Friday, May 18, 2018

जागतीक उच्च रक्तदाब दिवस साजरा
        नांदेडदि. 18 :- श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांचे मार्गदर्शनाखाली जागतीक उच्च रक्तदाब दिवस साजरा करण्यात आला. यावेळी 110 रुग्णांची रक्तदाब तपासणी करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गुंटूरकर यांनी शासकीय रुग्णालयातील मधुमेह व उच्च रक्तदाब मोफत तपासणी व उपचाराबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपकसिंह हजारी, डॉ. व्ही. टी. कुलदिपक, डॉ. एच. के. साखरे, डॉ. अर्चना तिवारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी केले.
00000
सैनिकी मुलांचे वसतीगृहात
चौकीदार पदासाठी भरती
        नांदेडदि. 18 :- सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णूपुरी विदयापीठ परिसर, नांदेड येथे कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या  स्वरुपात 8 हजार 911 रुपये मानधनावर पुर्णवेळ चौकीदार पदासाठी भरती होणार आहे. पात्रता- उमेदवार हा माजी सैनिक/ इतर नागरीक,  शारीरीक, मानसीकरित्या सुदृढ, लिहीता-वाचता येणे अनिवार्य आहे. राहण्याची सोय वसतीगृहात उपलब्ध आहे. गरजुंनी अर्ज कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नवीन तहसिल कार्यालय परिसर, चिखलवाडी कॉर्नर, नांदेड येथे बुधवार 30 मे 2018 पर्यत सादर करावीत. अधिक माहितीसाठी 02462-245510 या दुरध्वनीवर संपर्क करावा, असे  आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
0000000
स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा
जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी सत्कार सोहळा  
            नांदेडदि. 18 :-  युपीएससी व एमपीएससी परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी सकाळी 10.30 वाडॉशंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजितकरण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने "उज्ज्वल नांदेड" ही माेहि राबविली जात असून या अंतर्गत नांदेड जिल्हयातील युपीएससी व एमपीएससी या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात येणार आहेयावेळी या यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे (भा.प्र.से) यांचे अध्यक्षेतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद (भा.पो.से)पोलिसअधिक्षक चंद्रकिशोर मिना (भा.पो.से)मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे (भा.प्र.से)मनपा आयुक्त लहुराज माळी (भा.प्र.से)अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटीलनिवासीउपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, प्राचार्य आर प्रसादप्राचार्य जी. रमेशराव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेया कार्यक्रमास  स्पर्धा परीक्षेचेतयारी करणारे विद्यार्थीपालक  नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे 
या कार्यक्रमास पुढील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा :- दिग्वीजय बोडकेडॉ. सुयश चव्हाणरोहन घुगेश्रीनिवास पाटील, शिषयेरेकर. MPSC राज्य कर निरीक्षक 2017 (STI ) :- शिवाजी जाकापुरेकु.नेहा पवारअमोल किशनराव हनवतेविवेक मधुकरराव क्षिरसागरयोगेश टोंपेगाडेवाड माणिक रामचंद्र,कु. गिरे मीरा अशोकरावसुमित्रा मसलगेमहंमद अरीफअभिजित देशमुखअजय वाघमारेरवी खिल्लारेमुंजेष कांबळे. MBA –ENT राज्यातून पहिली :- दिव्या गोवर्धन बियाणी,JEE देशातून तिसरा :- पार्थ सतीश लटुरिया MPSC-कृषि सेवा परीक्षा :- विठ्ठ किशनराव मखपल्ले – मंडळ कृषी अधिकारीकर सहाय्यक परीक्षा :- गंगाधर शेषेराव पाटील,कु.भाग्यश्री गंगाधर मोरेकु. चंद्रसेना शिवाजी सुर्यवंशीव्यंकटी नंदकिशोर पुयडकु.अंजली काळेपोस्टल असिस्टंट :- लक्ष्मण शिवाजी सोळुंकेमंत्रालय लिपीक परीक्षा-2017 :-कु.चंद्रसेना शिवाजी सुर्यवंशी, सविता गणेशराव मंगरुळेतेलंगे राजश्री दिगांबर, सुरेखा सटवा आंबेपवाडज्योती कावळेकु.लक्ष्मी चिटटेबोईनवाड, कु.भाग्यश्री कांबळेकाळोजी परसरामशिंदेपोलीस कॉन्स्टेबल परीक्षा-2018 :-.लक्ष्मण शेन्नेवाडकु.गायत्री कांबळे, कु.राधाबाई एम.केंद्रे.
---------*--------

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
आरक्षण सोडतीचे आज आयोजन  
संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

        नांदेड, दि. 18 :- मुदखेड व धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणूककामी बाजार क्षेत्रातील आरक्षण सोडत जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निल्‍हा ामीी ‍पन्‍न बाजार समिती -------------------------------------------------------------------------
वडणूक अधिकारी (कृउबास) यांचे अध्‍यक्षतेखाली शनिवार 19 मे 2018 रोजी सकाळी 11 वा. बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड काढण्‍यात येणार आहे. सर्व संबंधीत व्‍यक्‍तींन सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांचे आदेशान्वये कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणकीकरीता जिल्‍हाधिकारी नांदेड यांना जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) म्‍हणून घोषीत केले आहे. त्‍यानुषंगाने दिनांक 31 डिसेंबर 2017 अखेर मुदत संपणाऱ्या नांदेड जिल्‍ह्यातील मुदखेड व धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक प्रक्रीया घेण्‍याचे प्राधिकरणाचे निर्देश आहेत.
            मुदखेड कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रात एकुण 17 गावे समाविष्‍ट असून धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रात एकुण 56 गावे समाविष्‍ट आहेत. राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांचे दिनांक 5 डिसेंबर 2017 च्‍या आदेशानुसार गावातील गावनिहाय खातेदारांची संख्‍या विचारात घेवून सदर गावाचे एकुण 15 गणांमध्ये (विभाग) विभाजन करून महाराष्‍ट्र कृषी उत्‍पन्‍न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 13 (1) मधील तरतूदीनूसार 15 गणापैकी महिलांसाठी – 2 गण,  इतर मागासवर्गीयांसाठी – 1 गण, विमुक्‍त जाती / भटक्‍या जमाती साठी – 1 गण, अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीसाठी 1 गण असे एकुण 5 गणांचे आरक्षण लॉटरी पध्‍दतीने जाहीर करावे. तसेच गणाचे आरक्षण काढताना संबंधीत बाजार क्षेत्रातील  लोकसभा / राज्‍यसभा सदस्‍य,  विधानसभा / विधानपरिषद सदस्‍य, जिल्‍हा परिषद सदस्‍य, पंचायत समिती पदाधिकारी, संबंधीत बाजार समितीचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत जाहीर करण्‍याचे निर्देश आहेत.
        त्यानुषंगाने मुदखेड व धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणूककामी बाजार क्षेत्रातील आरक्षण सोडत जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निल्‍हा ामीी ‍पन्‍न बाजार समिती -------------------------------------------------------------------------
वडणूक अधिकारी (कृउबास) यांचे अध्‍यक्षतेखाली दिनांक 19 मे 2018 रोजी सकाळी 11 वा. बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड काढण्‍यात येणार असून उपरोक्‍त सर्व सन्‍माननीय व्‍यक्‍तींना सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहण्‍याचे जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी आवाहन केले आहे.
0000000




पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा
        नांदेड, दि. 18 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            सोमवार 21 मे 2018 रोजी औरंगाबाद येथुन शासकीय वाहनाने सकाळी 10 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन विकास (डीपीडीसी) बैठक. स्थळ- नियोजन भवन, मुख्य सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 2 वा. शासकीय वाहनाने जालनाकडे प्रयाण करतील.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...