Tuesday, August 23, 2022

 मुलगी हरवल्याची तक्रार दाखल


· 
माहिती मिळाल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन


नांदेड (जिमाका) दि. 23 :- कुमारी रोहिणी मनोज खाडे वय वर्षे 16 ही दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी श्रावस्तीनगर नांदेड येथून बाहेर गेली ती परत आली नाही. याबाबत तिच्या वडिलाने शिवजीनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे तक्रार दिली आहे. वय वर्षे 40 असलेले वडील मनोज उत्तम खाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनने तपासाला गती दिली आहे.

 

सदर दिवशी सकाळी 10 वा. मनोज खाडे यांच्या मोबाईलवर त्यांच्या मुलीच्या मोबाईलवरून फोन आला. मुलीने हस्सापूर पुलावरून गोदावरी नदीत उडी मारली असे सांगून त्या व्यक्तीने फोन कट केला. रोहिणी पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. उडी मारलेल्या ठिकाणी तिचे वडील व इतर लोकांनी जाऊन पाहणी केली असता ती सापडली नाही.

 

कु. रोहिणी मनोज खाडे हिचा रंग सावळा, बांधा सडपाळ, उंची 5 फूट, चेहरा गोल, केस काळे व मध्यम लांब, नाक सरळ, शिक्षण दहावी उत्तीर्ण. तिला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. ही मुलगी कोणाला आढळल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे 02462-256520 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलीस उपनिरीक्षक बी. बी. कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. अधिक माहितीसाठी 9970073425 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिवाजीनगर पोलीस स्टेशनने केले आहे.

00000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1245 ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी केल्यास होणार कारवाई : आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार ...