बियाणे,
रासायनिक खते व किटकनाशक औषधीबाबत
प्रत्येक
तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष
- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार निवारण कक्ष येथे नोंदवावी
नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक औषधीबाबत तक्रार असल्यास तालुका स्तरावर तालुका तक्रार निवारण कक्ष, तालुका कृषि अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण कक्षास तक्रार नोंदवावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.
जिल्ह्यातील मुख्य बियाणे वितरक व कंपनी प्रतिनिधी
यांच्यासमवेत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली
नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी बियाणे पुरवठा प्रती बॅग
किंमतीबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना,
शेतकऱ्यांना बियाणे दराबाबत अडचण येणार नाही व जादा दराने विक्री
होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीस निवासी
उपजिल्हाधिकारी, कृषि विकास अधिकारी, जिल्ह्यातील
मुख्य कृषि सेवा केंद्रधारक, कंपनी प्रतिनिधी तसेच प्रभारी
मोहिम अधिकारी यांची उपस्थिती होती.
00000
No comments:
Post a Comment