महात्मा
फुले विकास महामंडळाच्या
कर्ज
योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 1 :- अनुसूचित जाती व नवबौद्ध लोकांना
स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सन 2017-18 या
आर्थिक वर्षात महामंडळाचे राज्य शासन पुरस्कृत 50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल
योजनांचा लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्या अर्जदारांना महामंडळाच्या www.mahatmaphulecorporation.com/applications
या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले
आहेत.
इच्छूक अर्जदारांना महात्मा
फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी अर्जदारांनी त्यांचे स्वत:चे
ईमेल खाते वापरुन ऑनलाईन पद्धतीने कर्ज मागणी अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज केलेल्या
अर्जदारांनी मागणी अर्जाची मुळ प्रत व आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित,
स्वयंसाक्षांकित प्रती जिल्हा कार्यालयात स्वत: सादर करावीत. त्रयस्त व्यक्तीकडून
अर्ज किंवा इतर कोणतेही कागदपत्रे स्विकारले जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी, असे
आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment