Friday, January 8, 2021

 

46 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

40 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 8 :- शुक्रवार 8 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 46 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 24 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 22 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 924 अहवालापैकी 877 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 772 एवढी झाली असून यातील 20 हजार 638 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 356 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 8 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. गुरुवार 7 जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील हाडोळी येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 577 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा  रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 17, नायगाव तालुक्यांतर्गत 7, खाजगी रुग्णालय 7, मुखेड कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 4, लोहा तालुक्यांतर्गत 2 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.79 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 13, मुखेड तालुक्यात 2, लोहा 2, परभणी 1, नांदेड ग्रामीण 4, माहूर 1, अर्धापूर 1 असे एकुण 24 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 12, नायगाव तालुक्यात 1, हिंगोली 2, मुखेड 2, अर्धापूर 4, परभणी 1 असे एकुण 22 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 356 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 25, मुखेड कोविड रुग्णालय 20, हदगाव कोविड रुग्णालय 1, महसूल कोविड केअर सेंटर 10, देगलूर कोविड रुग्णालय 16, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 155, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 53, हैद्राबाद येथे संदर्भीत 3, खाजगी रुग्णालय 34 आहेत.   

शुक्रवार 8 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 173, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 61 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 88 हजार 690

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 62 हजार 801

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 772

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 638

एकुण मृत्यू संख्या-577

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.79 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-01

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-356

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-08.          

00000

 

 

शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी

आधारकार्ड, मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी   

नांदेड, (जिमाका) दि. 8 :- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेंतर्गत अंत्‍योदय, प्राधान्‍य  कुटूंब योजना व शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आधारकार्ड  व मोबाईल क्रमांकाची Ekyc रास्‍तभाव दुकानदाराकडे रविवार 31 जानेवारी 2021 पूर्वी  करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे. 

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शिधापत्रिकाधारकांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक सत्‍यापण करुन घ्यावे असे कळविले आहे.  ज्या शिधापत्रीका धारकांनी आपले आधार व मोबाईल क्रमांक अपडेट केले नाहीत. त्‍या शिधापत्रीकाधारकांना धान्‍य वाटप करता येणार नाही. अशा शिधापत्रिकाची वगळणी डिलीट करण्‍यात येणार आहेत. हे लाभार्थी अन्‍नधान्‍यापासुन वंचित राहणार आहेत.  यांची सर्वस्‍वी जबाबदारी शिधापत्रीका धारकांची राहणार आहे. असेही त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने

जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश

नांदेड, दि. 8 (जिमाका) :- जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष) एफएल / बीआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. 

जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2020-21 संदर्भात 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारी रोजी मतमोजणी होत आहे. ग्रामपंचायत मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. जिल्ह्यात मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदार म्हणजे 13 जानेवारी 2021 रोजी सायं. 5.30 वाजेपासून मतदानाच्या अगोदरचा दिवस 14 जानेवारी संपूर्ण दिवस, मतदानाचा दिवस 15 जानेवारी रोजी सायं. 5.30 पर्यंत अनुज्ञप्ती बंद राहतील. तसेच मतमोजणी होत असलेल्या शहर व तालुक्याच्या ठिकाणी 18 जानेवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.  या आदेशाचा भंग केल्यास अनुज्ञप्तीधारका विरुद्ध कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

000000

नांदेड तालुका ग्रामपंचायत निवडणुकीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

प्रत्‍यक्ष मतदान प्रक्रियेतून प्रशिक्षण

नांदेड, दि. 8 (जिमाका) :- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020 नांदेड तालुक्‍याचे दुसरे प्रशिक्षण शंकरराव चव्‍हाण सभागृहात नुकतेच संपन्‍न झाले आहे. प्रशिक्षणाची सुरुवात तहसीलदार किरण अंबेकर यांच्‍या मार्गदर्शनातून झाली. यावेळी नायब तहसीलदार (निवडणूक) सौ. उर्मीला कुलकर्णी व सारंग चव्हाण उपस्थित होते. दुसरे प्रशिक्षण हे प्रत्‍यक्ष मतदान प्रक्रियेतून दिले जाणार आहे. या माध्‍यमातुन मतदानाच्‍या  दिवशी केंद्रावर मतदान प्रक्रिया कशी  पार  पाडावी आणि आलेल्‍या  विविध समस्‍यांना कसे  तोंड दयावे हे  प्रत्‍यक्ष प्रशिक्षण पिठावर दाखविण्‍यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका या संवेदनशील असतात त्‍यामुळे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्‍येक प्रशिक्षण अत्यंत जबाबदारीने घेणे आवश्‍यक आहे, असे निर्देश तहसिलदार किरण अंबेकर यांनी दिले.   

जिल्ह्यात सर्वात जास्‍त ग्रामपंचायतच्‍या निवडणुका आहेत. नांदेड तालुक्‍यात एकूण 73 पैकी 65  ग्रामपंचायतच्‍या  निवडणूका होवू घातल्‍या आहेत. त्‍यासाठी 253 मतदान केंद्रे उभारली असून ज्‍या  मतदान केंद्रावर 800 पेक्षा जास्‍त मतदार आहेत. त्या मतदान केंद्राचे रुपांतर दोन मतदान केंद्रात केले आहे. नांदेड तालुक्‍यात कमाल मतदार 860 एका  केंद्रावर असून मतदान घेणे सोपे व्‍हावे. म्‍हणून सर्व व्‍यवस्‍था चोखपणे तयार करण्‍यात आली आहे. किमान मतदार असलेले केंद्र 200 ते  300 मतदाराचे आहे. यासाठी वाहन, पोलीस व्‍यवस्‍था, रुट गाईड, या सर्व व्‍यवस्‍था अत्‍यंत बारकाईने तयार करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यामुळे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. याप्रसंगी प्रत्‍येकांनी निवडणूकीचे कार्य जबाबदारीने पूर्ण करावे. जर निवडणूकीच्‍या कामात टाळाटाळ, निष्‍काळजीपणा कोणी करत  असतील तर त्‍यांच्‍या विरुध्‍द निवडणूक कायदाने गुन्‍हे  दाखल करण्‍यात येणार असल्‍याचे स्‍पष्‍ट निर्देश अंबेकर यांनी दिले आहेत.

 

आजचे दुसरे प्रशिक्षण हे प्रशिक्षण पिठावर प्रत्‍यक्ष मतदान केंद्राची  उभारणी करुन देण्‍यात आले. सारंग चव्‍हाण  यांनी केंद्रावर येत  असलेल्‍या  विविध समस्‍यांचे निराकरण प्रत्‍यक्ष कृतीतून करुन दाखविले. प्रथम मतदान केंद्राध्‍यक्ष बालासाहेब कच्‍छवे, मतदान अधिकारी पहिला संजय कोठाळे, मतदान अधिकारी कविता जोशी, शोभा माळवदकर यांच्‍या एका टिमने ईव्हिएम मशीनसह प्रात्‍यक्षिक दाखविले.  

मतदान प्रतिनिधी म्‍हणून मुरलीधर सोनकांबळे, हनुमंत राठोड, नियमित मतदार संकेत पवार, दिव्‍यांग मतदार कोंडीबा नागरवाड, टेंडर ओट करण्‍यासाठी नझरुल इस्‍लाम, अंध मतदार म्‍हणून किरण मापारे, मतदानास नकार देणारा मतदार म्‍हणून राजेश कुलकर्णी, तोतय्या मतदार म्‍हणून दादाराव मगर  यांनी भुमिका पार  पाडली. सारंग चव्‍हाण नायब तहसी


लदार निवडणूक यांनी प्रत्‍यक्ष प्रशिक्षणाला पिपीटीच्‍या माध्‍यमातुन सुरुवात केली. याचे अभ्‍यासपूर्ण सादरीकरण नायब तहसीलदार निवडणूक सारंग चव्‍हाण यांनी केले. सादरीकरण करतांना सारंग चव्‍हाण  यांनी कशाप्रकारे साहित्‍य  स्‍वीकृतीपासून मतदान केंद्रावर प्रत्‍यक्ष मतदान घ्‍यावे. याचे विविध स्‍लाईडच्‍या माध्‍यमातून प्रशिक्षण दिले. मतदान घेताना कोणती खबरदारी घ्‍यावी, विविध संवेधानीक, असंवेधानीक लिफाफे, विविध अर्ज कसे  भरावे याचे व्‍यवस्‍थीत  प्रशिक्षण देवून शंकांचे समाधान केले. शेवटी मतदान  अधिकारी व कर्मचारी यांना प्रश्‍न  विचारण्‍यात संधी देवून त्‍यांच्‍या सर्व शंकांचे निरसन केले. 

आजच्‍या या प्रशिक्षणास दोन  सत्रात एकूण 315 टिमला आदेश देवून प्रशिक्षण देण्‍यात आले. प्रशिक्षणानंतर प्रत्‍यक्ष मतदान यंत्र हाताळण्‍याची प्रशिक्षण शासकिय ग्रंथालयात दहा प्रशिक्षण केंद्रातुन देण्‍यात  आले. या कायक्रमाचे सुत्र संचालन व आभार नायब तहसीलदार निवडणूक सौ. उर्मीला लक्ष्‍मीकांत कुलकर्णी यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्‍वी करण्‍यासाठी अव्‍वल कारकुन कुणाल रंगराव जगताप, अव्‍वल कारकुन दत्‍तात्रय पोकले, अव्‍वल कारकुन राजकुमार कोटूरवार,राजेश कुलकर्णी, हनमंत जाधव महसुल सहायक, व्‍यंकटी मुंडे, माया मुनेश्‍वर बालासाहेब कच्‍छवे, संजय कोठाळे, कविता जोशी, शोभा माळवदकर यांनी सहकार्य केले.

00000





 

कोविड-19 लसीकरणाची जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम 

नांदेड, (जिमाका) दि. 8 -  प्रस्तावित कोविड-19 लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी  रंगीत तालीम आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत मनपा शेजारील आरोग्य विभागाच्या इमारतीत संपन्न झाली.

यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. एस.बी.शिरसीकर, मनपाचे डॉ. बदीयोद्दीन, वैद्यकीय अधिकारी  डॉ. विक्रम शिलेदार तसेच कोवीड-19 व्हॅक्सीनेशन पार पाडणारे वैद्यकीय कर्मचारी व अधिपरीचारिका यांची उपस्थिती होती. 

कोविड-19 लसीकरणासाठी शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य खबरदारीच्या उपाययोजना घेतलेल्या आहेत. यात प्रामुख्याने ज्या व्यक्तीला लस देण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्या व्यक्तींची ओळखपत्रासह द्विस्तरीय खात्री करुन घेणे. यात प्रामुख्याने प्रवेश करतेवेळी पोलीस अथवा सुरक्षा कर्मचारी पूर्ण तपासणी करुन घेईल. त्यानंतरच संबंधित व्यक्तीला लसीकरणासाठी आत सोडले जाईल. लसीकरण केंद्रात प्रवेश दिल्यानंतर लस देण्याअगोदर पून्हा लस घेणाऱ्या व्यक्तीची ओळखपत्र तपासून खात्री करुन घेतल्या जाईल. याचबरोबर ऑनलाईन नोंदणीही केली जाईल. संपूर्ण मोहिमेमध्ये पावलोपावली दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने निर्गमित केले आहेत. आजच्या या रंगीत तालमीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या समक्ष खात्री करुन घेतली. 

या मोहिमेमध्ये प्राथमिकस्तरावर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत कार्यरत असलेल्या 17 हजार 99 लाभधारकांना पहिल्या फेरीत लसीकरण करण्याचे नियोजन झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सर्व विभागाची पाहणी केली. तत्पुर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी बाह्यरुग्ण तपासणी विभाग, नावनोंदणी विभाग व ज्याठिकाणाहून रुग्णांना औषधे दिली जातात, त्या औषध वितरण विभागास कार्यरत कर्मचाऱ्यांशी व रुग्णांशी चौकशी करुन पाहणी केली. 

00000





  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...