नांदेड तालुका ग्रामपंचायत निवडणुकीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न
प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतून प्रशिक्षण
नांदेड, दि. 8 (जिमाका) :- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020 नांदेड तालुक्याचे दुसरे प्रशिक्षण शंकरराव चव्हाण सभागृहात नुकतेच संपन्न झाले आहे. प्रशिक्षणाची सुरुवात तहसीलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनातून झाली. यावेळी नायब तहसीलदार (निवडणूक) सौ. उर्मीला कुलकर्णी व सारंग चव्हाण उपस्थित होते. दुसरे प्रशिक्षण हे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतून दिले जाणार आहे. या माध्यमातुन मतदानाच्या दिवशी केंद्रावर मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी आणि आलेल्या विविध समस्यांना कसे तोंड दयावे हे प्रत्यक्ष प्रशिक्षण पिठावर दाखविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका या संवेदनशील असतात त्यामुळे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक प्रशिक्षण अत्यंत जबाबदारीने घेणे आवश्यक आहे, असे निर्देश तहसिलदार किरण अंबेकर यांनी दिले.
जिल्ह्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतच्या निवडणुका
आहेत. नांदेड तालुक्यात एकूण 73 पैकी 65 ग्रामपंचायतच्या निवडणूका होवू घातल्या आहेत. त्यासाठी 253 मतदान
केंद्रे उभारली असून ज्या मतदान केंद्रावर 800 पेक्षा जास्त मतदार आहेत. त्या
मतदान केंद्राचे रुपांतर दोन मतदान केंद्रात केले आहे. नांदेड तालुक्यात कमाल
मतदार 860 एका केंद्रावर
असून मतदान घेणे सोपे व्हावे. म्हणून सर्व व्यवस्था चोखपणे तयार करण्यात आली
आहे. किमान मतदार असलेले केंद्र 200 ते 300 मतदाराचे आहे. यासाठी वाहन, पोलीस व्यवस्था, रुट गाईड, या सर्व व्यवस्था
अत्यंत बारकाईने तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदान अधिकारी व
कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. याप्रसंगी प्रत्येकांनी
निवडणूकीचे कार्य जबाबदारीने पूर्ण करावे. जर निवडणूकीच्या कामात टाळाटाळ, निष्काळजीपणा
कोणी करत असतील तर
त्यांच्या विरुध्द निवडणूक कायदाने गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट निर्देश
अंबेकर यांनी दिले आहेत.
आजचे दुसरे प्रशिक्षण हे प्रशिक्षण पिठावर प्रत्यक्ष मतदान केंद्राची उभारणी करुन देण्यात आले. सारंग चव्हाण यांनी केंद्रावर येत असलेल्या विविध समस्यांचे निराकरण प्रत्यक्ष कृतीतून करुन दाखविले. प्रथम मतदान केंद्राध्यक्ष बालासाहेब कच्छवे, मतदान अधिकारी पहिला संजय कोठाळे, मतदान अधिकारी कविता जोशी, शोभा माळवदकर यांच्या एका टिमने ईव्हिएम मशीनसह प्रात्यक्षिक दाखविले.
मतदान प्रतिनिधी म्हणून मुरलीधर सोनकांबळे, हनुमंत राठोड, नियमित मतदार संकेत पवार, दिव्यांग मतदार कोंडीबा नागरवाड, टेंडर ओट करण्यासाठी नझरुल इस्लाम, अंध मतदार म्हणून किरण मापारे, मतदानास नकार देणारा मतदार म्हणून राजेश कुलकर्णी, तोतय्या मतदार म्हणून दादाराव मगर यांनी भुमिका पार पाडली. सारंग चव्हाण नायब तहसी
आजच्या या प्रशिक्षणास दोन सत्रात एकूण 315 टिमला आदेश
देवून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्याची
प्रशिक्षण शासकिय ग्रंथालयात दहा प्रशिक्षण केंद्रातुन देण्यात आले. या कायक्रमाचे सुत्र संचालन व आभार नायब
तहसीलदार निवडणूक सौ. उर्मीला लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी केले. हे प्रशिक्षण
यशस्वी करण्यासाठी अव्वल कारकुन कुणाल रंगराव जगताप, अव्वल कारकुन दत्तात्रय पोकले, अव्वल कारकुन राजकुमार कोटूरवार,राजेश कुलकर्णी, हनमंत
जाधव महसुल सहायक, व्यंकटी मुंडे, माया
मुनेश्वर बालासाहेब कच्छवे, संजय कोठाळे, कविता जोशी, शोभा माळवदकर यांनी सहकार्य केले.
00000
No comments:
Post a Comment