Tuesday, November 9, 2021

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 5 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 5  कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 631 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5  तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 434 एवढी झाली असून यातील 87 हजार 750 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 31 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, नायगाव 1, तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा  1 असे एकूण 6  बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 5 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  1, मनपा अंतर्गत एन.आर.आय.भवन व गृह विलगीकरण 4 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 31 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण  7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 11, खाजगी रुग्णालय 5 अशा एकूण 31 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 59 हजार 918

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 56 हजार 181

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 434

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 750

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-31

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

00000

 

 

 

खाजगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहणे यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता

 

खाजगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बसेस

व मालवाहू वाहणे यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता

नांदेड (जिमाका) दि. 9 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात बेमुदत संप पुकारला आहे. त्यामूळे प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून खाजगी बस, स्कूलबस, मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याबाबत मुभा देण्यात आली आहे. याबाबत काही तक्रार असल्यास कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 02462-259900 वर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात बेमुदत संप पुकारला असल्याकारणाने शासनाच्या गृह विभाग परिवहन यांच्या 8 नोव्हेंबर 2011 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व खाजगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000

पै. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय शिक्षा दिवस साजरा करावा

 

पै. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त

राष्ट्रीय शिक्षा दिवस साजरा करावा

नांदेड (जिमाका) दि. 9 :- पै. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनानिमित्ते 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षा दिवस म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासन स्तरावरुन आहेत.

जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्यामूळे सुरक्षेच्या उपाय योजनेच्या दृष्टीने शासनाने निर्गमित केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन सर्व कार्यालयानी राष्ट्रीय शिक्षा दिवस साजरा करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000

जोडारी व संधाता ट्रेडसाठी शिल्प निदेशक पदाच्या उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

जोडारी व संधाता ट्रेडसाठी शिल्प निदेशक पदाच्या

उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकर येथे जोडारी व संधाता या ट्रेडसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशक घेणे आहे. त्यासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी 15 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी वेळ 5 वाजेपर्यत शैक्षणिक अर्हता कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. यापूर्वी ज्यांनी या पदासाठी अर्ज केलेले आहेत त्यांनी पूनश्च अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकर यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

जोडारी ट्रेडसाठी शिल्प निदेशक पदाच्या उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

 जोडारी ट्रेडसाठी शिल्प निदेशक पदाच्या

उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर येथे जोडारी या ट्रेडसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशक घेणे आहे. त्यासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी 15 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी वेळ 5 वाजेपर्यत शैक्षणिक अर्हता कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. यापूर्वी ज्यांनी या पदासाठी अर्ज केलेले आहेत त्यांनी पूनश्च अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूर यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे

सर्वेक्षण ट्रेडसाठी शिल्प निदेशक पदाच्या उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

सर्वेक्षण ट्रेडसाठी शिल्प निदेशक पदाच्या

उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगांव  येथे सर्वेक्षक या ट्रेडसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशक घेणे आहे. त्यासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी 15 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी वेळ 5 वाजेपर्यत शैक्षणिक अर्हता कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. यापूर्वी ज्यांनी या पदासाठी अर्ज केलेले आहेत. त्यांनी पूनेश्च अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगाव यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...