Friday, June 18, 2021

 

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विशेष कार्यक्रम

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती, जिल्हा योग संघटना व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी कळविले आहे.

 

केंद्रशासनाने 21 जून 2021 हा दिवस सातवा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. योगा दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्विकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. योगा हा आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी योगासने करुन योगा दिन साजरा करावा, असे आवाहन क्रीडा कार्यालयाने केले आहे.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...