मुदतीत प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता कार्यालयास प्राप्त न झाल्यास अनुदान मागणीचे प्रस्ताव त्रुटी पूर्ततेअभावी शासनास सादर करता येणार नाहीत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव उच्चस्तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 654
     जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात शुक्रवार 27 सप्टेंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शुक्रवार 13 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 27 सप्टेंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...