मृद,
जलसंधारण कामांसाठी
मशिनधारकांची
नोंदणी
नांदेड दि. 1 :- जलसंधारण विभागांचे मृद व जलसंधारणाची कामे
करण्यासाठी मशिनधारकांची नोंदणी करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे
नोंदणीकृत असणाऱ्या कंत्राटदाराप्रमाणे सिमेंट नालाबांध व वळण बंधारे वगळता मृद व
जलसंधारणाची इतर कामे करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छूक
मशिनधारकांनी (जेसीबी, पोकलॅन, टाटा हिताची हुंदाई व इतर ) जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी 10.30 ते सायं
5 वाजेपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले
आहे.
00000
No comments:
Post a Comment