शिष्यवृत्तीबाबत
प्राचार्य ,
कर्मचाऱ्यांची
शनिवारी बैठक
नांदेड दि. 1 :-
जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगरव्यावसायिक, अनुदानित व विनाअनुदानीत
महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम पाहणारे कर्मचाऱ्यांची शनिवार 3
फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 1 वा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सभागृहात
बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत भारत सरकार
शिष्यवृत्ती, शिक्षण परीक्षा फी, प्रतिपुर्ती योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2017-18
मधील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
मंजूर करण्याबाबत विभागाकडून अवलंबवायची अद्यावत व सुधारीत कार्यपद्धती, नियम अटी
व शर्तीबाबत माहिती देण्यात येणार आहे. संबंधितांनी बैठकीस उपस्थित न राहिल्यास या
योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मंजुरी संदर्भात अडचणी आल्यास संबंधीत महाविद्यालयाची
जबाबदारी राहील, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment