Thursday, August 1, 2024

 


 


मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेत नांदेड जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. माध्यमांसाठी चित्रफीत.

 वृत्त क्र 662 

मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील

युवकांमुळे प्रशासन आणखी गतीमान व्हावे : जिल्हाधिकारी

 

शुक्रवार सायंकाळपर्यंत सर्व विभागांनी आपली मागणी कळवण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 1 ऑगस्ट : राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून तरुण रक्ताचे सुशिक्षित बेरोजगार युवक शासकीय यंत्रणेला मिळणार आहे. युवाशक्तीचा उपयोग प्रशासन आणखीन गतिमान करण्यासाठी कराअशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे व्यक्त केली.

 

मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांची नियुक्तीत्यांना द्यावयाची कामेआणि नव्याने सरकारी आस्थापनावर नियुक्ती होताना घ्यावयाची काळजीयासंदर्भातील जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी  कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यासहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी सादरीकरण केले. तसेच कशाप्रकारे नियुक्ती करण्यात यावी ऑनलाइन नोंदणी कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी केले.

 

त्यानंतर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने येणारे उमेदवार ही पदभरती नसून युवकांना पुढील आयुष्यात ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी प्रशासनप्रशासनाचे कार्य आणि प्रशासनाची बांधिलकी याबाबतचे योग्य मत तयार करण्याची संधी आहे. शासनामध्ये काम करताना अनेक कामांसाठी आपले मनुष्यबळ लागत असते काही दुय्यम कामांमध्ये आपले मनुष्यबळ खर्ची होते. शासनाच्या अनेक ऑनलाईन योजना आहेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आहे. त्यांच्या प्रसिद्धीची कामे आहेत.अशा कामांमध्ये या नव्या मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे. येणारे उमेदवार हे आपल्या शासकीय यंत्रणेचे सदस्य नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या कायद्यानुसार पद निहाय कोणतीही कामे देता येणार नाही. मात्र त्यांचे योग्य प्रशिक्षण करणे हे आपले कार्य असून त्यासाठी नियोजन करावे. उद्यापर्यंत सर्व कार्यालयाने या संदर्भात नोंदणी नोंदवावी असे आवाहनही त्यांनी केले.

00000











 वृत्त क्र 661 

  वृत्त क्र 660

आज ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन

·         कार्यक्रमाच्या लिंकसाठी कृषि विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन

·         दर शुक्रवारी होणार शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड दि. 1 ऑगस्ट :-  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणीचे कुलगुरु यांच्या ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे उद्या शुक्रवार 2 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सद्यपरिस्थितीत सोयाबीनकपाशीवरील किड व्यवस्थापन’ या विषयावर माहिती देण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यकसंबंधित कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या कार्यक्रमाची लिंक प्राप्त करुन घ्यावीअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना पिकावरील किड याबाबत योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. हा शेतकरी संवाद कार्यक्रम दर शुक्रवारी ऑनलाईन होणार असून शेतकऱ्यांनी  या कार्यक्रमाची लिंक उपलब्ध करुन घेण्यासाठी दर आठवड्याला गावातील संबंधित कृषी अधिकारीकृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

00000

सुधारीत वृत्त क्र 659

 

शनिवारी अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन

 

नांदेड दि. 1 ऑगस्ट :-  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे अवयवदान जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने  3 ऑगस्ट 2024 रोजी भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचे आयोजन समाजामध्ये अवयवदानाचे महत्त्व, प्रक्रिया आणि त्याचे फायदे याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे.

 

ही रॅली 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वा. सुरू होऊन महात्मा फुले पुतळा आय.टी.आय. कॉर्नरपासून शहरातील विविध मार्गांवरून परत ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त होईल. या महत्त्वपूर्ण उपक्रमामध्ये डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नांदेड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स त्याचबरोबर अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

 

अवयवदानामुळे अनेकजणांना नवीन जीवन मिळू शकते. एक अवयवदाता आपले हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस आणि इतर अवयवदान करून अनेकजणांचे जीवन वाचवू शकतो. अवयवदान हे समाजाच्या हितासाठी केलेले एक उत्तमकार्य असून त्यामुळे समाजात सकारात्मकता निर्माण होते. या रॅलीमध्ये अवयवदान प्रक्रियेवरील चित्रफलक, पोस्टर, माहितीपत्रके आणि घोषनांव्दारे अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

 

नांदेड शहरातील सर्व शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी सदरील रॅलीमध्ये मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.

000000

 

 वृत्त क्र 658

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरु

·         नारीशक्ती दूत ॲपवर भरलेले अर्ज पुन्हा संकेतस्थळावर भरण्याची गरज नाही

नांदेड दि. ऑगस्ट :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी नवीन वेबसाईट (संकेतस्थळ ) सुरू झाले आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य आहे, त्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोणत्याही पात्र लाभार्थ्याचा अर्ज शेवटी ऑनलाइन करावाच लागतो. तो एक तर स्वतः किंवा यंत्रणेद्वारे ऑनलाईन केला जातो जिल्ह्यामध्ये ज्यांना ऑनलाईन करता येत नाही. त्यांच्यासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र आता संकेतस्थळाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. ज्यामुळे त्वरेने आणि सुलभरीत्या अर्ज अपलोड होतील. जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत जवळपास सहा लाखावर पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. उर्वरित महिलांचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही प्राधान्याने सुरु आहे. या योजनेतील महिलांना अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नयेत यासाठी शासनाच्यावतीने डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन अर्थात www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ आजपासून सुरु केले आहे. तरी या योजनेतील पात्र महिलांनी अर्ज भरण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करावाअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सध्या जिल्ह्यात उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत असून याबाबत जिल्हा यंत्रणा अधिक सक्रीयपणे काम करीत आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना पहिला लाभ रक्षाबंधनाला मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांनी अद्यापपर्यत अर्ज भरला नसेल तर त्यांनी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात केलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्ती दूत ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या संकेतस्थळावर पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही असेही प्रशासनाने कळविले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही प्राधान्याने सुरु असून अर्ज भरण्यासाठी महिलांनी घाईगडबड करु नये. प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरुन घेण्यात येणार आहे आणि अर्ज भरलेल्या सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेतील अर्जाच्या छाननीचे कामही सुरू असून छाननीनंतर पात्र महिलांची यादी तयार करण्यात येवून महिलांना येत्या रक्षाबंधनापर्यत लाभ देण्याची कार्यवाही होण्याच्या दृष्टीने प्रशासन दक्षता घेत आहे. तरी ज्या महिलांनी अद्यापपर्यत या योजनेचे आपले अर्ज भरले नाहीत त्यांनी आजपासून सुरू केलेल्या www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून आपले अर्ज भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

 प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 31 जुलै 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक दि. 31 जुलै 2024, 02 व 03 ऑगस्ट 2024 या तीन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. या दरम्यान जिल्ह्यात दि. 31 जुलै 2024 रोजी तूरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व दि. 02 ऑगस्ट 2024 रोजी तूरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व दि. 03 ऑगस्ट 2024 रोजी तूरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी जनतेने काळजी घ्यावी.

00000

31.7.2024.

  वृत्त क्र 657

'एक लाख मराठा ' उद्योजकांची संख्या पूर्ण अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कौतुक 

 मराठा समाजातील युवकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड दि. ३१ जुलै :अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील एक लाख उद्योजकांची संख्या पूर्ण झाली आहे.

मराठा समाजाला न्याय देणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले असून मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृहावर सत्कार करण्यात आला आहे.

       अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना अंतर्गत आजपर्यंत एक लक्ष 14 लाभार्थी झाले असून या लाभार्थ्यांना 8320 कोटी रुपये बँकांनी व्यावसायिक कर्ज वितरित केले आहेत. त्यापैकी महामंडळांनी 832 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे.

     मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले.या महामंडळाच्या माध्यमातून जुन्या योजना बंद करून नवीन सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या महामंडळाचे अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली होती.

     नरेंद्र पाटील यांनी शासनाचे विविध विभागाचे अधिकारी राष्ट्रीयकृत्व सहकारी बँकांचे प्रमुख महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी लाभार्थी तसेच अन्य संबंधितांनी या योजनेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

     प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातील कार्यालय असून मराठा समाजातील युवकांनी आपला नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत मदत घ्यावी असे आवाहन महामंडळाचे स्थानिक समन्वयक शुभम शेवणकर यांनी केले आहे. नांदेड जिल्हयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित कार्यालय जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उज्वल गॅस एजन्सी समोर, शासकीय तांत्रिक विद्यालय बाबा नगर येथे आहे.

0000



  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...