Wednesday, August 6, 2025

वृत्त क्रमांक 821

प्रलंबित प्रतिवेदन, ई-चालन संदर्भात 13 सप्टेंबर रोजी लोकअदालत  

नांदेड दि. 6 ऑगस्ट :- नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रलंबित प्रतिवेदन, ई-चालन यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार 13 सप्टेंबर 2025 रोजी लोकअदालत आयोजित केली आहे. 

प्रलंबीत प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित केलेल्या या लोकअदालतमध्ये वाहनचालक, मालकांनी उपस्थित रहावे व तडजोड पद्धतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावा. या उपलब्ध सुविधेचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 820

बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील 

विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना  

नांदेड दि. 6 ऑगस्ट :- जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी.,एम.ए.,एम.एस.सी. अशा बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या वर्षांसाठी शासकीय वसतिगृह योजनेचे ऑनलाईन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 17 ऑगस्ट 2025 पर्यंत भरावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू आहे. वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता भोजन निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते.

00000

 वृत्त क्रमांक 819   

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

 

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

 

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 06 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 13:11 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 06 ते 09 ऑगस्ट 2025 या चार दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 06 व 07ऑगस्ट 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचीविजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व दि. 08 व 09 ऑगस्ट 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचीविजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

या गोष्टी करा

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनीछत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपणविजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेतहे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनीॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेतॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते.

 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळपाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000


 वृत्त क्रमांक 818 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची

खतगावकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट

 

नांदेड दि. 6 ऑगस्ट :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नांदेड शहरातील साई निवास बाबानगर नांदेड येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या पत्नी कै. सौ. स्नेहलता भास्करराव पाटील खतगावकर यांचे अलिकडेच निधन झाले आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या त्या भगीनी होत्या.

 

यावेळी आमदार विक्रम काळेआमदार सतिश चव्हाणआमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे उपस्थित होते. 

00000




 वृत्त क्रमांक 817 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन


नांदेड दि. 6 ऑगस्ट :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज दुपारी श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी आमदार विक्रम काळेआमदार सतीश चव्हाण,आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेनांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापकुलगुरू डॉ. मनोहर चासकरजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावलीजिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारमनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदींनी त्यांचे स्वागत केले.

00000









वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...