तत्पर व युध्दपातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे विष बाधेतील बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर
- कोणतीही जीवीतहानी नाही
तत्पर व युध्दपातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे विष बाधेतील बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर
महासंस्कृती महोत्सवामध्ये शिवकालीन
पारंपारीक खेळ सादर करण्याची खेळाडूंना संधी
नांदेड (जिमाका) दि. 7 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती इ.बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत पाच दिवसीय "महासंस्कृती महोत्सवाचे" आयोजन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
त्याअनुषंगाने नांदेड जिल्हामध्ये जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 15व 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पोलीस कवायत मैदान, वजिराबाद, नांदेड येथे महासंस्कृती महोत्सव अंतर्गत शिवकालीन पारंपारीक खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये खो-खो व कबड्डी या खेळामध्ये सन 2023-24 या वर्षातील शालेय तालुकास्तरावर 19 वर्षाआतील मुले-मुली संघनी प्रथम क्रमांक संपादन केलेल्या संघास संधी देण्यात येणार आहे. कुस्ती या खेळ प्रकारासाठी 19 वर्षाआतील मुले-मुली खेळाडूंना आपली नांवे नोंदविता येईल व आटयापटया, लेझीम, लाठीकाठी, रस्सीखेच, गतका, लगोरी व मल्लखांब (पुरुष व महिला खुला गट) या खेळाचा समावेश करण्यात आला आहे.
या क्रीडा प्रकारात पारंगत असणाऱ्या जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी 13 फेब्रुवारी, 2024 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज भरुन खेळाडूची/ संघाची प्रवेशिका ई-मेल आयडी dsonanded@rediffmail.com यावर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड येथे प्रत्यक्ष सादर करावेत.
उक्त कालावधी नंतर प्राप्त प्रवेशअर्जाची छानणी होऊन समितीद्वारे अंतिम करण्यात येवून, निवडक खेळाडूं/ संघास "महासंस्कृती महोत्सवात" सहभाग घेता येईल. वैयक्तिक व सांघीक खेळ प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन करणाऱ्या खेळाडू/ संघास रोख पारीतोषीक व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या शुभ- हस्ते पुरुष व महिला गटात स्वतंत्र देण्यात येणार आहे असे महासंस्कृती महोत्सव समिती नांदेड तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 112
रस्ता सुरक्षा विषयी माहिती व प्रबोधनासाठी
जिल्ह्यात एलईडी वाहनाद्वारे जनजागृती
वृत्त क्रमांक 111
अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार
नांदेड (जिमाका) दि. 7 :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षापर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, अत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते.
तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी, पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गाने न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा लाभ घ्यावा. प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1 ते 3 यावेळेत अधिक्षक माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्यगृहचे अधीक्षक वर्ग-2 एस. एम. पुजलवार यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...