Monday, March 30, 2020

नांदेड पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी तसेच जिल्हा सीमा भागावर निरीक्षण करण्यासाठी आजपासून ड्रोन कॅमेराने निरीक्षण करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाला या ड्रोन कॅमेऱ्याचे फोटो आणि शूटिंग याचा उपयोग कोरोनाच्या प्रतिबंधक उपायांमध्ये प्रभावी ठरणार आहे. या उपक्रमाविषयी पोलीस अधीक्षक विजय मगर...





भोजन पुरवठा ई-निविदेत
सहभागी होण्याचे आवाहन
नांदेड दि. 30 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी नमूद तपशिला प्रमाणे पुरवठा ठेके देण्यासाठी ई-निविदा महा ई-टेंडर या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या ई-निविदेमध्ये जास्तीत-जास्त इच्छूक पुरवठाधारकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.   
शासकिय आश्रमशाळा (सोळा) तपशील- भाजीपाला व मटन पुरवठा, प्रसिद्ध दिनांक 26 मार्च 2020 तर निविदा उघडण्याचा दिनांक 15 एप्रिल 2020 आहे. शासकिय आश्रमशाळेा (सोळा)- अंडी / केळी पुरवठा प्रसिद्ध दिनांक 23 मार्च 2020 तर निविदा उघडण्याचा दिनांक 13 एप्रिल 2020 आहे. शासकिय आदिवासी मुलांचे / मुलींचे वसतीगृह (बारा)- भोजन पुरवठा करण्यासाठी प्रसिद्धीचा दिनांक 23 मार्च 2020 तर निविदा उघडण्याचा दिनांक 8 एप्रिल 2020 असा आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.
000000


मालवाहतूक करणाऱ्या
वाहनांवरील पथकर वसुलीस स्थगिती
नांदेड दि. 30 :- कोरोना साथीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील पथकर स्थानकावर मालवाहतुक करणाऱ्या वाहनांवरील पथकर वसुलीस 29 मार्च 2020 मध्यरात्री पासून राज्य शासनाने अधिसुचनेद्वारे स्थगिती दिली आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील नांदेड-नर्सी रस्त्यावरील बरबडाफाटा (साखळी क्रमांक 287 / 400 खानापुर फाटा (साखळी क्रमांक 331 / 400) शिरुरताजबंद मुखेड नरसी रस्त्यावरील हाडोळती (साखळी क्र. 10/00), खरब खंडगाव (साखळी क्रमांक 50/00) विजयनगर (साखळी क्रमांक 90/00) या पथकर स्थानकावरील माल वाहतुक करणाऱ्या (Goods Transport) वाहनांवरील पथकर वसुलीस शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगिती दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी दिली आहे.
000000


जीवनावश्यक वस्‍तुंचा पुरवठा करणारी
कारखाने, उद्योग कार्यान्वित ठेवण्याचे
जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे निर्देश
नांदेड, दि. 30 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊन कालावधीत जीवनावश्‍यक वस्‍तुंचा पुरवठा व उत्‍पादन सुरळीत राहणे आवश्‍यक असल्याने त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित विभाग प्रमुखांना विविध निर्देश दिले आहेत.    
उपप्रादेशीक  परिवहन अधिकारी यांना आंतरराज्‍य, आंतर जिल्‍हा, आंतर तालुका वाहतुक  नियंत्रण व त्‍या संबंधाने  येणाऱ्या तक्रारी सोडविण्‍याची जबाबदारी देण्‍यात आली आहे. लॉकडाऊनच्‍या कालावधीत  जीवनावश्‍यक वस्‍तुंचे वाहतुकी संबंधाने आवश्‍यक ती कामे पार पाडावी. उपप्रादेशीक परिवहन अधिकारी अविनाश राऊत मो. क्रं. ९८२२२४६०२३ या कार्या‍न्‍वयीन यंत्रणेशी संपर्क साधावा.
औद्योगिक विकास महामंडळाने लॉकडाऊनच्‍या कालावधीत जीवनावश्‍यक वस्‍तुंचे सतत उत्‍पादन, प्रक्रिया करणारे विविध कारखाने, उद्योग तसेच या वस्‍तुंचा पुरवठा करणारी मोठी घाऊक विक्रेते यांची आस्‍थापना या कालावधीत चालू राहतील याची दक्षता घ्‍यावी. त्यानुसार विविध उपाययोजना कराव्यात. सदर विविध कारखाने, उद्योग, जीवनावश्‍यक वस्‍तुंचा पुरवठा करणारी मोठी घाऊक विक्रेते यांना आवश्‍यक असणारा कामगार वर्ग उपलब्‍ध न झाल्‍यास सहायक कामगार आयुक्‍त यांचेशी समन्‍वय साधून आवश्‍यक कार्यवाही करावी. औद्यो. विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांचा मो. क्रं. ९९७५५९७७११, महामंडळाचे कार्यकारी अभियंता व्‍यंकट मुद्दे यांचा मो. क्रं. ८८३००३३९३०  असा आहे.  
लॉकडाऊनच्‍या कालावधीत जीवनावश्‍यक वस्‍तुंचे सतत  उत्‍पादन, प्रक्रिया  करणारे विविध कारखाने, उद्योग, जीवनावश्‍यक वस्‍तुंची पुरवठा करणारी मोठी घाऊक विक्रेते यांची आस्‍थापना यांना आवश्‍यक असणारा कामगार वर्ग उपलब्‍ध न झाल्‍यास या कामगार उपलब्‍धेची आवश्‍यक कार्यवाही करावी. या काळात उद्भवणाऱ्या कामगारांशी संबंधीत अतर अडचणी संबंधाने समन्‍वयक म्‍हणून कार्यवाही करावी. सहायक  कामगार आयुक्‍त सय्यद मोहसीन मो. क्रं. ७२७६२१६०६६ यांच्‍याशी संपर्क साधावा.  
या अनुषंगाने कामे पार पाडतांना कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासंबंधी यापूर्वी वेळोवेळी निर्गमित करण्‍यात आलेले शासन निर्णय, विविध परिपत्रके, जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आदेशातील नमुद अटी व शर्तीच्‍या अधिन राहून आवश्‍यक ती कार्यवाही करावी.  या कामात कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांच्‍याकडून कुचराई, दिरंगाई  केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास त्‍यांचे विरुध्‍द महाराष्‍ट्र कोव्‍हीड -19 उपायोजना नियम 2020 मधील तरतुद व आपत्‍ती व्‍यवस्‍थापना अधिनियम 2005 च्‍या कलम 51 व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्‍यात येईल, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.   
00000


कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ;
कामगार स्थलांतरीत होणार नाहीत यादृष्टिने
आस्थापना प्रमुखांनी उपाययोजना कराव्यात
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड, दि. 30 :- कामगार स्थलांतरीत होणार नाहीत यादृष्टिने विविध आस्थापना प्रमुखांनी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी आदेशाद्वारे दिले आहेत.
लॉकडाऊन आदेशामुळे  बंद उद्योग व्यवसायातील, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समितीतील  प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापीत कामगार  यांचे स्थलांतरामुळे लॉकडाऊन सोशल डिस्टन्स उपाययोजनेच्या  मानकाचे  उल्लंघन  होऊ नये यासाठी जिल्हा उपनिबंधक (सह.संस्था), महा. औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, सहायक कामगार आयुक्त, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंतप्रधान ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सर्व कार्यकारी अभियंता या विभागांच्या अधिनस्त सर्व आस्थापना प्रमुखांमार्फत कामगारांच्या बाबतीत पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. 
नमूद ठिकाणी असलेले कामगार हे  स्थलांतरीत होणार नाहीत यादृष्टिने  आस्थापना  प्रमुखांनी रस्ते, इमारत, इतर बांधकामासाठी  कंत्राटदाराकडील कामगार सुरक्षा रक्षक नेमावे. यातून कामगार स्थलांतरीत होवून  इतर ठिकाणी आढळल्यास त्याची  जबाबदारी आस्थापना प्रमुखांवर राहील. कर्मचारी, कामगारांसाठी संबंधीत साखर कारखाना, आस्थापना प्रमुख, संबंधित कंत्राटदार यांनी त्यांच्यासाठी आवश्यक  असलेली  सुविधा देण्यासाठी  निवारागृह, भोजनाची व्यवस्था करावी. अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्स उपाययोजनेची अंमलबजावणी करावी. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी, औषोधोपचाराची  काळजी घ्यावी.
या कामात  दिरंगाई  केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र कोव्हीड- 19 उपायोजना नियम 2020 मधील तरतुद व भारतीय दंड संहिताचे कलम 188 नुसार कारवाईची तरतूद आहे, याची नोंद घ्यावी. कामगाराची नियमित माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील समन्वय अधिकारी तहसीलदार  (सामान्य)  प्रसाद कुलकर्णी dygennanded@gmail.com या ई-मेलवर कळ‍वावी. अन्य तक्रारी, अडचणी, अधिक माहितीसाठी महा. औद्यो. विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी श्री भिंगारे मो.  9975597711  कामगार आयुक्त सय्यद मोहसीन सहायक  मो. 7276216066  यांच्याशी संपर्क साधवा.
अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कामात दिरंगाई, निष्काळजीपणा केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51 व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...