Friday, March 1, 2019

परिवहन संवर्गातील व्यवसायाशी निगडीत गॅरेज मेकॅनिक
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

नांदेड, दि. 01 :- जिल्हयातील सर्व 18 वर्ष ते 40 वर्ष या वयोगटातील परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती (लायसन्स) धारक, मॅकेनिक, खाजगी बस चालक, ट्रक चालक, टॅक्सी, ऑटोरिक्षा चालक या व्यवसायाशी निगडीत गॅरेज मेकॅनिक यांच्याकरिता केंद्र शासनाद्वारे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन (PMSYM) योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र अर्जदाराने भरावयाची हप्ताची माहिती सोबत जोडलेल्या तक्त्यामध्ये दर्शविलेली आहे. तरी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी जिल्हयातील सर्व उपरोक्त लाभार्थीनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केलेले आहे.
                                                                0000

असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी योजना

नांदेड, दि. 01 :-असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन                          ( पीएमएसवायएम) योजना दि. 15 फेब्रुवारीपासून लागू करण्यासंबंधीची अधिसूचना श्रम मंत्रालयाने काढली आहे. 40 वर्षापर्यंत वयातील कामगार ज्यांचे मासिक वेतन 15 हजारांच्या आत आहे, असे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक निवृत्तीवेतन देण्यात येईल. त्यासाठी 18 वर्षाच्या कामगाराला 200 रुपये मासिक रक्कम जमा करावी लागणार आहे. ही रक्कम 60 वर्षापर्यंत भरावी लागेल, असे सहाय्यक कामगार आयुक्त , नांदेड यांनी कळविले.
0000


हमीभावाने तूर खरेदी करण्याकरिता
शेतकरी नोंदणीची मुदत 10 मार्च, 2019 पर्यंन्त

नांदेड, दि. 01 :- केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हंगाम 2018-19 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्याकरिता शेतकरी नोंदणीची मुदत शासनाकडून दि. 10 मार्च, 2019 पर्यंन्त वाढविण्यात आली आहे. तरी शेतकरी बांधवानों ऑनलाईन नोंदणी करावी हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विक्री तूर विक्री करुन हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी रामप्रसाद दांड यांनी केले आहे.
000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...