Friday, February 16, 2018


महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
  नांदेड, दि. 16 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी मंगळवार 20 फेब्रुवारी 2018 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. परंतू फेब्रुवारी 2018 मध्ये तिसऱ्या सोमवारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त शासकीय सुट्टी असल्याने मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची ओळख
           
महाराष्ट्र  शासनाच्या पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजने’ अंतर्गत मेंढी गट वाटप योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम दि. 17 फेब्रुवारी 2018 रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.
या योजनेची थोडक्यात ओळख, राज्यातील मेंढ्यांच्या संख्येमध्ये होणारी प्रागतीक घट, मेंढयापासून मिळणारे मांस, दूध व लोकर उत्पादनापासून निर्माण होणार्‍या रोजगारांची  संधी या पार्श्वभूमीवर राज्यातील भटक्या जमाती (भज-क) या मेंढीपालन करणार्‍या समाजास सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या द्दष्टीने मेंढीपालन या पारंपरिक व्यवसायास प्रोत्साहन देण्याकरिता राज्य शासनाने राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सन  2017-18 या आर्थिक वर्षापासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे 2 जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत राबविणेस मान्यता देण्यात आलेली आहे.
योजनेचा उद्देश-
·         राज्यातील भटकंती करणारे मेंढपाळ पारंपरिक पद्धतीने करीत असलेल्या मेंढी पालन या व्यवसायापासून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे व याव्दारे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचवण्यास मदत करणे.
·         राज्यामध्ये अर्धबंदिस्त/ बंदिस्त मेंढी पालन व्यवसायास चालना देणे.
·         मेंढी पालनाचा पारंपारिक व्यवसाय असणार्‍या समाजातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
·         दरडोई प्रती वर्ष प्रत्येक व्यक्तीच्या आहारामध्ये आवश्यक असणार्‍या मांसाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करणे.
·         राज्यामधील सातत्याने कमी होत असलेल्या मेंढ्यांच्या संख्ये मध्ये वाढ करून, राज्याच्या कृषि व संलग्न क्षेत्रातील स्थूल उत्पन्न वाढीच्या दराचे उद्दीष्ट साध्य करण्यास मदत करणे.
·         उच्च प्रतीच्या सुधारित नरमेंढया द्वारे पारंपरिक प्रजातीच्या मेंढ्यांची अनुवंशिकता सुधारणे.
·         उन्हाळ्याच्या व टंचाईच्या कालावधी मध्ये चारा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने, मेंढ्याच्या वजनात घट होते, त्याच प्रमाणे मेंढपाळांची भटकंती वाढते, यासाठी स्थायी स्वरुपाच्या ठाणबंद पद्धतीने मेंढी पालन करणेसाठी मेंढपाळांना आकर्षित करून त्यांना स्थैर्य निर्माण करून देणे.
·         राज्यामध्ये जास्तीत जास्त सुधारित प्रजातीच्या मेंढ्यांचा प्रसार करण्यावर भर देणे.                                                                                                     
या योजने मध्ये खालील घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
·         स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई – सुविधेसह 20 मेंढया + 1 मेंढानर अशा मेंढीगटाचे 75% अनुदानावर वाटप करणे.  
·         सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे 75% अनुदानावर वाटप करणे
·         मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान
·         मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान
·         हिरव्या चार्‍याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper) खरेदी करण्यासाठी 50% अनुदान.
·         पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी 50% अनुदान.  
योजनेचे स्वरूप :  सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभर्थ्यांना लागू असून या योजनेमध्ये 6 मुख्य घटकांसाठी 45,81,92,338 रूपये अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत दि. ०1/11/2017 ते 18/ 11/2017 पर्यन्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते, सदर अर्जाची पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पशुसंवर्धन अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे कडून ऑनलाइन पद्धतीने छाननी प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा निवड समिति मार्फत लाभधारक निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. या अंतर्गत घटक निहाय निवड करण्यात आलेल्या लाभधारकांना या योजनेचा  लाभ देण्यात येणार आहे.  
अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची स्थापना दि.08 ऑगस्ट 1978 रोजी करण्यात आली असून महामंडाळाच्या स्थापनेनंतर पशुसंवर्धन खात्याच्या ताब्यातील 9 मेष पैदास प्रक्षेत्रे व 1 लोकर उपयोगिता केंद्र दि.01/11/1979 पासून आणि 1 शेळी पैदास प्रक्षेत्र दि.7 ऑगस्ट 1984 पासून महामंडळास हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यानंतर आदिवासी गोवारी शहिद स्मृती शेळी व पशुपालन संस्था बोंद्री, जि.नागपूर ही संस्था दि.6 जुलै 2010 पासून महामंडळास हस्तांतरीत करण्यात आलेली आहे.  
महामंडळाची उद्दिष्टे-
·         महाराष्ट्रात विदेशी / स्थानिक / संकरित शेळ्या मेंढयांची पैदास प्रक्षेत्रे स्थापणे व त्याचा विस्तार करणे, शेळ्या मेंढयांच्या पैदाशी करिता उपयुक्त ठिकाणी अशा केंद्राची वाढ करणेशेळ्या/मेंढया आणि त्यापासून उत्पादित होणाऱ्या वस्तूंची आयात – निर्यात करणे, शेळ्या-मेंढयांची पैदास करणे आणि विक्री करणेस्थानिक शेळ्या मेंढयांची जात सुधारण्यासाठी संकरित पैदास कार्यक्रम हाती घेणेअथवा कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाला मदत करणेशेळ्या मेंढयांच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून पशुपालकांना प्रती शेळी-मेंढी मिळणाऱ्या  उत्पादनात वाढ ‍ होऊन शेळी-मेंढी पालन व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी शासनाच्या मदतीने/मदतीशिवाय विस्तार केंद्रे स्थापणे.
महामंडळामार्फत करण्यात येणारे प्रमुख कार्य-
·         सुधारित जातीचे मेंढेनर व बोकड यांचे पैदाशीकरिता वाटप करणेमहामंडळाच्या विविध प्रक्षेत्रावर डेक्कनी,संगमनेरी व माडग्याळ जातीच्या मेंढया तसेच उस्मानाबादीसंगमनेरी व बेरारी जातीच्या शेळया आहेतसदर प्रक्षेत्रावर शेळ्या मेंढ्यांची पैदास करून त्या पासून उत्पादित होणारे जातिवंत बोकड व मेंढेनर स्थानिक शेळ्या मेंढ्यांची  प्रतवारी सुधारण्या करिता पैदाशिकरिता शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात येते
·         मेंढी व शेळी पालन प्रशिक्षण मेंढी व शेळी पालन व्यवसाय व्यवस्थापनाचे तीन दिवसाचे प्रात्याक्षिकासह प्रशिक्षणाची सोय महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर उपलब्ध करून देण्यात येते.
·         यांत्रिक लोकर कातरणी-  महामंडळामार्फत यंत्राच्या सहाय्याने मेंढ्यांची लोकर कातरणी करून दिली जाते. आता कौशल्य विकास कार्यक्रमास अनुसरून मेंढपाळांना  प्रशिक्षण देऊन,  मेंढया कातरणी करून घेण्याकरिता प्रती मेंढी प्राप्त होणार्‍या सेवाशुल्कामधून ५०शुल्क लोकर कातरणी करणार्‍या प्रशिक्षित मेंढपाळास  देण्यात येते.
·         लोकर खरेदी आणि लोकरीच्या वस्तूची निर्मिती व विक्री-  महामंडळ मेंढपाळांकडील लोकर किफायतशीर भावाने खरेदी करून सदर लोकरीपासून स्थानिक उत्पादकांकडून जेन निर्मिती करून घेण्यात येतेत्यामुळे स्थानिकरीत्या स्वंयरोजगार निर्माण होण्यास मदत होत आहेमहामंडळामार्फत लोकरीच्या शालीब्लॅकेटससतरंज्यागालीचेआसनेजेन इ. वस्तुंची निर्मिती करून त्याचा ग्राहकांना माफक दरामध्ये पुरवठा करण्यात येतो.
·           सुधारीत जातीचे चारा बियाणे व संकरीत गवतांचे थोंबे उत्पादन व पुरवठा महामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळ्या मेंढया करिता उपयुक्त असलेले सुधारीत जातीचे चारा बियाणे व संकरीत गवतांचे थोंबे उत्पादित करून शेळी मेंढी पालकांना रास्त दरात उपलब्ध करून दिल्या जाते.
·         विस्तार व जंनसंपर्क कार्य- शेळी मेंढी पालन व्यवसाय करण्यास  इच्छुक असणार्‍या व्यक्तींना या व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यात येते तसेच या व्यवसायाची तांत्रिक माहीती छापील स्वरुपात उपलब्ध होणे करिता महामंडळामार्फत शेळी मेंढी पालन माहिती पुस्तिका, चारा लागवडीचे तसेच महामंडळाच्या योजनांची माहिती पत्रके तयार करून विविध प्रदर्शनामध्ये भाग घेऊन या व्यवसायाचा प्रचार व प्रसार केला जातो.
·         शेळी मेंढी पालन व्यवस्थापन व चारा पिकांचे प्रात्यक्षिके दाखविणे महामंडळाच्या प्रक्षेत्रावर राज्यातील विविध भागातील भेटी देणार्‍या अभ्यांगतास शेळी पालन व्यवस्थापन व सुधारित जातीच्या चारा पिकांचे प्रात्याक्षिके दाखविली जातात.
·         पैदासक्षम शेळया/मेंढयांचे गटवाटप शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेळी मेंढीपालन योजनेंतर्गत लाभार्थींना वाटण्यात येणाऱ्या पैदासक्षम मेंढया/शेळयांचे गट महामंडळाचे सर्व प्रक्षेत्रांवरून लाभार्थीच्या पसंतीनुसार जीवंत वजनावर पुरविले जातात.
·         बकरीईद निमित्त बोकड वाटप कार्यक्रममहामंडळातर्फे मुस्लिम बांधवांना बकरीईद सणानिमित्त रास्त किंमतीमध्ये बोकड/मेंढेनर उपलब्ध करून देण्यात येतात.
·         शेळ्यामेंढ्याकरिता उपयुक्त वृक्षांची रोपवाटिका तयार करणे- कमी पर्जन्यछायेच्या भागामध्ये येणारे तसेच शेळ्या मेंढयाकरिता उपयुक्त असलेले चारा वृक्षाची रोपवाटिका प्रक्षेत्रावर तयार करण्यात आलेली आहे. 
·         अझोला व गांडूळ खत प्रकल्प-  शेळ्या मेंढ्यांच्या खाद्यावरील खर्च कमी करण्याकरिताखाद्याची पौष्टिकता वाढविण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्षेत्रावर अझोला उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात आलेले आहेतसेच सर्व प्रक्षेत्रावर गांडूळ खत प्रकल्प स्थापन करण्यात आलेले आहे. सदर दोन्ही प्रकल्पाचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना दाखवण्यात येऊन त्याचा प्रसार व प्रचार करण्यात येतो
·         केंद्रीय लोकर विकास मंडळवस्त्रोद्योग मंत्रालयजोधपूर पुरस्कृत मेष व लोकर सुधार कार्यक्रम - या योजनेखाली अहमदनगरनाशिकपुणेसोलापूरसांगली व धुळे या 6 या जिल्हयातील  मेंढपाळांच्या 3.00लाख मेंढया दत्तक घेण्यात आलेल्या आहेतया योजनेमध्ये दत्तक घेतलेल्या मेंढयांना आरोग्य‍ सुविधा मध्ये लसीकरण, जंत प्रतिबंधक औषधोपचार, बाह्य कीटक निर्मूलन, आजारी मेंढ्यांना उपचार, क्षार औषधी इ. आणि या मेंढया मध्ये अंनुवांशिक सुधारणा करण्यासाठी 500 जातिवंत मेंढेनर 100% अनुदानावर वाटप करण्यात येत आहे
********


अखिल भारतीय व्यवसाय
परीक्षेचा दुसरा टप्पा
नांदेड, दि. 16 :- शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेंतर्गत 106 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा माहे नोव्हेंबर 2017 च्या दुसऱ्या टप्प्याची परीक्षा 20 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केली आहे. पात्र उमेदवारांनी dgt.cbtexam.in या पोर्टलवरुन स्वत:चे प्रवेशपत्र डाउनलोड करुन परीक्षा केंद्रावर विहित वेळेआधी अर्धा तास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. आर. बुजाडे यांनी केले आहे.
 परीक्षा हॉलटिकीटमध्ये दर्शविण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर 20 व 21 फेब्रुवारी रोजी थेअरी या विषयाची तसेच 22 फेब्रुवारी रोजी कर्मशालेय गणित व परिगणना, सामाजिक शास्त्र या विषयाची परीक्षा डीव्हीइटीमार्फत घेण्यात येणार आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


जिल्हा रुग्णालया
कर्करोग उपचार शिबीर संपन्न
नांदेड, दि. 16 :- जागतिक कर्करोग दिन व पंधरावडानिमित्त श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर व जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग निदान व उपचार शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात 117 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 23 संशयित कर्करोग रुग्ण आणि 17 कर्करोग ग्रस्त रुग्ण आढळून आले.
            या शिबिरा हैदराबाद येथील अमेरिकन कॅन्सर रुग्णालयातील जेष्ठ कॅन्सर सर्जन डॉ. सतीश पवार तसेच येथील मोनार्क कॅन्सर हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. नरेंद्रसिंघ गुलाटी, कॅन्सर तज्ञ डॉ. नितीन मोरे यांनी रुग्णांची तपासणी व उपचार केला. या शिबिरा नर्सिंग स्कलच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन व पथनाट्य सादर केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयचे डॉक्टर्स, कर्मचारी, राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमाचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
000000

जवाहर नवोदय विद्यालयाची
सहावी प्रवेश परिक्षा 21 एप्रिल रोजी 
नांदेड, दि. 16 :-  जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथील इयत्ता 6 वी प्रवेश परिक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. ही प्रवेश परिक्षा शनिवार 21 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वा. नांदेड जिल्ह्यातील संबंधीत 40 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. संबंधितांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी केले आहे.
00000

अखिल भारतीय व्यवसाय
परीक्षेचा दुसरा टप्पा
नांदेड, दि. 16 :- शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेंतर्गत 106 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा माहे नोव्हेंबर 2017 च्या दुसऱ्या टप्प्याची परीक्षा 20 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केली आहे. पात्र उमेदवारांनी dgt.cbtexam.in या पोर्टलवरुन स्वत:चे प्रवेशपत्र डाउनलोड करुन परीक्षा केंद्रावर विहित वेळेआधी अर्धा तास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. आर. बुजाडे यांनी केले आहे.
 परीक्षा हॉलटिकीटमध्ये दर्शविण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर 20 व 21 फेब्रुवारी रोजी थेअरी या विषयाची तसेच 22 फेब्रुवारी रोजी कर्मशालेय गणित व परिगणना, सामाजिक शास्त्र या विषयाची परीक्षा डीव्हीइटीमार्फत घेण्यात येणार आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

शिष्यवृत्ती योजनेबाबत    
महाविद्यालयांना आवाहन
नांदेड, दि. 16 :- केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना सन 2018-19 च्या अंमलबजावणीसाठी ज्या महाविद्यालय / संस्थचे नाव National Scholarship Portal (www.scholarship.gov.in) च्या होम पेज वर Search Institute/ School/ITI या लिंक वर दिसत नसले, अशा महाविद्यालयांनी नाव नोंदणी शनिवार 31 मार्च 2018 पर्यंत संकेतस्थळावर करावी. मुदतीनंतर नाव नोंदणी बंद होणार आहे, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.
नांदेड विभागांतर्गत स्वामी रामानंद तर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदान / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यवसायिक महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
0000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...