Thursday, June 11, 2020

वृत्त क्र. 537



18 लाख 72 हजार रुपयाचा गुटखा जप्त
संबंधितांवर गुन्हा दाखल 
नांदेड (जिमाका) दि. 11 :- लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये गोवा गुटखा 30 बोरी अंदाजे 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक क्र. के. ए. 38- 6482 या वाहनात प्रतिबंधित अन्न पदार्थाची 10 जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी तपासणी केली. यावेळी 1 हजार गोवा गुटखा 30 बोरी जवळपास 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला.  गुलबर्गा (कर्नाटक) जिल्ह्यातील पडसावली (ता. आळंदा) येथील आरोपी रुखमोद्दिन इमाम इमानदार वय वर्षे 28 यांच्या विरुद्ध माळाकोळी पोलीस स्टेशन येथे अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मा. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितास अजीवन तुरुगंवास आणि 10 लाख रुपयापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.  अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, सुनिल जिंतूरकर व नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी केली.  
000000


वृत्त क्र. 535



नांदेड जिल्ह्यात 21 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह 
 बाधितांमध्ये 13 पुरुष तर 8 महिलांचा समावेश
दोन बाधित व्यक्ती बरे झाल्याने सुट्टी   
नांदेड (जिमाका) दि. 11 :- नांदेड जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 21 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या 224 वर पोहचली आहे. आज या 21 बाधितांपैकी 13 पुरुष तर 8 महिलांचा समावेश आहे. यामध्ये 67, 62, 55, 52, 45, 41, 38, 35,28,26 व 16 वर्षाचे तीन पुरुष  तर महिलांमध्ये 52, 50, 38, 30, 28, 26 व 10, 3 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. पंजाब भवन यात्री निवास येथील 2 बाधित व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 139 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले आहेत.
गुरुवार 11 जून रोजी प्राप्त झालेल्या 89 अहवालापैकी 62 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. नवीन 21 पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये चौफाळा भागातील 1 स्त्री (वय 52 वर्षे), फरांदेनगर भागातील 1 पुरुष (वय 52 वर्षे), खोजा कॉलनी भागातील 1 पुरुष (वय 67 वर्षे), उमर कॉलनी भागातील 1 पुरुष (वय 16 वर्षे), देगलूरनाका भागातील 2 व्यक्तींमध्ये 1 स्त्री (वय 26 वर्षे) व 1 पुरुष (वय 16 वर्षे), इतवारा भागातील 5 व्यक्तींपैकी 4 पुरुष (वय 16,26,28,62 वर्षे) व 1 स्त्री (वय 50 वर्षे), तसेच गुलजारबाग भागातील 8 व्यक्तींपैकी 3 पुरुष (वय 35,41,38 वर्षे) व 5 स्त्री (वय 3, 10,28,30,38 वर्षे) असे आहे. तसेच मुखेड शहरातील 2 पुरुषांपैकी होळकरनगर येथील 45 वर्षाचा 1 व्यक्ती तर विठ्ठलनगर परिसरातील 55 वर्षाचा 1 व्यक्तींचा यात समावेश आहे. या सर्व व्यक्तींची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे.   
  औषधोपचार सुरु असलेल्या 74 बाधितांपैकी 3 व्यक्तींमध्ये 65 वर्षाची 1 महिला तर 74 व 38 वर्षाचे 2 पुरुष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची एकुण संख्या 11 झाली आहे. नांदेड जिल्ह्यात 74 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 51, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर  1, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित आणि 1 बाधित हा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून औरंगाबाद येथे 1 बाधित व्यक्ती संदर्भित झाला आहे.  गुरुवार 11 जून रोजी 62 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 44 हजार 222, 
घेतलेले स्वॅब
 4 हजार 711, 
निगेटिव्ह स्वॅब
 4 हजार 154, 
आज
 पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 21, 
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती
 224, 
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या
 181, 
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-83,
 
मृत्यू संख्या-
 11, 
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 139, 
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती
 74, 
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 62 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
00000

वृत्त क्र. 534



जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 13.99 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात गुरुवार 11 जून 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 13.99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 223.84 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 47.91 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5.38 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 11 जून 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 26.63 (85.89), मुदखेड- 15.67 (42.34), अर्धापूर- 12.00 (45.00), भोकर- 11.25 (62.50), उमरी- 3.00 (25.00), कंधार- 7.00 (39.17), लोहा- 13.83 (49.16), किनवट- 13.00 (29.28), माहूर- 17.75 (39.00), हदगाव- 10.71 (64.28), हिमायतनगर- 12.00 (71.67), देगलूर- 31.50 (65.26), बिलोली- 7.00 (21.00), धर्माबाद- 11.33 (41.99), नायगाव- 2.60 (24.00), मुखेड- 28.57 (60.99). आज अखेर पावसाची सरासरी 47.91 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 766.53) मिलीमीटर आहे.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...