Tuesday, August 23, 2022

 मुलगी हरवल्याची तक्रार दाखल


· 
माहिती मिळाल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन


नांदेड (जिमाका) दि. 23 :- कुमारी रोहिणी मनोज खाडे वय वर्षे 16 ही दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी श्रावस्तीनगर नांदेड येथून बाहेर गेली ती परत आली नाही. याबाबत तिच्या वडिलाने शिवजीनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे तक्रार दिली आहे. वय वर्षे 40 असलेले वडील मनोज उत्तम खाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनने तपासाला गती दिली आहे.

 

सदर दिवशी सकाळी 10 वा. मनोज खाडे यांच्या मोबाईलवर त्यांच्या मुलीच्या मोबाईलवरून फोन आला. मुलीने हस्सापूर पुलावरून गोदावरी नदीत उडी मारली असे सांगून त्या व्यक्तीने फोन कट केला. रोहिणी पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. उडी मारलेल्या ठिकाणी तिचे वडील व इतर लोकांनी जाऊन पाहणी केली असता ती सापडली नाही.

 

कु. रोहिणी मनोज खाडे हिचा रंग सावळा, बांधा सडपाळ, उंची 5 फूट, चेहरा गोल, केस काळे व मध्यम लांब, नाक सरळ, शिक्षण दहावी उत्तीर्ण. तिला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. ही मुलगी कोणाला आढळल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे 02462-256520 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलीस उपनिरीक्षक बी. बी. कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. अधिक माहितीसाठी 9970073425 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिवाजीनगर पोलीस स्टेशनने केले आहे.

00000 

 श्री गणेश उत्सव कालावधीत

डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-जिल्ह्यात श्री गणेश उत्सव 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत डॉल्बी मालक / धारक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी  यांनी काढला आहेत.   

जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी  यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) अन्वये 31 ऑगस्ट  रोजी गणेशाचे आगमन ते 9 सप्टेंबर रोजी श्रीचे विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यात कोणत्याही डॉल्बी मालक / धारक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री संबंधितांनी स्वत:चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी. हा आदेश 31 ऑगस्ट 2022  रोजीच्या मध्यरात्रीपासून ते 9 सप्टेंबर रोजी  24 वाजेपर्यंत  श्रीचे विसर्जन होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील, 

डॉल्बीचे आवाजामुळे व कंपनामुळे लहान मुले, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व सामान्य नागरीक यांच्या कानास, ऱ्हदयास आरोग्यास,जिवितास धोका होण्याची तसेच सामाजिक स्वास्थ बिघडण्यास व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांतता व सुरीक्षततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी मालक / धारक यांचेवर बंदी घालण्यात आली आहे. असेही आदेशात नमुद केले आहे.

00000

 शीघ्र ओळख व शीघ्र हस्तक्षेप विषयावर कार्यशाळेचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- भारतीय पुनर्वास परिषद नागपूर केंद्र, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सोमवार 29 ऑगस्ट 2022  रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत नांदेड येथील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी दिली आहे.

 

दिव्यांग मुलाची वेळीच ओळख पटल्यास त्वरित उपचारानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. याबाबतची माहिती जिल्ह्यातील सर्वच दिव्यांग शाळेच्या विशेष शिक्षकांना व्हावी यासाठी क्रॉस डीएसएबीलीटी अर्ली इंटर्वेशन (शीघ्र ओळख व शीघ्र हस्तक्षेप) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयावर घेण्यात येणारी ही जिल्ह्यातील पहिलीच कार्यशाळा आहे. यावेळी भारतीय पुनर्वास केंद्र नागपूरचे संचालक प्रफुल्ल शिंदे, सहाय्यक प्राध्यापक जगन मुदगडे, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. आशिष अग्रवाल, डॉ. गोपिका मालपाणी, डॉ. श्वेता शिंदे निर्मल आदी मान्यवरांच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

या कार्यशाळेस जिल्ह्यातील दिव्यांग शाळेच्या मुख्याध्यापक व विशेष शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकामार्फत करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन निर्मल हे परिश्रम घेत आहेत.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...