Friday, June 18, 2021

 30 ते 44 वयोगटासाठी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस तर

45 वर्षावरील व्यक्तींना कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्धतेनुसार मिळणार
जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस हा 30 ते 44 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दिला जाणार आहे. तर कोविशिल्ड व कोव्हॅक्सीनची लस ही 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 19 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 10 केंद्रावर कोविशील्डचा 30 ते 44 वयोगट पहिला डोस व 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांवर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.
या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको अशा एकुण 11 केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. या ठिकाणी 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 30 ते 44 वयोगटावरील व्यक्तींना पहिला डोस व प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 16 केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 150 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी दिले जातील.

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 30 ते 44 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस तर 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.

जिल्ह्यात 17 जून पर्यंत एकुण 4 लाख 74 हजार 705 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 18 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 43 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 88 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 30 ते 44 वर्षावरील व्यक्तींसाठी पहिल्या लसीकरणाला तर 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील कोविशिल्ड लसीचा पहिला डोस सुरु करण्यात आला आहे. मनपा कार्यक्षेत्रात 30 ते 44 वयोगटासाठी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. मनपा कार्यक्षेत्रात कोव्हॅक्सीनची लस ऑनलाईन नोंदणीसाठी 50 डोसेस 45 वर्षावरील लाभार्थ्यांना दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहतील. तर 50 डोसेस हे एचसीडब्लू व एफएलडब्लू यांच्यासाठी दुसऱ्या डोसकरीता ऑफलाईन / ऑनस्पॉट नोंदणी पद्धतीने उपलब्ध राहतील. एचसीडब्लू व एफएलडब्लू यांनी ओळखपत्र व आधारकार्ड सोबत घेऊन यावे. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.
00000

 

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  केंद्र शासनाने‍ आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खादय उदयोग उन्नयन योजना 2020-21 ही केंद्र पुरस्कृत योजना देशभरामध्ये राबविण्याचे नियोजन केलेले आहे. ही योजना असंघटीत व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आहे. याचा कालावधी सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाचा आहे. ही योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जाणार आहे. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा. यासंबंधी अधिक माहितीसाठी www.mofpi.nic.in  PMFME या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाच्या (02462-284252) या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

जिल्हयासाठी हळद व इतर मसाले पदार्थ हे उत्पादन मंजुर आहे. या योजनेअंतर्गत अन्न पक्रिया उद्योगासाठी सामाईक पायाभुत सुविधा केंद्रासाठी 35 टक्के अनुदान, ब्रॅडींग व मार्केटींगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी 40 हजार प्रती सभासद 4 लाख रुपयापर्यंत अनुदान देय राहील. योजनेतर्गत शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक, शासन यंत्रणा किंवा खाजगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामायिक पायाभूत सुविधा या घटकांतर्गत नविन प्रकल्पाचे प्रस्ताव ओडीओपी उत्पादनावर देता येतील. तसेच सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रक्रीया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी एक जिल्हा एक उत्पादनाच्या व्यतिरीक्त इतर प्रस्ताव देखील या योजनेमध्ये सादर करता येतो. सद्यस्थितीत वैयक्‍तिक सुक्ष्म अन्न पक्रिया उद्योजकांनी एमआयएस पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहेत. गट लाभार्थींनी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयास अर्ज निश्चित केलेल्या एक जिल्हा एक उत्पादनासाठी सादर करता येतील, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

 

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विशेष कार्यक्रम

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती, जिल्हा योग संघटना व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी कळविले आहे.

 

केंद्रशासनाने 21 जून 2021 हा दिवस सातवा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. योगा दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्विकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. योगा हा आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी योगासने करुन योगा दिन साजरा करावा, असे आवाहन क्रीडा कार्यालयाने केले आहे.  

000000

विधी संघर्षीत बालकांना देणगी स्वरुपात पुस्तके देण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 18 :- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत विधी संघर्षीत बालकांना प्रधान न्यायदंडाधिकारी, बाल न्याय मंडळ यांच्या आदेशाने देखभाल व सुरक्षेसाठी निरीक्षणगृहात प्रवेश दिला जातो. या प्रवेशितांना वाचणासाठी पुस्तके देणगी स्वरुपात देवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी पुस्तके मुलांचे निरीक्षणगृह, श्रध्दा कॉलनी, छत्रपती चौक, नांदेड येथे द्यावीत तसेच अधिक माहितीसाठी (02462) 264848 व मो. 9561626292 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन मुलांचे निरिक्षणगृहाचे अधिक्षक, एस. के. दवणे यांनी केले आहे.

000000


 

संभाव्य ग्रामीण पाणी टंचाईवर वेबिनार संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 18 :- भू.स.वि.यं. सुवर्ण महोत्सवी वर्ष 2021 निमित्त भूजल विषयक तांत्रिक बाबींची संपूर्ण माहिती व जनजागृती होण्यासाठी भूजलाशी निगडीत विविध विषयावर वेबिनार आयोजित करण्यात येत आहे. त्यापैकी नुकतीची भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक एस. पी. राठोड यांनी संभाव्य ग्रामीण पाणी टंचाई अहवाल या विषयावर वेबिनारद्वारे सादरीकरण केले. या वेबिनारचा विद्यापीठातील भूगर्भशास्त्र, भूभौतिकशास्त्र आदी विभागातील विद्यार्थी तसेच अभियांत्रिकी व इतर महाविद्यालयातील असे जवळपास 60 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

0000

 

बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक औषधीबाबत

प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष

                             - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर                                                 तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी  तक्रार निवारण कक्ष येथे नोंदवावी

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक औषधीबाबत तक्रार असल्यास तालुका स्तरावर तालुका तक्रार निवारण कक्ष, तालुका कृषि अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण कक्षास तक्रार नोंदवावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या. 

जिल्ह्यातील मुख्य बियाणे वितरक व कंपनी प्रतिनिधी यांच्यासमवेत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी बियाणे पुरवठा प्रती बॅग किंमतीबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना, शेतकऱ्यांना बियाणे दराबाबत अडचण येणार नाही व जादा दराने विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी, कृषि विकास अधिकारी, जिल्ह्यातील मुख्य कृषि सेवा केंद्रधारक, कंपनी प्रतिनिधी तसेच प्रभारी मोहिम अधिकारी यांची उपस्थिती होती.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...