Tuesday, October 26, 2021

नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 441 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4  तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 381 एवढी झाली असून यातील 87 हजार 704 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 25 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, धर्माबाद 1 असे एकूण 4  बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 4  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1,  मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 3  व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 25 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 20 अशा एकूण 25 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 51 हजार 305

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 47 हजार 689

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 381

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 704

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

 

 

सुधारीत वृत्त 

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकरिता नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सशुल्क विशेष वाहन सेवा 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- देगलूर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक शनिवार  दिनांक  30 ऑक्टोबर रोजी  मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या  प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून सशुल्क बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

देगलूर व बिलोली  हे दोन तालुके वगळता उर्वरित 14 तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकांवरून  दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी देगलूर येथे निवडणुकीच्या कर्तव्यावर जाण्यासाठी ही बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

30 ऑक्टोबर रोजी मतदानाची कार्यवाही संपल्यानंतर देगलूर तहसील कार्यालय परिसरातून मुख्यालयात परत जाण्यासाठी ही सशुल्क बस सेवा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन  इटनकर यांनी दिली आहे. 

नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने सदर बससेवेचा वापर करावा असे आवाहन  प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे .

00000

मतदानाच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात तर मतमोजणीच्या दिवशी देगलूर न.पा.हद्दीत मद्यविक्रीस मनाई

 

मतदानाच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात तर

मतमोजणीच्या दिवशी देगलूर न.पा.हद्दीत मद्यविक्रीस मनाई

नांदेड, (जिमाका) दि. 26 :-   देगलूर बिलोली  विधानसभेची पोटनिवडणूक दिनांक 30 ऑक्टोबर रोजी होणार असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान / मतमोजनीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास शासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 135 (सी), मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री  विक्रीच्या नोदवह्या ई) नियम 1969 महाराष्ट्र देशी दारू नियम 1973, विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम 1952, नियम 1968 या संदर्भात  नियमान्वये देण्यात आलेल्या अनुज्ञप्ती संबंधित दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात बाबत अनुज्ञप्ती धारकांवर बंधन आहे. 

मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर मतदानाचा दिवस  दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 30 ऑक्टोबर सायंकाळी 6 पर्यंत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे.मतमोजनीचा दिवस दिनांक 2 नोव्हेबर 2021 रोजी मतमोजणी असल्याने मद्यविक्री व अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठी संपूर्ण देगलूर संपूर्ण देगलूर नगरपरिषद हद्दीत मद्यविक्री बंद राहील. सदर आदेशाचे तंतोतंत पालन  करण्यात यावे.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मुंबई दारूबंदी कायदा 1945 चे कलम 54 व 56 अन्वये तात्काळ रद्द करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...