Thursday, February 1, 2018

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा 
नांदेड दि. 1 :-  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी पुणे येथुन शासकीय वाहनाने सोलापूर-औसा-लातूर मार्गे दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह मुखेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार 3 फेब्रवारी रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह मुखेड येथून सिद्धाश्रम तपोवन हनुमानगड  तेलूर ता. कंधारकडे प्रयाण. सकाळी 11 वा. सिद्धाश्रम तपोवन हनुमानगड तेलूर येथे आगमन व श्री स्वामी प्रणवानंदजी सरस्वती महाराज (वृंदावन) आयोजित आशिर्वचन व महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वा. सिद्धाश्रम तपोवन हनुमानगड तेलूर येथून उजनी जि. सोलापूरकडे प्रयाण करतील.

0000000
समाजमाध्यमांच्या विधायक उपयोगाचा उपक्रम
सोशल मीडिया महामित्र
सहभागी होण्याचे आवाहन
नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड दि. 1 : आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना अधिकाधिक वाव देऊन समाज अधिक विवेकी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या सोशल मीडिया महामित्रउपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
देशातील बहुतांश तरुण फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत असतात. ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ही बाब समोर ठेऊन सोशल मीडियाचा सदुपयोग समाजात अधिक विवेकवादी आणि सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा म्हणून करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सोशल मीडिया महामित्रहा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सोशल मीडिया महामित्रपुरस्कारप्राप्त व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद  साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील  मिळणार आहे.
या उप्रकमासाठी आज 1 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु झाली असून ती 18 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. गुगल प्ले स्टोअरअथवा ॲपलच्या ‘’ॲप स्टोअर वरुन महामित्र (Maha Mitra) हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल.
प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) प्रत्येकी 10सोशल मिडिया महामित्रनिवडले जाणार असून त्यांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येईल. या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी 1 महामित्राची राज्यस्तरावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्य स्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्यात येईल. या कार्यक्रमात निवडलेल्यांना सोशल मिडिया महामित्रपुरस्कार देण्यात येईल तसेच त्यांना मान्यवरांशी संवाददेखील साधता येणार आहे.
विविध मॅसेजिंग ॲपच्या सर्वाधिक टॉप पाच ग्रुपमधील कॉन्टॅक्ट्सची संख्या, फोनबुकमधील एकूण कॉन्टॅक्ट्सची संख्या, किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म/मॅसेजिंग ॲप्लीकेशन उपयोगात आणण्यात येत आहेत, सहभागी व्यक्तीला त्याच्या स्नेहीजनांनी दिलेली मते, सोशल मीडियातील प्रभाव आजमावण्यासाठी सहभागी व्यक्तीला पाठविलेल्या संदेशापैकी किती संदेश त्यांनी वितरित केले आहेत, आलेल्या संदेशाचे पाठविलेल्या संदेशाशी गुणोत्तर. या आधारे महामित्र निवडण्यात येतील. या निकषांना मिळणाऱ्या गुणांकन आधारे आपले स्थान (रँक) काय आहे हे त्या सहभागी व्यक्तीला दिसेल.  निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप 20 सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूर, ॲनिमेशन, ग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी  निवड करण्यात येईल. गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन या 10 व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
सकारात्मक व सौहार्दपूर्ण महाराष्ट्र बनविण्यात आपला हातभार लावण्यासाठी सोशल मीडिया-महामित्रउपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम
नांदेड दि. 1 :- राज्‍य निवडणूक आयोगाने  मार्च ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्‍याने स्‍थापीत ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंच पदासह सर्व सदस्‍य पदांसाठी तसेच रिक्‍त पदांच्या पोट निवडणूकासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार नांदेड जिल्‍हयातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्‍या ग्रामपंचायतीचा तपशील पुढील प्रमाणे आहे, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने देण्यात आली आहे.
तालुका
ग्रामपंचायतीचे नाव
देगलूर
गोगला गोविंद तांडा
धर्माबाद
हसनाळी
माहुर
चोरड (जुनापाणी)
            तर रिक्‍त पदांचा पोट निवडणूक असलेल्‍या ग्रामपंचायतीचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
तालुका 
पोट निवडणूक असलेल्‍या गा.पं. संख्‍या
रिक्‍त पदांची संख्‍या
शेरा
माहूर
19
40
हिंगणी थेट सरपंच  निवड
किनवट
50
83
मलकजाम व मारेगाव वरचे ग्रा.पं. थेट सरपंच निवड
हिमायतनगर
1
2

हदगाव
10
21

अर्धापूर
5
8

नांदेड
11
15

मुदखेड
3
3

भोकर
4
5

उमरी
8
14

धर्माबाद
15
22

बिलोली
8
13

नायगाव खै.
2
2

लोहा
15
24
खरबी  थेट सरपंच निवड
कंधार
6
6

मुखेड
9
17

देगलूर
20
23

एकुण
186
298
4

  सार्वत्रिक व पोटनिवडणूका असलेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये आचारसंहिता 22 जानेवारी 2018 रोजी रात्री 12 वाजल्‍यापासुन लागू झालेली असुन निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अंमलात राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा आचारसंहिता कालावधीत कुणालाही  करता येणार नाही.
   आरक्षीत जागावर निवडणूक लढविणा-या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्राऐवजी  हमीपत्र घेण्‍याच्‍या सवलतीस ग्रामविकास विभागाकडून दि. 31 डिसेंबर 2017 नंतर मुदतवाढ न देण्‍यात आल्‍याने या निवडणुकासाठी आरक्षीत पदावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 -1 अ नुसार अनिवार्य आहे. याची सर्व इच्‍छुक उमेदवारांनी नोंद घ्‍यावी.
सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्रे संगणकीकृत पध्‍दतीने (ऑनलाईन) तर पोट निवडणूकासाठी नामनिर्देशनपत्रे पारंपारीक पध्‍दतीने (Manually)  स्‍वीकारण्‍यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील
निवडणूकीचे टप्‍पे
दिनांक
तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक
दि. 25/1/2018 (गुरुवार)
नामनिर्देशनपत्रे मागविण्‍याचा व सादर करण्‍याचा दिनांक व वेळ
दि. 5/2/2018 (सोमवार) ते दि. 10/2/2018 (शनिवार) वेळ स. 11.00 ते दु. 4.30
नामनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचा दिनांक व वेळ
दि. 12/2/2018 (सोमवार) वेळ स. 11.00 वाजल्‍यापासुन छाननी संपेपर्यंत
नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक व वेळ
दि. 15/2/2018 दु. 3.00 वाजेपर्यंत
निवडणूक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच अंतिमरित्‍या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्‍याचा दिनांक व वेळ
दि. 15/2/2018 (गुरुवार) दु. 3.00 वा. नंतर
आवश्‍यक असल्‍यास मतदानाचा दिनांक
दि. 25/2/2018 (रविवार) स. 7.30 वा. पासुन ते सायं. 5.30 वा. पर्यंत)
मतमोजणीचा दिनांक
दि. 26/2/2018 (सोमवार)
निवडणूकांचा निकाल प्रसिध्‍द करण्‍याचा अंतिम दिनांक
दि. 27/2/2018 (मंगळवार) पर्यंत

या निवडणूकीमध्‍ये माहे सप्‍टेंबर व ऑक्‍टोबर 2017 मध्‍ये पार पडलेल्‍या  सार्वत्रिक निवडणूकीच्‍यावेळी रिक्‍त असलेल्‍या सरपंच पदाची पोट निवडणूक घेण्‍यात येणार आहे. सार्वत्रिक निवडणूका असलेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या बाबतीत सरपंच थेट पध्‍दतीने निवडून द्यावयाचे असल्‍याने निवडणूक आचारसंहितेच्‍या अंमलबजावणीबाबत विशेष उपाययोजना करण्‍यात येणार  आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

000000
मृद, जलसंधारण कामांसाठी
मशिनधारकांची नोंदणी
नांदेड दि. 1 :-  जलसंधारण विभागांचे मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी मशिनधारकांची नोंदणी करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत असणाऱ्या कंत्राटदाराप्रमाणे सिमेंट नालाबांध व वळण बंधारे वगळता मृद व जलसंधारणाची इतर कामे करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छूक मशिनधारकांनी (जेसीबी, पोकलॅन, टाटा हिताची हुंदाई व इतर ) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी 10.30 ते सायं 5 वाजेपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000
महात्मा फुले विकास महामंडळाच्या
कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 1 :-  अनुसूचित जाती व नवबौद्ध लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सन 2017-18 या आर्थिक वर्षात महामंडळाचे राज्य शासन पुरस्कृत 50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनांचा लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्या अर्जदारांना महामंडळाच्या www.mahatmaphulecorporation.com/applications या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
इच्छूक अर्जदारांना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी अर्जदारांनी त्यांचे स्वत:चे ईमेल खाते वापरुन ऑनलाईन पद्धतीने कर्ज मागणी अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी मागणी अर्जाची मुळ प्रत व आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित, स्वयंसाक्षांकित प्रती जिल्हा कार्यालयात स्वत: सादर करावीत. त्रयस्त व्यक्तीकडून अर्ज किंवा इतर कोणतेही कागदपत्रे स्विकारले जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000
अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्तीचे  
ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 1 :- स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील महाविद्यालयात इयत्ता बारावी नंतर सर्व अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. संबंधीत विद्यार्थ्यांचे नवीन मंजुरी व नुतनीकरणाचे अर्ज ऑफलाईन मागविण्यात येत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थाप्रमुख यांनी महाविद्यालयातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ऑॅफलाईन अर्ज भरण्यासाठी योग्य प्रयत्न करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.
शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यवसायिक महाविद्यालयातील इयत्ता 12 वी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमा(कला, वाणिज्य, विज्ञान, पदवी व पदव्युत्तर) शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. शिष्यवृत्तीसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केलेल्या MahaDBT पोर्टलव्दारे सन 2017-18 या वर्षासाठी ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. या विद्यार्थ्यांचे  शिष्यवृत्ती अर्ज ऑफलाईन पध्दतीने विहित नमुन्यात सादर करावीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  

000000
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ 
नांदेड दि. 1 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2018-18 साठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुदत बुधवार 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
यापुर्वी दिलेल्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या रहिवासी जिल्ह्यात या योजनेसाठी अर्ज करावयाचा होता. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावीत. हा बदल 31 डिसेंबर 2017 पुर्वी प्राप्त झालेल्या अर्जांसाठी लागू राहणार नाही. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षांसाठी यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नयेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड यांनी केले आहे.

00000
सैनिक अंशदायी आरोग्य योजनेत
 विविध पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 1 :-  सैनिक अंशदायी आरोग्य योजना पॉलीक्लिनिक इसीएचएस नांदेड आणि औरंगाबाद येथे  कंत्राटी पद्वतीने एका वर्षासाठी विविध पदे भरण्यात येणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज स्टेशन हेडक्वॉर्टर औरंगाबाद छावणी औरंगाबाद येथे मंगळवार 6 मार्च 2018 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या पुढील प्रमाणे आहे. OIC ECHS -1,    मेडीकल ऑफीसर-2,   दंतचिकीत्सक-1,  लॅब टेक्निशियन-1,  नर्सींग असिस्टंट-1,  फर्मासिस्ट-1, लॅब टेक्निशियन-1, फिजीथेरीपीस्ट-1, डेन्टल टेक्नीशियन-1, ड्राइव्हर-1, महिला सहायक-1,  चौकीदार-1, शिपाई-1 व सफाईकामगार-1  या पदांचा समावेश आहे.
वयोमर्यादा, मानधन पुढील प्रमाणे राहील. दंतचिकीत्सक, OIC ECHS वय- 65  वर्षे, मेडीकल ऑफीसर वय-68, मानधन 75 हजार रुपये. लॅब टेक्निशियन, फिजीओथेरीपीस, नर्सींग असिस्टंट, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, डेन्टल टेक्नीशियन या पदांसाठी वय 58 वर्षे व मानधन 28 हजार 100 रुपये. ड्रायव्हर वय-55 मानधन 19 हजार रुपये. चौकीदार, शिपाई, सफाईकामगार, महिला सहायक वय 55 मानधन 16 हजार रुपये.  
माजी सैनिक अधिकारी यांचेसाठी OIC ECHS हे पद आहेत. इतर पदे माजी सैनिक तसेच सिव्हीलीयन वर्गातून भरली जातील. अधिक माहितीसाठी अधिक माहिती  www.echs.gov.in    या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे. तसेच ECHS Cell, औरंगाबाद दुरध्वनी क्रमांक 0240-2372229 व मोबाईल- 7887757481 वर संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.   

000000
शिष्यवृत्तीबाबत प्राचार्य ,
कर्मचाऱ्यांची शनिवारी बैठक
नांदेड दि. 1 :- जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगरव्यावसायिक, अनुदानित व विनाअनुदानीत महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम पाहणारे कर्मचाऱ्यांची शनिवार 3 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 1 वा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण परीक्षा फी, प्रतिपुर्ती योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्याबाबत विभागाकडून अवलंबवायची अद्यावत व सुधारीत कार्यपद्धती, नियम अटी व शर्तीबाबत माहिती देण्यात येणार आहे. संबंधितांनी बैठकीस उपस्थित न राहिल्यास या योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मंजुरी संदर्भात अडचणी आल्यास संबंधीत महाविद्यालयाची जबाबदारी राहील, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

000000
बेपत्ता मुलीचा शोध
नांदेड दि. 1 :- लोहा तालुक्यातील धनज खु. येथील वैष्णवी रोहीदास कदम (वय 17) ही मुलगी  24 एप्रिल 2017 रोजी कहाळा खु. येथुन परत घरी आली नाही. या मुलीचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग गोरा, पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात बुट, भाषा मराठी-हिंदी बोलते, नाक सरळ, अंगाने मध्यम, चेहरा गोल, उंची 150  सेंमी, डोळे काळे आहेत. या वर्णनाच्या मुलीची माहिती मिळताच तपासिक अंमलदार मो. 9403515403, 9637064194 व पोलीस स्टेशन कुंटूर नंबर 02465-258533 यांच्याशी संपर्क  साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कुंटूर यांनी केले आहे.

00000

समाजमाध्यमांच्या विधायक उपयोगाचा उपक्रम
सोशल मीडिया महामित्र
सहभागी होण्याचे आवाहन
नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई दि. 1 : आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना अधिकाधिक वाव देऊन समाज अधिक विवेकी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या सोशल मीडिया महामित्रउपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
देशातील बहुतांश तरुण फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत असतात. ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ही बाब समोर ठेऊन सोशल मीडियाचा सदुपयोग समाजात अधिक विवेकवादी आणि सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा म्हणून करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सोशल मीडिया महामित्रहा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सोशल मीडिया महामित्रपुरस्कारप्राप्त व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद  साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील  मिळणार आहे.
या उप्रकमासाठी आज 1 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु झाली असून ती 18 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. गुगल प्ले स्टोअरअथवा ॲपलच्या ‘’ॲप स्टोअर वरुन महामित्र (Maha Mitra) हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल.
प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) प्रत्येकी 10सोशल मिडिया महामित्रनिवडले जाणार असून त्यांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येईल. या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी 1 महामित्राची राज्यस्तरावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्य स्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्यात येईल. या कार्यक्रमात निवडलेल्यांना सोशल मिडिया महामित्रपुरस्कार देण्यात येईल तसेच त्यांना मान्यवरांशी संवाददेखील साधता येणार आहे.
विविध मॅसेजिंग ॲपच्या सर्वाधिक टॉप पाच ग्रुपमधील कॉन्टॅक्ट्सची संख्या, फोनबुकमधील एकूण कॉन्टॅक्ट्सची संख्या, किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म/मॅसेजिंग ॲप्लीकेशन उपयोगात आणण्यात येत आहेत, सहभागी व्यक्तीला त्याच्या स्नेहीजनांनी दिलेली मते, सोशल मीडियातील प्रभाव आजमावण्यासाठी सहभागी व्यक्तीला पाठविलेल्या संदेशापैकी किती संदेश त्यांनी वितरित केले आहेत, आलेल्या संदेशाचे पाठविलेल्या संदेशाशी गुणोत्तर. या आधारे महामित्र निवडण्यात येतील. या निकषांना मिळणाऱ्या गुणांकन आधारे आपले स्थान (रँक) काय आहे हे त्या सहभागी व्यक्तीला दिसेल.  निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप 20 सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूर, ॲनिमेशन, ग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी  निवड करण्यात येईल. गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन या 10 व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
सकारात्मक व सौहार्दपूर्ण महाराष्ट्र बनविण्यात आपला हातभार लावण्यासाठी सोशल मीडिया-महामित्रउपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...