मतदानाच्या
दिवशी संपूर्ण जिल्ह्यात तर
मतमोजणीच्या
दिवशी देगलूर न.पा.हद्दीत मद्यविक्रीस मनाई
नांदेड, (जिमाका) दि. 26 :- देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक दिनांक 30 ऑक्टोबर रोजी होणार असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी
मतदान / मतमोजनीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास शासनाच्या वतीने मनाई करण्यात आली
आहे.
यासंदर्भात
जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 135 (सी), मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री विक्रीच्या
नोदवह्या ई) नियम 1969 महाराष्ट्र देशी दारू नियम 1973, विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम 1952, नियम 1968 या संदर्भात नियमान्वये
देण्यात आलेल्या अनुज्ञप्ती संबंधित दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात बाबत
अनुज्ञप्ती धारकांवर बंधन आहे.
मतदान
संपण्यापूर्वी 48 तास अगोदर मतदानाचा दिवस दिनांक
28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 30 ऑक्टोबर सायंकाळी 6 पर्यंत संपूर्ण
नांदेड जिल्ह्यात कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे.मतमोजनीचा दिवस दिनांक 2 नोव्हेबर
2021 रोजी मतमोजणी असल्याने मद्यविक्री व अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठी संपूर्ण
देगलूर संपूर्ण देगलूर नगरपरिषद हद्दीत मद्यविक्री बंद राहील. सदर आदेशाचे तंतोतंत
पालन करण्यात यावे.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मुंबई
दारूबंदी कायदा 1945 चे कलम 54 व 56 अन्वये तात्काळ रद्द करण्यात येईल असे
जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
000
No comments:
Post a Comment