Thursday, August 1, 2024

सुधारीत वृत्त क्र 659

 

शनिवारी अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन

 

नांदेड दि. 1 ऑगस्ट :-  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे अवयवदान जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने  3 ऑगस्ट 2024 रोजी भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचे आयोजन समाजामध्ये अवयवदानाचे महत्त्व, प्रक्रिया आणि त्याचे फायदे याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे.

 

ही रॅली 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वा. सुरू होऊन महात्मा फुले पुतळा आय.टी.आय. कॉर्नरपासून शहरातील विविध मार्गांवरून परत ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त होईल. या महत्त्वपूर्ण उपक्रमामध्ये डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नांदेड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स त्याचबरोबर अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

 

अवयवदानामुळे अनेकजणांना नवीन जीवन मिळू शकते. एक अवयवदाता आपले हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस आणि इतर अवयवदान करून अनेकजणांचे जीवन वाचवू शकतो. अवयवदान हे समाजाच्या हितासाठी केलेले एक उत्तमकार्य असून त्यामुळे समाजात सकारात्मकता निर्माण होते. या रॅलीमध्ये अवयवदान प्रक्रियेवरील चित्रफलक, पोस्टर, माहितीपत्रके आणि घोषनांव्दारे अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

 

नांदेड शहरातील सर्व शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी सदरील रॅलीमध्ये मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...