Tuesday, April 6, 2021

आठवड्याभरात कार्यरत होणार नांदेडचे जंबो कोविड सेंटर ! - पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा पालकमंत्र्याकडून आढावा

 

आठवड्याभरात कार्यरत होणार नांदेडचे जंबो कोविड सेंटर !


-        
पालकमंत्री अशोक चव्हाण

 नांदेड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा पालकमंत्र्याकडून आढावा

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  नांदेड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नांदेड येथे दोनशे खाटांचे तात्पुरत्या स्वरूपातील जंबो कोविड सेंटर उभारले जात असून, पुढील आठवड्याभरात ते कार्यरत होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. आज सांयकाळी नांदेड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची आढावा बैठक त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 


पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या आजच्या आढावा बैठकीत नियोजित जंबो कोविड सेंटरच्या उभारणीवर चर्चा झाली. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नांदेड येथे अस्थायी जंबो कोविड सेंटर उभारले जाते आहे. या सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह कोरोनावरील आवश्यक त्या उपचार सुविधा उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील खाटांची उपलब्धता
, ऑक्सिजन व रेमडेसिवीरसारख्या औषधांचा मागणी व पुरवठा आदींबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी संपर्क साधून, नांदेड जिल्ह्याच्या मागणीनुसार दररोज २ हजार रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले. जिल्ह्यात डॉक्टर व नर्सेसची कमतरता नसून, आवश्यक तिथे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसाठी खासगी डॉक्टरांचीही सेवा घेतली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. 

नांदेड जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहिमेवर अधिक जोर देण्याचे निर्देशही अशोक चव्हाण यांनी या बैठकीत दिले. त्यासंदर्भात आवश्यकता भासल्यास स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण मोहिमेची माहिती देऊन नांदेड जिल्ह्याला अधिक लसींचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्ह्याला अधिक प्रमाणात लसी आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी शासनाकडून योग्य ती पावले उचलली जातील. कोरोनावरील उपाययोजनांसाठी निधीची कमतरता नाही. गरज भासेल तिथे शासनाकडून पुरेशी मदत मिळवून दिली जाईल, असेही ते म्हणाले.  

कोरोनासंदर्भात शासनाने केलेले नियोजन व कोरोना उपचारांच्या सुविधेबाबत नागरिकांना अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी माध्यमांची मदत घ्यावी, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. कोरोनावरील उपचारांच्या सुविधांच्या उपलब्धतेसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर कार्यरत करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बाजारात सध्या हरभरा, गहू, मोठी ज्वारी आदी शेतीमालाची आवक सुरू असून, कोरोनाच्या आड भाव पाडले जाणार नाहीत, याबाबत पुरेशी दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

 0000

 

वृत्त क्र. 647         

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 62 व्यक्ती कोरोना बाधित

23 जणांचा मृत्यू

जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 285 अहवालापैकी 1 हजार 62 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 432 तर अँटिजेन तपासणीद्वारे 630 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 49 हजार 637 एवढी झाली असून यातील 37 हजार 749 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 698 रुग्ण उपचार घेत असून 199 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 2 ते 4 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 23 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 944 एवढी झाली आहे.  दिनांक 2 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे देगलूर नाका नांदेड येथील 45 वर्षाची महिला, दत्तनगर नांदेड येथील 50 वर्षाची महिला, दिनांक 3 एप्रिल रोजी लोहार गल्ली नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील चोंडी येथील 75 वर्षाचा पुरुष, जयभवानी नगर नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष, अर्धापूर येथील 60 वर्षाचा पुरुष, लेबर कॉलनी नांदेड येथील 68 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नायगाव तालुक्यातील नरसी येथील 55 वर्षीय पुरुष, गाडीपुरा नांदेड येथील 78 वर्षाचा पुरुष, चैतन्य नगर नांदेड येथील 80 वर्षाची महिला, मुदखेड येथील 44 वर्षाचा पुरुष, भावसार चौक नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष, हदगाव येथील 65 वर्षाची महिला, गणेश नगर नांदेड 60 वर्षाचा पुरुष, हज्जापूर ता. बिलोली येथील 65 वर्षाचा पुरुष, पिंपळकौठा ता. मुदखेड येथील वर्षाची 65  महिला , अर्धापूर येथील 55 वर्षाचा पुरुष ,  वाल्पना हदगाव येथील 65 वर्षाची महिला पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय कामरी ता.हिमायतनगर येथील 45 वर्षाचा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय मुखेड येथील 44 वर्षाचा पुरुष, नवळी ता. मुखेड येथील 52 वर्षाचा पुरुष, निर्मल कोविड रुग्णालय हरबल ता. लोहा येथील 80 वर्षाचा पुरुष, गोकुळ नगर नांदेड येथील 85 वर्षाचा, असे एकूण 23 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

 

आज रोजी 1 हजार 698 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 12, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 695, कंधार तालुक्याअंतर्गत 4, किनवट कोविड रुग्णालय 9, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 11, भोकर तालुक्याअंतर्गत 35, बिलोली तालुक्याअंतर्गत 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 24, उमरी तालुक्याअंतर्गत 42, नायगाव तालुक्याअंतर्गत  15, मुखेड कोविड रुग्णालय 7, देगलूर तालुक्याअंतर्गत  21, बारड कोविड केअर सेंटर 8, खाजगी रुग्णालय 125, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 16, मांडवी कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद तालुक्याअंतर्गत 1, लोहा तालुक्याअंतर्गत 19, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 17 असे एकूण 1 हजार 698 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.05 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 214, देगलूर 16, लोहा 44, नायगाव 15, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 11, हदगाव 29, माहूर 1, उमरी 1, अर्धापूर   4, कंधार 31, मुदखेड 3, परभणी 1, भोकर 16, किनवट 15, मुखेड 26, हिंगोली 3 असे एकूण 432 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 245, बिलोली 30, हिमायतनगर 3, माहूर 1, उमरी 6, परभणी 2, नांदेड ग्रामीण 19, देगलूर 36, कंधार 12, मुदखेड 5, बीड 2, लातूर 1, अर्धापूर 29, धर्माबाद 9, किनवट 62, मुखेड 27, उस्मानाबाद 1, आदिलाबाद 2, भोकर 25, हदगाव 5, लोहा 75, नायगाव 31, हिंगोली 2 असे एकूण 630 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 10 हजार 698 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 240, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 112, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 199, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 143, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 133, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 436, देगलूर कोविड रुग्णालय 51, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 107, बिलोली कोविड केअर सेंटर 225, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, नायगाव कोविड केअर सेंटर 157, उमरी कोविड केअर सेंटर 24, माहूर कोविड केअर सेंटर 12, भोकर कोविड केअर सेंटर 24, हदगाव कोविड रुग्णालय 33, हदगाव कोविड केअर सेंटर 40, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 128, कंधार कोविड केअर सेंटर 27, धर्माबाद कोविड केअर सेंटर 72, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 41, बारड कोविड केअर सेंटर 20, मांडवी कोविड केअर सेंटर 10, महसूल कोविड केअर सेंटर 121, एनआरआय कोविड केअर सेंटर 220, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 157, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 915, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 605, खाजगी रुग्णालय 1 हजार 428 असे एकूण 10 हजार 698 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 6 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 43 हजार 952

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 87 हजार 348

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 49 हजार 637

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 37 हजार 749

एकुण मृत्यू संख्या-944

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.05 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-20

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-60

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-358

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 698

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-199.

00000

 

 

 

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत

नांदेड शहरातील चाळीस औषध विक्रेत्यांची यादी जाहिर

 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात जानेवारीपासून कोविड बाधितांची संख्या मोठया प्रमाणात वाढत गेल्याने यातील गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना द्याव्या लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत नांदेड शहरातील चाळीस औषध विक्रेत्यांची यादी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने जाहिर करण्यात आली.

सद्यस्थितीत सिप्रिमी, जुबी-आर, रेमेबीन, डेसरेन, कोविफॉर, रॅमडॅक, सिपला, जुबीलियंट, सनफार्मा, मायलॉन, हेट्रोड्रग्स, झायडस कॅडीला या नावाने रेमडेसिवीर युक्त औषधे उपलब्ध आहेत. प्रत्येक औषधाच्या किंमती वेगवेगळया आहेत. यावर नमूद औषधाच्या किंमती (एमआरपी) कंपन्यानुसार जरी वेगवेगळया असल्या तरी त्या रास्त दरात रुग्णांसाठी उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांना दिलेले आहेत. याचबरोबर या इंजेक्शनच्या कंपनीनिहाय किंमती दर फलकावर त्यांच्या मेडीकल स्टोअरच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या औषधाची विक्री करताना औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांचे मूळ प्रिस्क्रीप्शन, रुग्णांचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट, सिटीस्कॅन रिपोर्ट, रुग्णांचे आधारकार्ड यांच्या प्रती घेवूनच औषधाची विक्री करावी असेही स्पष्ट केले आहे. 

डॉक्टरांनी हे इंजेक्शन सूचविताना प्रिस्क्रीप्शनवर आपले नाव, शिक्षण , रजिस्ट्रेशन क्रमांक, स्वाक्षरी, रुग्णांचे नाव व तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचा स्पष्ट अभिप्राय देण्यासाठीही निर्देश केले आहेत. कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने स्वाभाविकच यातील गंभीर रुग्णांसाठी या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. यात दिलेल्या निर्देशाप्रमाणे नांदेड येथील कोविड रुग्णालय व त्यांच्याशी संलग्न असलेल्या औषध विक्रेत्याकडून यांची विक्री दिलेल्या दरात व गरजेप्रमाणे होते किंवा नाही हे तपासण्यासाठी तीन समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शासनातर्फे या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व स्तरावरुन निर्देश दिले असून योग्य तो समन्वय साधला जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (औषधे) रोहीत राठोड यांनी सांगितले.

कोविड रुग्णांचा उपचार हे शासनाने परवानगी दिलेल्या रुग्णालयाची यादी लक्षात घेवून ज्यांना इंजेक्शनची अत्यावश्यकता आहे अशाच रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली रेमडेसिवीअर हे इंजेक्शन घेणे गरजेचे आहे. गरज नसताना केवळ अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून हे इंजेक्शन शासनाने मान्यता न दिलेले डॉक्टर सुचवत असल्याने बाजारात मागणी वाढल्याचे दिसत आहे. एखादे व्यावसायिक या इंजेक्शनसाठी जास्त किंमतीने दर आकारत असेल तर त्याबाबत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.  याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून नांदेड जिल्ह्यातील जनतेला या समन्वय अधिकाऱ्यामध्ये सु.द. जिंतूरकर – 7588794495, मा.ज.निमसे-9423749612, र.रा. कावळे-9923630685 यांचा समावेश आहे.

0000

 

सर्व हॉटेल चालक, अन्न पदार्थ उत्पादक-वितरक

विक्रेत्यांना कोविड-19 तपासणी बंधनकारक

 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यातील सर्व हॉटेल चालक, अन्न पदार्थ उत्पादक-वितरक विक्रेत्यांना आणि अशा व्यवसायाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व कामगार, मालक यांना  कोविड-19 ची तपासणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे  या तपासणी समवेत सर्व कामगार मालकांनी मास्क वापरणे, हॉटेल- पेढीची स्वच्छता -ग्राहकांमधील सुरक्षित अंतर स्वच्छतेची काळजी अनिवार्य करण्यात आली असल्याचे अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) प्र.म.काळे यांनी सांगितले.

 

याचबरोबर अन्न पदार्थाची गुणवत्ता, दर्जा यांच्याबद्दल सर्व संबंधित व्यावसायिकांनी दर्जाबाबत जागरुकता ठेवून मुदत बाह्य अन्न पदार्थाची विक्री होवू नये, याबाबत दक्षता घेतली पाहिजे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, बेकरी व मिठाई विक्रेते यांनी विहित वेळेत पार्सल सेवा देताना शिळे अन्न, पदार्थ, दर्जाहिन अन्नपदार्थाचा वापर कटाक्षाने टाळावा असे त्यांनी स्पष्ट केले . पदपथावरील तयार अन्नपदार्थ विक्रेत्यांनी, निर्धारीत वेळेत केवळ पार्सल सेवा पुरविणे आवश्यक आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, उत्पादक, रिपॅकर्स यांनी यांची काटेकोर अंमलबजावनी करताना सर्व कामगारांच्या वैद्यकीय तपासण्या, लसीकरणे सर्व प्राथम्याने पार पाडावीत असे स्पष्ट केले आहे.

 

सर्व अन्न व्यवसाय चालकांकडून नियमांची, आदेशाची योग्य अंमलबजावनी होते किंवा कसे याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी खातरजमा करुन दोषीविरुध्द कडक कायदेशिर कारवाई केली जाईल असे सहायक आयुक्त प्र.म.काळे यांनी सांगितले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...