Wednesday, September 21, 2022

मॅग्नेट प्रकल्पांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मॅग्नेट प्रकल्पांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- महाराष्ट्र ॲग्रो बिझिनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गंत राज्यातील लाभार्थ्यांकडून मॅग्नेट प्रकल्पांमध्ये समाविष्ट असणाऱ्या केळी, पेरु, डाळिंब, चिक्कू, सिताफळ, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, भेंडी, मिरची (हिरवी/लाल) व फुलपिके या पिकांसंबंधीत काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्य साखळी विकास आदी बाबतच्या उप प्रकल्पांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक अर्जदारानी www.msamb.com संकेतस्थळावर नोंदणी करुन 10 ऑक्टोंबरपर्यत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाचे विभागीय प्रकल्प उपसंचालक महादेव बरडे यांनी केले आहे.  

पात्र लाभार्थ्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था कंपनी कायदा व सहकारी संस्था कायद्यातर्गत नोंदणी झालेल्या शेतकरी संस्था, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोक संचलित साधन केंद्र तसेच शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन/असोसिएसन्स आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार शेतकरी उत्पादक कंपनी नसलेल्या मात्र कोणत्याही फलोत्पादन पिकांच्या उत्पादकाबरोबर तसेच उत्पादकांच्या सहकारी संस्थाबरोबर सक्रीयपणे कामकाज करीत असलेल्या संस्था की जसे ॲग्रीगेटर/प्रक्रीयेद्वारे/निर्यातदार/मध्यम व मोठया रिटेल विक्री संस्था/कृषी तंत्र वा आर्थिक तंत्र संस्था याचा समावेश आहे.

शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळी गुंतवणूकदार या लाभार्थ्यांसाठी राहणार असून पात्र अर्जाचे मूल्यांकन करुन मूल्यांकन निकषानुसार पहिल्या 64 लाभार्थ्यांची (40 शेतकरी उत्पादक संस्था व 24 मूल्य साखळी गुंतवणूकदार) निवड करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या अधिकतम 60 टक्केपर्यत अर्थसहाय्य देय राहील. अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता निकष, विहीत नमुन्यातील अर्ज, मूल्यांकन निकष, कागदपत्रांची चेकलिस्ट इ. माहिती कृषी पणन मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूक अर्जदारांनी संकेतस्थळावर नोंदणी करुन विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रांची चेकलिस्ट डाऊनलोड करावी. अर्जदारानी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत मॅग्नेट प्रकल्पांच्या संबंधित प्रकल्प अंमलबजावनी कक्ष (पीआययु) तथा राज्य कृषी पणन मंडळाचे विभागीय कार्यालय, लातूर येथे छापील प्रतीत विहित मुदतीत सादर करावेत. अधिक माहितीसाठी एम.डी.बरडे, विभागीय प्रकल्प उपसंचालक, प्रकल्प अंमलबजावनी कक्ष, मॅग्नेट प्रकल्प, लातूर, मो.क्र. 9850951570 व गणेश पाटील, विभागीय प्रकल्प व्यवस्थापक, मॅग्नेट प्रकल्प अंमलबजावनी कक्ष, मॅग्नेट प्रकल्प लातूर मो. क्र. 9518768712 यावर संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...