Sunday, May 16, 2021

 

45 वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी 

कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लस उपलब्ध 

  प्रत्येक केंद्रांना 100 डोस 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यातील 45 पेक्षा अधिक वय वर्षे असलेल्या ज्या नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे अशा नागरिकांना आज कोविशील्ड व कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केला आहे. लसीच्या उपलब्धतेप्रमाणे जिल्ह्यातील एकुण 92 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. 

 

सोमवार 17 मे 2021 साठी प्रत्येक केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिळाले आहेत. ज्या नागरिकांनी पहिला कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे त्यांनी लसीकरण केंद्रावर उपलब्धतेप्रमाणे लस घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे. लस उपलब्ध झाल्याप्रमाणे टप्याटप्यात सर्वांना लसीकरण केले जाईल. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करुन लसीकरणाबाबतची वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन केले त्यांनी केले.

 

नांदेड शहरात पुढीलप्रमाणे लसीकरण केंद्र आहेत. 

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको या 8 केंद्रावर 45वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा लस उपलब्ध आहे. मनपा क्षेत्रात स्त्री रुग्णालय येथे कोव्हॅक्सिन तर शहरी क्षेत्रात मोडणारे सर्व उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय अशा एकुण 16 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन ही लस आणि ग्रामीण क्षेत्रात मोडणाऱ्या एकुण 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशिल्ड ही लस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांना नमूद केल्या प्रमाणे प्रत्येकी शंभर डोस उपलब्ध झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात 16 मे पर्यंत कोविशिल्डचे 3 लाख 34 हजार 930  कोव्हॅक्सिनचे 1 लाख 1 हजार 800 डोस असे एकुण 4 लाख 36 हजार 730 डोस मिळाले आहेत. जिल्ह्यात 15 मे 2021 पर्यंत एकुण 3 लाख 96 हजार 200 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

 

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 12 ते 16 आठवडे या कालावधीत म्हणजेच 84 दिवसानंतर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उपलब्ध असलेला कोविड-19 लसीचासाठा हा केवळ 45 वर्षावरील लाभार्थ्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यासाठी व दुसऱ्या डोसचे लाभार्थी नसल्यास प्रथम डोससाठी वापरण्यात येणार आहे. उपलब्ध कोव्हॅक्सिनची लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांना फक्त दुसरा डोससाठी वापरण्यात येणार आहे. वय 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावून अनावश्यक गर्दी करु नये. तसेच कोविड-19 लसीकरण कार्यक्रमास सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत केले आहे.

0000

गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) दि. 16 :- राज्याचे गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती व तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

रविवार 16 मे 2021 रोजी मुंबई येथून खासगी विमानाने रात्री 9.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकिय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. रात्री 9.45 वा. शासकिय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. 

सोमवार 17 मे 2021 रोजी शासकिय विश्रामगृह नांदेड येथून सकाळी 8 वा. मोटारीने हिंगोली  जिल्ह्यातील कळमनुरीकडे प्रयाण. सकाळी 10 वा. कळमनुरी येथे आगमन व स्व. खासदार राजीवजी सातव यांच्या अंत्यविधीस उपस्थिती. दुपारी 12 वा. कळमनुरी येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. शासकिय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2.45 वा. शासकिय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. नांदेड विमानतळ येथून खासगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 


 

409 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 233 व्यक्ती कोरोना बाधित

10 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 532 अहवालापैकी 233 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 141 तर अँटिजेन तपासणीद्वारे 92 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 86 हजार 949 एवढी झाली असून यातील 81 हजार 539 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 235 रुग्ण उपचार घेत असून 128 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 14,15 व 16 मे 2021 या तीन दिवसांच्या कालावधीत 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 804 एवढी झाली आहे. दिनांक 14 मे 2021 रोजी  किनवट कोविड रुग्णालय येथे शिवाजी चौक किनवट येथील 65 वर्षाचा पुरुष, दिनांक 15 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे देगलूर येथील 54 वर्षाचा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालयात देगलूर येथील 85 वर्षाचा पुरुष, आशा कोविड रुग्णालयात तरोड नांदेड येथील 51 वर्षाची महिला व नांदगाव ता. नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष. दिनांक 16 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील 65 वर्षाची महिला व वाडी नांदेड येथील 85 वर्षाची महिला, मुखेड येथील 55 वर्षाची महिला, हदगाव कोविड रुग्णालयात हदगाव तालुक्यातील ल्याहरी येथील 55 वर्षाची महिला, सह्याद्री कोविड रुग्णालय येथे कंधार तालुक्यतील कौठा येथील 67 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 49, बिलोली 4, कंधार 3, मुखेड 3, नांदेड ग्रामीण 11, देगलूर 8, किनवट 1, नायगाव 5, अर्धापूर 5, धर्माबाद 9, लोहा 11, उमरी 2, भोकर 5, हदगाव 11, मुदखेड 9, हिंगोली 5 व्यक्ती बाधित आढळले तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 40, बिलोली 2 लोहा 2, उमरी 3, नांदेड ग्रामीण 18, देगलूर 8, माहूर 4, परभणी 3, अर्धापूर 1, हिमायतनगर 1, मुदखेड 1, यवतमाळ 2, भोकर 3, कंधार 2, मुखेड 2 असे एकूण 233 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 409 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 18, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 156, मालेगाव टिसीयू कोविड रुग्णालय 1, धर्माबाद तालुक्यातंर्गत 9, अर्धापूर तालुक्यातंर्गत 9, माहूर तालुक्यातंर्गत 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, मुखेड कोविड रुग्णालय 29, मुदखेड कोविड केअर सेंटर 9, कंधार कोविड केअर सेंटर 8, बिलोली तालुक्यातंर्गत 12, खाजगी रुग्णालय 86, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 6, नायगाव तालुक्यातंर्गत 1, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 11, हदगाव 15, लोहा तालुक्यांतर्गत 11 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 3 हजार 235 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 94, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 59, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 66, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 21, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 61, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 43, देगलूर कोविड रुग्णालय 6, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 9, बिलोली कोविड केअर सेंटर 85, नायगाव कोविड केअर सेंटर 9, उमरी कोविड केअर सेंटर 18, माहूर कोविड केअर सेंटर 14, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 21, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 22, कंधार कोविड केअर सेंटर 1, धर्माबाद कोविड केअर सेंटर 25, मुदखेड कोविड केअर सेंटर 5, अर्धापूर कोविड केअर सेंटर 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11, बारड कोविड केअर सेंटर 14, मांडवी कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 4, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 4, एनआरआय कोविड केअर सेंटर 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 718, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 317, खाजगी रुग्णालय 593 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 67, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 82, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 65, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 98 हजार 116

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 890

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 86 हजार 949

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 81 हजार 539

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 804

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.77 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-36

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-225

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 235

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-128.

00000

 

सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  राज्याचे सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

रविवार 16 मे 2021 रोजी पुणे येथून खाजगी विमानाने दुपारी 4 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकिय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. 

सोमवार 17 मे 2021 रोजी नांदेड येथून सकाळी 5.30 वा. मोटारीने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीकडे प्रयाण. सकाळी 7 वा. कळमनुरी येथे आगमन व स्व. खासदार राजीवजी सातव यांच्या अंत्यविधी कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार कळमनुरी येथून मोटारीने शासकिय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण व सोईनुसार शासकिय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.

00000

 

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) दि. 16 :- राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

रविवार 16 मे 2021 रोजी मुंबई येथून विमानाने सायं 7.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकिय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. शासकिय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. 

सोमवार 17 मे 2021 रोजी सकाळी 8 वा. शासकिय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. हिंगोली शासकिय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.35 वा. हिंगोली येथून कळमनुरीकडे प्रयाण. सकाळी 11.10 वा. कळमनुरी येथे आगमन व दिवंगत राजीव सातव यांच्या अंत्यसंस्कार विधीस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. कळमनुरी येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण. दुपारी  2.45 वा. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 3.15 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) दि. 16 :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

रविवार 16 मे 2021 रोजी मुंबई येथून खासगी विमानाने सायं 7.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकिय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. रात्री 8 वा. शासकिय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. 

सोमवार 17 मे 2021 रोजी शासकिय विश्रामगृह नांदेड येथून सकाळी 8 वा. मोटारीने हिंगोली  जिल्ह्यातील कळमनुरीकडे प्रयाण. सकाळी 10 वा. कळमनुरी येथे आगमन व स्व. खासदार राजीवजी सातव यांच्या अंत्यविधीस उपस्थिती. दुपारी 12 वा. कळमनुरी येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. शासकिय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2.45 वा. शासकिय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. नांदेड विमानतळ येथून खासगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...