Wednesday, September 21, 2022

मॅग्नेट प्रकल्पांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मॅग्नेट प्रकल्पांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- महाराष्ट्र ॲग्रो बिझिनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गंत राज्यातील लाभार्थ्यांकडून मॅग्नेट प्रकल्पांमध्ये समाविष्ट असणाऱ्या केळी, पेरु, डाळिंब, चिक्कू, सिताफळ, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, भेंडी, मिरची (हिरवी/लाल) व फुलपिके या पिकांसंबंधीत काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्य साखळी विकास आदी बाबतच्या उप प्रकल्पांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक अर्जदारानी www.msamb.com संकेतस्थळावर नोंदणी करुन 10 ऑक्टोंबरपर्यत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाचे विभागीय प्रकल्प उपसंचालक महादेव बरडे यांनी केले आहे.  

पात्र लाभार्थ्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था कंपनी कायदा व सहकारी संस्था कायद्यातर्गत नोंदणी झालेल्या शेतकरी संस्था, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोक संचलित साधन केंद्र तसेच शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन/असोसिएसन्स आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार शेतकरी उत्पादक कंपनी नसलेल्या मात्र कोणत्याही फलोत्पादन पिकांच्या उत्पादकाबरोबर तसेच उत्पादकांच्या सहकारी संस्थाबरोबर सक्रीयपणे कामकाज करीत असलेल्या संस्था की जसे ॲग्रीगेटर/प्रक्रीयेद्वारे/निर्यातदार/मध्यम व मोठया रिटेल विक्री संस्था/कृषी तंत्र वा आर्थिक तंत्र संस्था याचा समावेश आहे.

शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळी गुंतवणूकदार या लाभार्थ्यांसाठी राहणार असून पात्र अर्जाचे मूल्यांकन करुन मूल्यांकन निकषानुसार पहिल्या 64 लाभार्थ्यांची (40 शेतकरी उत्पादक संस्था व 24 मूल्य साखळी गुंतवणूकदार) निवड करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या अधिकतम 60 टक्केपर्यत अर्थसहाय्य देय राहील. अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता निकष, विहीत नमुन्यातील अर्ज, मूल्यांकन निकष, कागदपत्रांची चेकलिस्ट इ. माहिती कृषी पणन मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूक अर्जदारांनी संकेतस्थळावर नोंदणी करुन विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रांची चेकलिस्ट डाऊनलोड करावी. अर्जदारानी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत मॅग्नेट प्रकल्पांच्या संबंधित प्रकल्प अंमलबजावनी कक्ष (पीआययु) तथा राज्य कृषी पणन मंडळाचे विभागीय कार्यालय, लातूर येथे छापील प्रतीत विहित मुदतीत सादर करावेत. अधिक माहितीसाठी एम.डी.बरडे, विभागीय प्रकल्प उपसंचालक, प्रकल्प अंमलबजावनी कक्ष, मॅग्नेट प्रकल्प, लातूर, मो.क्र. 9850951570 व गणेश पाटील, विभागीय प्रकल्प व्यवस्थापक, मॅग्नेट प्रकल्प अंमलबजावनी कक्ष, मॅग्नेट प्रकल्प लातूर मो. क्र. 9518768712 यावर संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

00000

दिवाळी फटाका दुकान परवानासाठी 4 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करावेत

 

दिवाळी फटाका दुकान

परवानासाठी 4 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करावेत

नांदेड (जिमाका) दि. 21 :- दिपावली उत्सव 21 ते 26 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीतील फटाका दुकानांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत परवाने 22 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. तात्पुरता फटाका दुकानाच्या परवानासाठी 4 ऑक्टोंबर 2022 पर्यत अर्ज करावेत, असे जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील सर्व  उपविभागीय दंडाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरता फटाका परवाना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  तात्पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या मार्फत जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रातील फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनियमय 2008 नुसार फटाके विक्री परवानासाठी विहित नमून्यात अर्ज करायचा आहे. परवाना घेताना दुकानाचा नकाशा व ज्यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक क्षमता, त्याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्यादी तपशील दाखवण्यात यावा. The Explosive Rule 2008 मधील नियम 84 अन्वये सदर दुकानातील किमान अंतर 03 मीटर असावे तसेच संरक्षीत  क्षेत्रापासून अंतर 50 मीटर असणे आवश्यक आहे. सदर नकाशात दुकान क्रमांक नमूद असावा. नकाशा स्थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो. लायसन्स फी रुपये 600 चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामूहिक रित्या दुकाने टाकण्यात येत असल्यास संबंधित अर्जदारास देण्यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणत्र असणे आवश्यक आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड/मुख्याधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र. संबंधित पोलिस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र, विक्री-कर विभाग नांदेड या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळ नांदेड या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र, विद्युत विभाग मनपा नांदेड यांचे नाहरकत प्रमाणपत्र (नांदेड मनपा हद्दीमध्ये), विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांचे नाहरकत प्रमाणपत्र, जागेच्या मालकी हक्काचा पुरावा, नोंदणीकृत/ मान्यताप्राप्त असोसिएशन मार्फत तात्पुरता फटाका परवानासाठी अर्ज केल्यास या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या परवान्यातील नमूद ज्या अटी व शर्तीनुसार संबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहिल तसेच  कोणत्याही विस्फोटक नियमांचे व परवान्यातील अटी व शेर्तीचे होवून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित असोसिएशनची असेल याबाबत संबंधित असोसिएशन कडील शपथपत्र. दुकानाच्या ठिकाणी करण्यात आलेली व्यवस्था तपशील अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार राहील. 

शासन स्तरावरुन तसेच विस्फोटक नियंत्रक व इतर संबंधित विभागाकडून वेळोवळी फटाका परवाना निर्गमनाबाबत प्राप्त होणाऱ्या अटी व शर्तीचे अधीन राहून देण्यात येते. अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनद्वारे फिस शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने दिनांक 10 ऑक्टोबर, 2022    11 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍या मार्फत तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या मार्फत निर्गमित केले जातील.

दिपावली सण-उत्‍सवाच्या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्‍यवहार करता येईल याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...