Monday, March 18, 2019


ग्रामपंचायत मतदान, मतमोजणी केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 18 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी रविवार 24 मार्च रोजी मतदान केंद्र परिसर तसेच सोमवार 25 मार्च रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केले आहेत.  
या निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने 24 मार्च रोजी जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत मतदान होणार आहे अशा मतदान केंद्राच्या हद्दीपासून तर 25 मार्चला संबंधीत तहसिलदार यांनी निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन, व्यक्तींस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकीसाठी ग्रामपंचायत हद्दीत 24 मार्च रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या हद्दीपर्यंत सकाळी 6 वाजेपासून ते मतदानाची प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील. तसेच मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत 25 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे आदेशात नमूद केले आहे.
000000


मतदारांनी मतदार यादीत
नाव असल्याची खात्री करुन घ्यावी
नांदेड दि. 18 :- नांदेड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 86- नांदेड उत्तर नांदेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मतदार यादीत नाव असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तहसिल कार्यालय नांदेड येथे जाऊन पडताळणी करता येईल किंवा मोबाईल, संगणकावर www.votersearch.gov.in या संकेतस्थळावर नाव शोधू शकतात.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होत असून मतदार यादीत नाव असलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे. मतदान करण्यासाठी जाताना मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. परंतू ज्या मतदारांना अद्याप मतदान ओळखपत्र मिळालेले नाही किंवा त्यांच्याकडील मतदान ओळखपत्र गहाळ झाले असेल तर त्यांनी पुढील पुरावे मतदान अधिकारी यांना दाखवून मतदान करु शकतात.
पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे / पोस्टाचे पासबुक, पॅनकार्ड, स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, आरोग्यविमा स्मार्ट कार्ड, छायाचित्रासह असलेले सेवानिवृत्त वेतन कागदपत्रे, खासदार, आमदार यांना वितरीत केलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी एक ओळखपत्र दाखवता येईल.
मतदान करणे हा या अधिकाराचा वापर सर्व मतदारांनी  करावा, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...