Saturday, April 6, 2024

वृत्‍त क्र. ३१३ 

नांदेड लोकसभेसाठी 66 पैकी एका पात्र उमेदवाराची माघार ;

अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम मुदत 

नांदेड दि. ६ एप्रिल – 16 नांदेड लोकसभा निवडणुकीच्‍याI छाननीमध्‍ये पात्र 66 उमेदवारापैकी शनिवारी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 65 उमेदवार सध्या पात्र असून सोमवारी ८ एप्रिलला तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.त्‍यामुळे ८ एप्रिल नंतर 16-नांदेड लोकसभा मतदारसंघामध्‍ये अंतिम उमेदवारी निश्चित होणार आहेत. आज अपक्ष उमेदवार मोहनराव आनंदराव वाघमारे यांनी अर्ज परत घेतला आहे. 

चुकीचे प्रतिज्ञापत्र, सूचकांची संख्‍या, सुरक्षा रक्‍कम जमा न करणे आदी करणांवरून शुक्रवारी 9 अर्ज रद्द करण्‍यात आले. एका इच्‍छूक उमेदवाराचे दोन अर्ज रद्द झाले. एकूण 92 अर्ज दाखल झाले होते. त्‍यापैकी 9 अर्ज रद्द करण्‍यात आले. 66 उमेदवारांनी हे अर्ज दाखल केले होते. काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. अपात्र उमेदवारांमध्‍ये विष्‍णु मारूती जाधव, अलिमोद्दीन मोहियोद्दीन काझी, माधवराव मुकींदा गायकवाड, आनंदा धोंडिबा जाधव, सुरेश दिगांबर कांबळे, दिगांबर धोंडिबा वाघमारे, आनंदा कुंडलिकराव बोकारे, सोपान नेव्‍हल पाटील यांचा समावेश आहे. 

पात्र उमेदवार चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी), पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी), वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), अब्दुल रईस अहेमद (देश जनहीत पार्टी), अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी), कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग), राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी), रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलीस- ए-इन्कलाब ए- मिल्लत), सय्यद तनवीर (बहुजन महापार्टी), सुशीला निळकंठराव पवार (सम्‍यक जनता पार्टी), हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) यांचा समावेश आहे. 

तर अपक्षांमध्‍ये अकबर अख्‍तर खॉन, अक्रम रहेमान सय्यद, अनवर अ. कादर अ. कादर शेख, अमजत खा सरवर खान, अरुण भागाजी साबळे, अशफाक अहमद, असलम इब्राहीम शेख, शे. इमरान शे. पाशा, इरफान फहरुख सईद, मो. इलियास अब्दुल वहिद मोहमद, कदम सुरज देवेंद्र, कल्पना संजय गायकवाड, खान अलायार युसुफ खान, अ. खालेद अ. रफीक, गजानन दत्तरामजी धुमाळ, जगदीश लक्ष्मण पोतरे, जफर अली खाँ महेमुद अली खाँ पठाण, जुल्फेखान जिलानी सय्यद, तबस्सुम बेगम, तुकाराम गणपत बिराजदार, थोरात रविंद्र गणपतराव, देविदास गोविंदराव इंगळे, नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसैन, नागेश संभाजी गायकवाड, नागोराव दिगंबर वाघमारे, निखिल लक्ष्मणराव गर्जे, प्रमोद किशनराव कामठेकर, फहाद सलीम शेख सलीम शेख, भास्कर चंपतराव डोईफोडे, मजीद अ. अकबर, महमंद तौफीक महमंद युसुफ, महमद मुबीन शे. पाशा, महमद सलीम महमद इकबाल, महारुद्र केशव पोपळाईतकर, अॅड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील,मोहम्मद नदीम मोहम्मद इक्बाल, मोहम्‍मद वसीम, मोहम्मद सिद्दीक शेख संदलजी, युनुस खान, युनुसखॉं युसुफखाँ, रमेश दौलाती माने, राठोड सुरेश गोपीनाथ, लतीफ उल जफर कुरेशी, लक्ष्मण नागोराव पाटील, अॅड. विजयसिंह चौव्‍हाण, विनयमाला गजानन गायकवाड, वैशाली मारोतराव हुक्‍के पाटील, शाहरुख खमर, शिवाजी दत्तात्रय गायकवाड, साहेबराव नागोराव गुंडीले, साहेबराव भिवा गजभारे, ज्ञानेश्वर बाबूराव कोंडामंगले, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे यांचा समावेश आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्‍याची अंतिम मुदत 8 एप्रिल आहे. उदया रविवारी सुट्टीचा दिवस आहे. सोमवारी सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.

00000


वृत्त क्रमांक 312

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस ; एकावर गुन्हा दाखल


भाग्यनगर, लोहा, मुखेड, अर्धापूर, भोकर ठाण्यात तक्रार


नांदेड दि. ६ एप्रिलः लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची बदनामी,विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या  पोस्ट माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या सोशल मिडिया सेलने हुडकून काढणे सुरु केले आहे. या सेलच्या वतीने ४ जणाना नोटीस बजावली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशिष्ट धर्माविरुद्ध गैरसमज पसरविणे, तेढ निर्माण करणारे भीतीदायक फोटो प्रसारित करणे, धार्मिक ग्रंथ व महिलांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, विशिष्ट समाजाला धमकावणे, गर्भित इशारे देणे, लोकांच्या भावना दुःखावतील अशा पद्धतीची भाषा वापरणे, निवडणूक काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे अशा अनेक गोष्टींवर सोशल मीडिया सेल लक्ष ठेवून आहे.

 उमेदवारांनी नमूद करावे खाते
उमेदवारांना त्यांचे सर्व फेसबुक अकाउंट जमा करावे लागणार आहे. त्यांच्या फेसबुक व अन्य सोशल अकाउंटवरून जाहिरात करताना त्यांना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा काही पोस्ट परवानगी न घेता आढळल्यास त्याचा सर्व खर्च उमेदवाराच्या खर्चाच्या तपशील मध्ये जमा केला जाणार आहे.

तसेच या निर्धारित सोशल मीडिया अकाउंट वरून कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होता कामा नये. त्यामुळे उमेदवारांनी देखील आपले सोशल अकाउंट हँडल करणाऱ्यांना योग्य सूचना देणे आवश्यक आहे.

दरम्यान 16 मार्चपासून आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळपास एक हजार नऊशे खात्यांची तपासणी करण्यात आली आहे. काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खातेधारकांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.

 १३ जणांचा शोध सुरू
जिल्ह्यातील आणखी 13 जणांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या 13 जणांच्या आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्या आहेत. त्यांचे पत्ते व त्यांच्याबद्दलची माहिती तपासणी सुरू आहे. सोशल माध्यमांचा वापर करणाऱ्या तरुणांनी या संदर्भात अधिक जागरूक असावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा
आक्षेपार्ह काही पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 83O82741OO हा नंबर दिला असून यावर अशा पद्धतीने काही आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...