Tuesday, August 23, 2022

 शीघ्र ओळख व शीघ्र हस्तक्षेप विषयावर कार्यशाळेचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- भारतीय पुनर्वास परिषद नागपूर केंद्र, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सोमवार 29 ऑगस्ट 2022  रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत नांदेड येथील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी दिली आहे.

 

दिव्यांग मुलाची वेळीच ओळख पटल्यास त्वरित उपचारानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. याबाबतची माहिती जिल्ह्यातील सर्वच दिव्यांग शाळेच्या विशेष शिक्षकांना व्हावी यासाठी क्रॉस डीएसएबीलीटी अर्ली इंटर्वेशन (शीघ्र ओळख व शीघ्र हस्तक्षेप) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयावर घेण्यात येणारी ही जिल्ह्यातील पहिलीच कार्यशाळा आहे. यावेळी भारतीय पुनर्वास केंद्र नागपूरचे संचालक प्रफुल्ल शिंदे, सहाय्यक प्राध्यापक जगन मुदगडे, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. आशिष अग्रवाल, डॉ. गोपिका मालपाणी, डॉ. श्वेता शिंदे निर्मल आदी मान्यवरांच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

या कार्यशाळेस जिल्ह्यातील दिव्यांग शाळेच्या मुख्याध्यापक व विशेष शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकामार्फत करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन निर्मल हे परिश्रम घेत आहेत.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 19 माळेगावात पारंपारिक लोककला महोत्‍सवात कलाकारांनी जिंकली रसिकांची मने लोककला महोत्सवाचे  आ. प्रतापरावरा पाटील चिखलीकर यांचे ...